Vikram Vedha First Look : बहुचर्चित ‘विक्रम वेधा’तील हृतिकचा फर्स्ट लूक, वाढदिवशी चाहत्यांना मोठे गिफ्ट!

हृतिक रोशनच्या (Hrithik Roshan) आगामी 'विक्रम वेधा' (Vikram Vedha) या चित्रपटाच्या हिंदी रिमेकची बऱ्याच दिवसांपासून चर्चा आहे. या चित्रपटाच्या स्टारकास्टने आधीच सगळ्यांची उत्सुकता वाढवली होती. या चित्रपटाबद्दल जाणून घेण्याची चाहत्यांना प्रचंड उत्सुकता आहे.

Vikram Vedha First Look : बहुचर्चित 'विक्रम वेधा'तील हृतिकचा फर्स्ट लूक, वाढदिवशी चाहत्यांना मोठे गिफ्ट!
हृतिक रोशन

मुंबई : हृतिक रोशनच्या (Hrithik Roshan) आगामी ‘विक्रम वेधा’ (Vikram Vedha) या चित्रपटाच्या हिंदी रिमेकची बऱ्याच दिवसांपासून चर्चा आहे. या चित्रपटाच्या स्टारकास्टने आधीच सगळ्यांची उत्सुकता वाढवली होती. या चित्रपटाबद्दल जाणून घेण्याची चाहत्यांना प्रचंड उत्सुकता आहे. आता चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे. या चित्रपटातील हृतिकच्या फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे.

हृतिकचा फर्स्ट लूक पोस्टर शेअर

या फर्स्ट लूकमध्ये हृतिक रोशन एकदम डॅशिंग दिसत आहे. हृतिकचा रफ अँड टफ लूक पाहून सगळेच हैराण झाले आहेत. या लूकमध्ये हृतिकची मोठी दाढी, डोळ्यांना काळा चष्मा आणि काळ्या कुर्त्यात रक्ताने माखलेला पाहून आपल्याला अंदाज येईल की, या चित्रपटामध्ये हृतिक एकदम हटके भूमिकेमध्ये आहे. विक्रम वेधाच्या मूळ वर्जनमध्ये वेदाची भूमिका विजय सेतुपतीने केली होती. हृतिकचा लूक त्याची आठवण करून देणारा आहे. हृतिकचा स्वतःचा प्रभाव आणि स्वतःचे आकर्षण आहे जे त्याला या लूकमध्येही वेगळे आणि खास बनवत आहे.

हा फर्स्ट लूक पोस्टर चित्रपट समीक्षक आणि व्यापार विश्लेषक तरण आदर्श (Taran Aadarsh) यांनी आपल्या ट्विटर शेअर केला आहे. या चित्रपटात सैफ अली खान विक्रमची भूमिका साकारत आहे. आता या चित्रपटाशी संबंधित हा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. सैफचा फर्स्ट लुक अजून शेअर करण्यात आलेला नाहीये. या चित्रपटामध्ये राधिका आपटेही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. आज हृतिकचा वाढदिवस आहे आणि त्याच्या वाढदिवशी त्याच्या चाहत्यांसाठी यापेक्षा मोठे गिफ्ट कोणतीच असू शकत नाही.

सुपरहिट साऊथ चित्रपटाचा रिमेक!

‘विक्रम वेधा’ हा चित्रपट 2017 मध्ये आलेल्या तमिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. या सुपरहिट चित्रपटात आर माधवनने एका उमदा पोलीस अधिकाऱ्याची अर्थात ‘विक्रम’ची भूमिका, तर विजय सेतुपतीने गँगस्टर वेधाची भूमिका साकारली होती. या मूळ चित्रपटाचे दिग्दर्शन पुष्कर-गायत्री यांनी केले होते. आता हिंदी रिमेकचे दिग्दर्शन देखील तेच करणार आहेत. या चित्रपटात हृतिक एका गँगस्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट विक्रम-वेतालच्या प्राचीन कथेतून रेखाटला आहे, जिथे एक चतुर गुंड प्रत्येक वेळी त्याच्या आयुष्यातील नवीन कथा सांगून पोलिसांच्या तावडीतून पळून जाण्याचा मार्ग शोधतो.

संबंधित बातम्या : 

Bob Saget | ‘Full House’स्टार, यूएस कॉमेडियन बॉब सेगेट यांचा मृत्यू , हॉटेलमध्ये सापडला मृतदेह पोलीस म्हणतात …

India’s Best Dancer 2 winner: डान्सच्या मंचावर मराठीचाच बोलबाला, ‘छोटी हेलन’ सौम्या कांबळे ठरली विजेती, बक्षीसाची रक्कम ऐकून हैराण व्हाल!


Published On - 11:03 am, Mon, 10 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI