India’s Best Dancer 2 winner: डान्सच्या मंचावर मराठीचाच बोलबाला, ‘छोटी हेलन’ सौम्या कांबळे ठरली विजेती, बक्षीसाची रक्कम ऐकून हैराण व्हाल!

डान्स रिअॅलिटी शो इंडियाज (Sony Entertainment Television) बेस्ट डान्सर सीझन ( India's Best Dancer 2) ला या सीझनचा 'बेस्ट का नेक्स्ट अवतार' मिळाला आहे. पुण्याची मराठमोळी साैम्या कांबळे इंडियाज बेस्ट डान्सर सीझन 2 ची विजेती झाली आहे.

India’s Best Dancer 2 winner: डान्सच्या मंचावर मराठीचाच बोलबाला, 'छोटी हेलन' सौम्या कांबळे ठरली विजेती, बक्षीसाची रक्कम ऐकून हैराण व्हाल!
साैम्या कांबळे

मुंबई : डान्स रिअॅलिटी शो इंडियाज (Sony Entertainment Television) बेस्ट डान्सर सीझन ( India’s Best Dancer 2) ला या सीझनचा ‘बेस्ट का नेक्स्ट अवतार’ मिळाला आहे. पुण्याची मराठमोळी साैम्या कांबळे इंडियाज बेस्ट डान्सर सीझन 2 ची विजेती झाली आहे. विशेष म्हणजे साैम्याला 15 लाखांचा धनादेश देत तिचा सन्मान करण्यात आला आहे. साैम्याला गिफ्ट म्हणून  स्विफ्ट कार देखील देण्यात आली आहे. सर्वोत्कृष्ट 5 फायनलमध्ये जयपूरचा गौरव सरवन हा पहिला तर ओडिशाचा रोसारना हा दुसरा उपविजेता ठरला.

आशा भोसले यांच्याकडूनही साैम्याचे काैतुक

आशा भोसले देखील सौम्याच्या मोठ्या फॅन आहेत. आशा भोसले शोमध्ये आल्या होत्या त्यावेळी तिचा डान्स पाहून त्या खूप प्रभावित झाल्या आणि त्यांनी साैम्याला छोटी हेलेनचीच पदवी दिली. फिनालेमध्ये सौम्याने वर्तिकासोबत बेली डान्स आणि फ्री-स्टाईल अॅक्ट केले. विजेता झाल्यावर साैम्याने सांगितले की, तिच्या आईचे स्वप्न आहे की, तिने डान्सर म्हणून नाव मोठे करावे तर साैम्याच्या वडिलांची इच्छा आहे की, तिने डाॅक्टर व्हावे. विशेष म्हणजे या अगोदर साैम्याला नोरा फतेहीने बेली डान्सिंग कॉईन बेल्ट गिफ्ट म्हणून दिला आहे.

ट्रॉफी जिंकल्यानंतर सौम्या म्हणाली की, “मी माझ्या भावना शब्दात व्यक्त करू शकत नाही. मी खूप भावूक झाले आहे. मी त्या सर्वांचे आभार मानू इच्छिते ज्यांनी मला इंथपर्यंत येण्यासाठी मदत केली आणि सपोर्ट केला आहे. विशेषत: या शोमध्ये माझी कोरिओग्राफर आणि माझी वर्तिका दीदी जी या प्रवासात माझ्यासोबत राहिली. मी त्यांची खूप ऋणी आहे. मलायका मॅडम, टेरेन्स सर आणि गीता मा या सर्व जजचेही मी आभार मानते.

साैम्याची पहिली गुरू आईच! 

साैम्या मुळची पुण्याची आहे. तिचे वडिल डाॅक्टर आहेत तर आई स्वत: एक डान्सर आहे. तिच्या आईकडूनच तिने डान्सचे सुरूवातीचे धडे घेतले आहेत. विशेष म्हणजे साैम्या गेल्या दहा वर्षांपासून बेली डान्स शिकते आहे. लहानपासून साैम्याला शोजमध्ये सहभागी होण्याची इच्छा होती. मात्र, बरेच प्रयत्न करूनही तिला संधी मिळत नव्हती. मात्र, शेवटी तिला ‘इंडियाज बेस्ट डान्सर’ मध्ये संधी मिळाली आणि तिने त्या संधीचे सोने केले.

संबंधित बातम्या : 

Bigg Boss 15 Shocking | बिग बॉसच्या घरातून धक्कादायक एक्सिट, उमर रियाझ शोमधून बाहेर, रश्मी देसाईला आश्रू अनावर

Happy Birthday Kalki Kochlin : वयाच्या 27 व्या वर्षी लग्न, दोन वर्षांत घटस्फोट; कल्कीबद्दल ‘या’ गोष्टी माहिती आहेत का?


Published On - 9:58 am, Mon, 10 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI