AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kangana Ranaut | नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या समर्थनार्थ कंगना राणावत मैदानात? वाचा काय म्हणाली अभिनेत्री

नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या पर्सनल आयुष्यामध्ये मोठे वादळ आल्याचे दिसत आहे. आलिया सिद्दीकी ही नवाजुद्दीन सिद्दीकी याच्यावर सतत गंभीर आरोप करताना दिसत आहे. यांचा वाद थेट आता कोर्टामध्ये जाऊन पोहचला आहे.

Kangana Ranaut | नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या समर्थनार्थ कंगना राणावत मैदानात? वाचा काय म्हणाली अभिनेत्री
| Updated on: Mar 06, 2023 | 6:18 PM
Share

मुंबई : नवाजुद्दीन सिद्दीकी हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या पर्सनल लाईफमुळे प्रचंड चर्चेत आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) याची पत्नी आलिया हिने त्याच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. आलिया सिद्दीकी हिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत मध्यरात्री मला माझ्या मुलांसह घराबाहेर काढल्याचा आरोप केला होता. हा व्हिडीओ (Video) शेअर झाल्यानंतर अनेकांनी नवाजुद्दीन सिद्दीकी याच्यावर टिका केली होती. व्हिडीओमध्ये आलिया ही तिच्या मुलांसोबत नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या बंगल्याबाहेर उभी दिसत होती. हा व्हिडीओ शेअर करताना आलिया सिद्दीकी हिने म्हटले होते की, माझ्याकडे फक्त 81 रूपये असून मी कुठे जाऊ मलाच आता कळत नाहीये.

गेल्या काही दिवसांपासून नवाजुद्दीन सिद्दीकी याची पत्नी आलिया ही त्याच्यावर सतत गंभीर आरोप करत आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी याच्यावर आरोप करत तिने अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. आता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्याच्या पत्नीचा वाद थेट कोर्टापर्यंत पोहचला आहे. यामध्ये दररोज धक्कादायक खुलासे देखील होत आहेत.

आलिया सतत नवाजुद्दीन सिद्दीकी याच्यावर आरोप करत असताना नवाजुद्दीन सिद्दीकी हा काहीही बोलणे टाळत होता. मात्र, शेवटी आता तीन पानाचे मोठे पत्र नवाजुद्दीन सिद्दीकी याने सोशल मीडियावर शेअर केले आहे. यामध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी याने काही मोठे खुलासे देखील केले आहेत. आता यावर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत.

बाॅलिवूड अभिनेत्री कंगना राणावत हिने नुकताच नवाजुद्दीन सिद्दीकी याने शेअर केलेली पोस्ट रिशेअर केलीये. ही पोस्ट शेअर करताना कंगना राणावत हिने लिहिले की, मौन आपल्याला कधीही शांती देत ​​नाही नवाजुद्दीन साहब… तुमचे अनेक चाहते आणि हितचिंतक आहेत जे तुमची बाजू जाणून घेण्यास इच्छूक आहेत. कंगनाच्या या पोस्टवर चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात कमेंट केल्या आहेत.

आता कंगना राणावत हिची ही पोस्ट व्हायरल होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी आलिया सिद्दीकी हिच्या वकिलाने नवाजुद्दीन सिद्दीकी याच्यावर गंभीर आरोप केले होते. मुलांसह आपल्याला घराबाहेर मध्यरात्री काढल्याच्या आरोपावर एक निवेदन प्रसिध्द करत नवाजुद्दीन सिद्दीकी याने म्हटले होते की, ते घर माझ्या आईच्या नावावर आहे आणि त्यासंदर्भातील सर्व निर्णय घेण्याच्या अधिकार फक्त तिला आहे.

बारामतीत अजित पवार vs शरद पवार संघर्ष, दोन्ही गटांची प्रतिष्ठा पणाला
बारामतीत अजित पवार vs शरद पवार संघर्ष, दोन्ही गटांची प्रतिष्ठा पणाला.
राजगुरुनगरमध्ये वळसे-पाटील अन् अमोल कोल्हेंची प्रतिष्ठा पणाला
राजगुरुनगरमध्ये वळसे-पाटील अन् अमोल कोल्हेंची प्रतिष्ठा पणाला.
कणकवलीत राणे बंधूंमध्ये चुरस, कोण मारणार बाजी? निकालाची प्रतीक्षा
कणकवलीत राणे बंधूंमध्ये चुरस, कोण मारणार बाजी? निकालाची प्रतीक्षा.
नादच खुळा...निकालाआधी कोल्हापुरात विजयाचे बॅनर, कागलमध्ये कुणाची चर्चा
नादच खुळा...निकालाआधी कोल्हापुरात विजयाचे बॅनर, कागलमध्ये कुणाची चर्चा.
शेतकऱ्यांवर किडनी विकण्याची वेळ, आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश
शेतकऱ्यांवर किडनी विकण्याची वेळ, आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश.
धर्माबादमध्ये मतदाराना मंगल कार्यालयात डांबलं, पैसे वाटपापूर्वीच पळापळ
धर्माबादमध्ये मतदाराना मंगल कार्यालयात डांबलं, पैसे वाटपापूर्वीच पळापळ.
कोण उधळणार गुलाल? 288 नगरपरिषदा, नगरपंचायतींचा निकाल पाहा एका क्लिकवर
कोण उधळणार गुलाल? 288 नगरपरिषदा, नगरपंचायतींचा निकाल पाहा एका क्लिकवर.
VIDEO: BJP आमदारानं रिक्षाचालकाच्या लगावली कानशिलात, नेमकं घडलं काय?
VIDEO: BJP आमदारानं रिक्षाचालकाच्या लगावली कानशिलात, नेमकं घडलं काय?.
Epstein files सार्वजनिक अन् खळबळ; एपस्टिन, मोदी भेटले! चव्हाणांचा दावा
Epstein files सार्वजनिक अन् खळबळ; एपस्टिन, मोदी भेटले! चव्हाणांचा दावा.
मुंबई कुणाची? ठाकरे बंधूंची प्रतिष्ठा पणाला, मुंबई उपनगरात कौल कुणाला?
मुंबई कुणाची? ठाकरे बंधूंची प्रतिष्ठा पणाला, मुंबई उपनगरात कौल कुणाला?.