AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kangana Ranaut | कंगना राणावत हिच्या अडचणीमध्ये मोठी वाढ, संतप्त लोकांनी गाठले अभिनेत्रीचे ऑफिस

बाॅलिवूड अभिनेत्री कंगना राणावत ही कायमच चर्चेत असते. कंगना राणावत ही सोशल मीडियावरही सक्रिय असते. अनेकदा कंगना राणावत ही वादाच्या भोवऱ्यात सापडती. विषय कोणताही असो कंगना राणावत ही सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले मत मांडते. सध्या कंगना वादात सापलीये.

Kangana Ranaut | कंगना राणावत हिच्या अडचणीमध्ये मोठी वाढ, संतप्त लोकांनी गाठले अभिनेत्रीचे ऑफिस
| Updated on: Apr 23, 2023 | 9:55 PM
Share

मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री कंगना राणावत ही कायमच वादाच्या भोवऱ्यात अडकते. अनेकदा कंगना राणावत (Kangana Ranaut) हिच्या निशाण्यावर बाॅलिवूडमधील काही कलाकार असतात. विशेष म्हणजे कंगना राणावत ही सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय आहे. काही दिवसांपूर्वीच कंगना राणावत हिने सोशल मीडियावर काही फोटो (Photo) शेअर केले होते. कंगना राणावत हिने शेअर केलेल्या या फोटोमध्ये कंगना हिची आई शेतामध्ये काम करताना दिसली. त्यानंतर कंगना राणावत हिची ही पोस्ट सोशल मीडियावर (Social media) तूफान व्हायरल होताना दिसली. कंगना राणावत नेहमीच सोशल मीडियावर आपले विचार मांडते आणि वादात अडकते.

सध्या कंगना राणावत हिच्या समस्या वाढल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वी कंगना राणावत हिने बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांच्या व्हिडीओवर कमेंट केली होती. यानंतर कंगना राणावत हिने बौद्ध धर्मगुरू दलाई लामा आणि अमेरिकी राष्ट्रपती जो बायडेन यांच्याबद्दलचे एक मिम्स सोशल मीडियावर शेअर केले होते. ज्यानंतर तिला अनेकांनी खडेबोल सुनावले.

कंगना राणावत हिने शेअर केलेले हे मिम्स अनेकांना पचनी पडले नाही. अनेकांनी कंगना राणावत हिला सोशल मीडियावर खडेबोल सुनावण्यास सुरूवात केली. नुकताच कंगना राणावत हिने इंस्टा स्टोरीवर एक पोस्ट शेअर केलीये. या पोस्टवर कंगना हिने सांगितले की, तिच्या मुंबईतील आॅफिससमोर काही लोक हे आंदोलनासाठी बसले आहेत. इतकेच नाही तर यावर कंगना राणावत ही स्पष्टीकरण देताना दिसली आहे.

kangana ranaut

कंगना राणावत पुढे म्हणाली की, कृपया माझा हेतू हा अजिबात वाईट नव्हता. माझा बुद्ध आणि परमपूज्य 14 व्या दलाई लामा यांच्या शिकवणीवर पूर्ण विश्वास आहे, त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य सार्वजनिक सेवेत घालवले आहे. मी काहीही विचार न करता कोणावरही चुकीचे बोलत नाही… इतक्या कडक उन्हामध्ये बसून आंदोलन करू नका. तुम्ही लोक कृपया घरी जा.

आता कंगना राणावत हिने शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून शेअर केलेल्या मिम्समुळे लोक सतत तिला खडेबोल सुनावताना दिसत आहेत. शेवटी आता या प्रकरणात कंगना राणावत हिने स्पष्टीकरण दिले असून माझा हेतू वाईट नसल्याचे तिने स्पष्ट केले आहे. बऱ्याचदा सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्याने कंगना राणावत ही लोकांच्या निशाण्यावर येते.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.