AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RRR मधून फक्त आलियाच नव्हे तर मकरंद देशपांडे यांचेही सीन्स केले कट; राजामौलींच्या कामाबद्दल म्हणाले..

ज्युनियर एनटीआर आणि रामचरण यांच्या भूमिका असलेल्या या चित्रपटात अभिनेता मकरंद देशपांडेसुद्धा (Makarand Deshpande) झळकले. मात्र त्यांचेही या चित्रपटातील काही सीन्स कट झाल्याचं त्यांनी सांगितलं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ते याविषयी व्यक्त झाले.

RRR मधून फक्त आलियाच नव्हे तर मकरंद देशपांडे यांचेही सीन्स केले कट; राजामौलींच्या कामाबद्दल म्हणाले..
Makrand Deshpande and SS RajamouliImage Credit source: Facebook
| Updated on: Mar 31, 2022 | 3:20 PM
Share

आपल्या करिअरमधील पहिल्यावहिल्या टॉलिवूड चित्रपटातील आपले सीन्स कट झाल्यामुळे अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) नाराज असल्याची चर्चा होती. एस. एस. राजामौली (SS Rajamouli) दिग्दर्शित RRR या चित्रपटात तिने सीता ही व्यक्तीरेखा साकारली. ज्युनियर एनटीआर आणि रामचरण यांच्या भूमिका असलेल्या या चित्रपटात अभिनेता मकरंद देशपांडेसुद्धा (Makarand Deshpande) झळकले. मात्र त्यांचेही या चित्रपटातील काही सीन्स कट झाल्याचं त्यांनी सांगितलं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ते याविषयी व्यक्त झाले. RRR मध्ये मकरंद यांनी साकारलेली भूमिका ही खूपच छोटी आहे. तरीसुद्धा ती स्वीकारण्यामागे कारण काय होतं, याबद्दलही त्यांनी सांगितलं. मकरंद यांनी आतापर्यंत ‘सत्या’, ‘जंगल’, ‘सरफरोश’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत.

“राजामौली हा खुल्या मनाचा माणूस”

RRR या चित्रपटात काम करताना मकरंद हे राजामौलींच्या कामाच्या प्रेमातच पडले. ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, “राजामौली यांच्या ऑफिसमधून मला फोन आला आणि त्यांनी मला भेटायला बोलावलं. मी तिथे गेलो तेव्हा रामचरण आणि राजामौली माझी वाट पाहत होते. रामचरणने स्वत:ची ओळख करून दिली आणि सांगितलं की तो मला भेटण्याची वाट पाहत होता. कारण त्याने माझे हिंदी चित्रपट पाहिले होते आणि माझ्यासोबत काम करण्यास तो उत्सुक होता. चित्रपटात माझी छोटी भूमिका होती आणि माझे काही सीन्सही कट झाले. राजामौली हा खुल्या मनाचा माणूस आहे. ते फक्त मला म्हणाले, ‘मला तू चित्रपटात हवा आहेस, पण किती दिवसांसाठी ते माहित नाही’. त्यांनी मला कथा सांगितली आणि मला समजलं की त्यांना एक टीम तयार करायची आहे, फक्त अभिनेत्याला कास्ट करायचं नाहीये. तो विश्वासाने एक टीम तयार करतोय. असं बऱ्याचदा घडलं, जेव्हा आम्ही फक्त शूट करायचो आणि परत यायचो. अर्थातच आम्हाला त्यासाठी पैसे दिले गेले. तर, माझा मुद्दा असा आहे की जेव्हा तुमच्याकडे एखादा प्रमुख व्यक्ती (लीडर) असतो ज्याला पडद्यावर वेगळा प्रभाव निर्माण करायचा असतो, तेव्हा तुम्ही त्याला हवं तसं काम करायला तयार असता.”

“मोठ्या बजेटचा परिणामही मोठा”

ते पुढे म्हणाले, “अर्थात, बजेट खूप मोठा आहे. मी ऐकलं की ते 300-400 कोटी रुपयांच्या बजेटवर हा चित्रपट बनवला गेला आहे. अशा प्रकारच्या बजेटचा प्रभाव हा 1000 कोटी रुपयांइतका असतो आणि तोच महत्त्वाच मुद्दा असतो. लोकांना आश्चर्य वाटतं की ते इतकी मोठी जबाबदारी कशी पेलू शकतात. पण त्यांना त्यांच्या कामावर पूर्ण विश्वास आहे.”

RRR या चित्रपटाने जगभरात 500 कोटींहून अधिकचा गल्ला जमवला आहे. तर देशात या चित्रपटाची कमाई ही 100 कोटींहून अधिक झाली आहे. यामध्ये ज्युनियर एनटीआर, रामचरण, आलिया भट्ट, मकरंद देशपांडे यांच्यासोबतच अजय देवगणचीही भूमिका आहे.

हेही वाचा:

पतीच्या कॅन्सरविषयी बोलताना इन्स्टाग्राम LIVE दरम्यान अभिज्ञा झाली भावूक; म्हणाली..

बूट घालून हनुमान चालिसावर नृत्य केल्याने सुखविंदर वादाच्या भोवऱ्यात; टीका होताच म्हणाले…

Follow Us
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर आरोप
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर...
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?