AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tejas | कंगनाच्या वाढदिवशी चाहत्यांना आणखी एक खास भेट, ‘तेजस’ नवा लूक प्रदर्शित!

आज वाढदिवसाच्या निमित्ताने तिने आपला आगामी ‘तेजस’ (Tejas) या चित्रपटातील नवीन लूक शेअर केला आहे. ज्यामध्ये ती एअरफोर्स अधिकारी असल्याचे दिसून येत आहे.

Tejas | कंगनाच्या वाढदिवशी चाहत्यांना आणखी एक खास भेट, 'तेजस' नवा लूक प्रदर्शित!
कंगना राणावत
| Updated on: Mar 23, 2021 | 6:42 PM
Share

मुंबई : बॉलिवूडची क्वीन कंगना रनौत (Kangana Ranaut) आज आपला 34वा वाढदिवस साजरा करत आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने कंगनाने चाहत्यांना एक खास भेट दिली आहे. आज वाढदिवसाच्या निमित्ताने तिने आपला आगामी ‘तेजस’ (Tejas) या चित्रपटातील नवीन लूक शेअर केला आहे. ज्यामध्ये ती एअरफोर्स अधिकारी असल्याचे दिसून येत आहे. चित्रपट विश्लेषक तरण आदर्श यांनी कंगनाचा हा लूक शेअर केला आहे (Kangana Ranaut Tejas  film new look released).

तरण आदर्शने लिहिले की, ‘कंगनाच्या वाढदिवशी तिच्या तेजस चित्रपटातील एक नवीन लूक.’ या चित्रपटाचे दिग्दर्शन सर्वेश मेवाड़ करत आहेत आणि राणी स्क्रूवाला या चित्रपटाची निर्मिती करीत आहेत. कंगनाचा हा लूक तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे.

पाहा नवा लूक

तेजसमध्ये ‘हे’ असणार कंगनाचे नाव

कंगनाने या चित्रपटातील तिचे नाव जाहीर केले आहे. कंगनाने सांगितले की, चित्रपटात युनिफॉर्म घालणे तिच्यासाठी फार आनंददायक आहे. या चित्रपटात ती ‘तेजस गिल’च्या भूमिकेत दिसणार असल्याचे कंगनाने सांगितले. कंगनाने ट्विटसह एक फोटो शेअर केला आहे यात फोटोत तिचे नाव ‘तेजस गिल’ लिहिलेले दिसत आहे. त्याचबरोबर कंगनाने लिहिले की, ‘तिने तेजसमध्ये शीख सैनिकाची भूमिका साकारली आहे.यातील माझे नाव ऐकून माझ्या चेहऱ्यावर क्षणभर स्मित आले होते.’

कंगना रनौतच्या ‘तेजस’ चित्रपटाविषयी बोलायचे तर, हा चित्रपट धडाकेबाज महिला फाइटर पायलटची कहाणी आहे. या चित्रपटात कंगना भारतीय हवाई दलातील अधिकारी साकारणार आहे. काही महिन्यांपूर्वी चित्रपटाच्या फर्स्ट लूकचे पोस्टर रिलीज करण्यात आले होते. जे प्रेक्षकांना खूप आवडले (Kangana Ranaut Tejas  film new look released).

‘थलायवी’साठी कंगनाची मेहनत

कथेच्या आणि पात्राच्या मागणीनुसार कंगनाला वजन वाढवावं लागलं होतं. यावेळी, सर्वात मोठे आव्हान होते की, तिला नव्या चित्रपटासाठी पुन्हा एकदा स्लीमट्रीम व्हायचे होते. अशा परिस्थितीत कंगनाने खूप कठोर मेहनत केली. खुद्द कंगना रनौत हिने आपल्या ट्विटमध्ये याचा खुलासा केला आहे. तिने लिहिले की, ‘जेव्हा ट्रेलर लाँचिंगसाठी केवळ एक दिवस दूर आहे, तेव्हा मी असे म्हणू शकते की काही महिन्यांत, 20 किलो वजन वाढवणे आणि घटवणे कदाचित सर्वात मोठे आव्हान नव्हते. काही तासांत ही आपली प्रतिक्षा संपणार आहे आणि त्यानंतर जया कायमची तुमची असेल.’

कसा आहे ‘थलायवी’चा ट्रेलर?

ट्रेलर सुरू होतो ज्यामध्ये पार्श्वभूमीवर एक आवाज ऐकू येतो की, हा चित्रपट आपल्याला राजकारण कसे करावे हे सांगेल. त्यानंतर आपल्याला कंगनाची एक सुंदर झलक पाहायला मिळते. यानंतर कंगनाचे वेगवेगळे सीन दाखवण्यात आले आहेत. यानंतर असे संवाद ऐकू येतात की, ‘ये मर्दों की दुनिया है और हम एक औरत को आगे करके खड़ा है’. या दरम्यान जयललिता बनलेल्या कंगनाच्या राजकीय लूकची झलक दिसून येते.

यानंतर जयललिता यांची (कंगना रनौत) या ट्रेलरमध्ये जोरदार एंट्री आहे. ट्रेलरमध्ये जयललिता यांचा अभिनेत्री होण्याचा प्रवास दाखवण्यात आला आहे. यादरम्यान, कंगनाचा अतिशय सुंदर लूक चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. अशाच प्रकारे जयललिता यांचे एमजेआर बरोबरचे वैयक्तिक जीवन देखील अतिशय सुंदर पद्धतीने ट्रेलरमध्ये सादर केले गेले आहे.

(Kangana Ranaut Tejas  film new look released)

हेही वाचा :

Kangana Ranaut | स्वतःला ‘बब्बर शेर’ म्हणवणाऱ्या कंगनाच्या डोळ्यात आले पाणी, वाचा नेमकं काय झालं…

Thalaivi Trailer | कंगनाच्या ‘थलायवी’चा ट्रेलर प्रदर्शित, पाहा जयललितांच्या अभिनेत्रीपासून ते राजकारणापर्यंतच्या प्रवासाची झलक…

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.