Kangana Ranaut: ‘यांचं खरं नाव तर अस्लम’, कंगनाने महेश भट्ट यांच्यावर साधला निशाणा

त्यांनी आपलं खरं नाव वापरावं आणि धर्मांतर केल्यावर एखा विशिष्ट धर्माचं प्रतिनिधित्व करू नये, असंही ती म्हणाली. कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये महेश भट्ट यांचे व्हिडीओ शेअर केले आहेत.

Kangana Ranaut: 'यांचं खरं नाव तर अस्लम', कंगनाने महेश भट्ट यांच्यावर साधला निशाणा
कंगनाने महेश भट्ट यांच्यावर साधला निशाणा
Image Credit source: Instagram
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: स्वाती वेमूल

Sep 04, 2022 | 7:45 PM

निर्माते-दिग्दर्शक महेश भट्ट (Mahesh Bhatt) यांचा जुना व्हिडीओ शेअर करत अभिनेत्री कंगना रनौतने (Kangana Ranaut) त्यांच्यावर निशाणा साधला. महेश यांचं खरं नाव महेश नसून अस्लम (Aslam) आहे, असं कंगनाने म्हटलंय. इतकं सुंदर नाव का लपवत आहात, असा खोचक सवालही तिने महेश भट्ट यांना केला. त्यांनी आपलं खरं नाव वापरावं आणि धर्मांतर केल्यावर एखाद्या विशिष्ट धर्माचं प्रतिनिधित्व करू नये, असंही ती म्हणाली. कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये महेश भट्ट यांचे व्हिडीओ शेअर केले आहेत.

कंगनाने 2006 मध्ये ‘गँगस्टर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. विशेष म्हणजे महेश भट्ट यांनीच या चित्रपटाची निर्मिती केली होती. आता महेश यांच्या जुन्या भाषणाचे व्हिडीओ शेअर करत तिने लिहिलं, ‘महेशजी अत्यंत साध्या आणि काव्यात्मक भाषेत लोकांना हिंसाचारासाठी भडकवत आहेत.’

त्याच भाषणातला आणखी व्हिडीओ शेअर करत कंगनाने लिहिलं, ‘मला असं कळलंय की त्यांचं खरं नाव अस्लम आहे. दुसरी पत्नी सोनी राजदानशी लग्न करण्यासाठी त्यांनी धर्मांतर केलं. इतकं सुंदर नाव का लपवावं? त्यांनी त्यांचं खरं नाव वापरावं. धर्मांतर केल्यानंतर त्यांनी एका विशिष्ट धर्माचं प्रतिनिधित्व करू नये.’

2020 मध्ये कंगनाने महेश भट्ट यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यांची मुलगी पूजा भट्ट दिग्दर्शित धोका हा चित्रपट नाकारल्यानंतर महेश भट्ट यांनी माझ्यावर हल्ला केल्याचा आरोप कंगनाने केला होता. या वर्षाच्या सुरुवातीला कंगनाने आलियाचा चित्रपट गंगुबाई काठियावाडी प्रदर्शित होण्याआधी महेश भट्ट आणि आलिया भट्ट यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली होती.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें