AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिलजितने पुन्हा घेतला कंगनासोबत ‘पंगा’, म्हणाला…

मुंबई : दिल्लीच्या वेशीवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावरुन अभिनेत्री कंगना रानौत (Kangana Ranaut) आणि बॉलिवूड अभिनेता दिलजित दोसांझ (Diljit Dosanjh) यांच्यात सुरु झालेले ट्विटर वॉर आता शिगेला पोहोचला आहे. कंगना रानौत हिने नेहमीप्रमाणे पातळी सोडून दिलजित दोसांझ याच्यावर टीका केली. मात्र, दिलजित दोसांझ यानेही कंगनाला तितक्याच सडेतोड भाषेत प्रत्युत्तर दिले आहे. (Kangana Ranaut vs Diljit […]

दिलजितने पुन्हा घेतला कंगनासोबत 'पंगा', म्हणाला...
| Updated on: Feb 08, 2021 | 7:37 PM
Share

मुंबई : दिल्लीच्या वेशीवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावरुन अभिनेत्री कंगना रानौत (Kangana Ranaut) आणि बॉलिवूड अभिनेता दिलजित दोसांझ (Diljit Dosanjh) यांच्यात सुरु झालेले ट्विटर वॉर आता शिगेला पोहोचला आहे. कंगना रानौत हिने नेहमीप्रमाणे पातळी सोडून दिलजित दोसांझ याच्यावर टीका केली. मात्र, दिलजित दोसांझ यानेही कंगनाला तितक्याच सडेतोड भाषेत प्रत्युत्तर दिले आहे. (Kangana Ranaut vs Diljit Dosanjh)

कंगनामध्ये आणि दिलजीतमध्ये ट्विटर वॉर बघायला मिळतो आहे. दोघेही एकमेकांच्या विरोधात ट्विट करत आहेत. कंगनाने दिलजीतला पुन्हा एकदा डवचण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर दिलजातने देखील कंगनाला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. अलीकडेच कंगना रनौतने एक मुलाखत दिली होती आणि ज्यात तिने दिलजित दोसांझवर भाष्य केले आहे.

आता दिलजितने ट्विटद्वारे कंगनाला म्हटलं आहे की, मला विचारलं आहे म्हणून मी सांगत आहे, हे काय नाटक आहे. देशाबद्दल बोलले जात आणि पंजाबबद्दल बोलले जात आहे. आग लावण्याचे काम केलं जात आहे. मला माहिती आहे की, गंदगीचे उत्तर दिले नाही पाहिजे पण दरवेळा गप्प बसणे देखील चुकीचे आहे. असे म्हणत त्याने कंगनाला उत्तर दिले आहे. मात्र, आता दिलजितच्या ट्विटला कंगना काय उत्तर देते हे बघण्यासारखे आहे.

काही दिवसांपूर्वी कंगनाने शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या एका वृद्ध महिलेला बिलकिस बानो म्हणत त्यांची खिल्ली उडविली होती. त्यावर दिलजित दोसांझ याने ‘कोणी इतकेही आंधळे असू नये’, अशी टिप्पणी केली होती. त्यावर कंगना रानौत हिने नेहमीप्रमाणे अद्वातद्वा बोलत दिलजित दोसांझवर टीका केली होती. तिने दिलजितला करण जोहरचा ‘पाळीव कुत्रा’ म्हटले होते. तू रोज ज्यांची चाटून काम मिळवतोस मी त्यांची रोज वाजवते. त्यामुळे जास्त उडू नकोस. मी कंगना रानौत आहे, तुझ्यासारखी चमची नाही, अशा अत्यंत खालच्या भाषेत कंगनाने दिलजितवर टीका केली होती.

संबंधित बातम्या : 

मी जिवंत आहे, माझ्या मृत्यूची बातमी फेक: अभिनेता मोहन कपूर

चित्रपटाच्या सेटवर वरुण धवनला येतेय पत्नी नताशाची आठवण!

शेतकरी आंदोलनावरून प्रियांकाला टोला आता मियाच होतीये ट्रोल, वाचा काय झाल!

(Kangana Ranaut vs Diljit Dosanjh)

Follow Us
प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; राऊतांनी सांगितलं खरं कारण म्हणाले..
Sanjay Raut : प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; संजय राऊतांनी सांगितलं खरं कारण, म्हणाले...
रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
Ratnagiri : रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; गजानन महाराज...
Dry Drought Help : राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; शेगावच्या गजानन महाराज संस्थानकडून तब्बल एवढी मदत जाहीर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर....
Thane : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर, जुन्या वादातून....
संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
मोठी बातमी! संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य
Sachin Waze : साडेपाच वर्षांनी सचिन वाझेला जामीन! अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
Thane | ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...