AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | कार्तिक आर्यन आणि क्रिती सेनॉन यांनी गुपचूप उरकले लग्न? व्हिडीओ पाहून चाहते पडले संभ्रमात

क्रिती आणि कार्तिकचा तो व्हिडीओ पाहून अनेकांनी असा थेट अंदाजा बांधला आहे की, कार्तिक आर्यन आणि क्रिती सेनॉन यांनी गुपचूप पध्दतीने लग्न (Marriage) उरकून घेतले.

Video | कार्तिक आर्यन आणि क्रिती सेनॉन यांनी गुपचूप उरकले लग्न? व्हिडीओ पाहून चाहते पडले संभ्रमात
| Updated on: Jan 14, 2023 | 6:01 PM
Share

मुंबई : कार्तिक आर्यन त्याच्या आगामी शहजादा या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. शहजादा या चित्रपटामध्ये कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) याच्यासोबत क्रिती सेनॉन देखील मुख्य भूमिकेमध्ये आहे. शहजादा चित्रपटासोबतच क्रिती सेनॉन आणि कार्तिक आर्यन त्यांच्या व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओमुळे प्रचंड चर्चेत आले आहेत. क्रिती आणि कार्तिकचा तो व्हिडीओ पाहून अनेकांनी असा थेट अंदाजा बांधला आहे की, कार्तिक आर्यन आणि क्रिती सेनॉन यांनी गुपचूप पध्दतीने लग्न (Marriage) उरकून घेतले. क्रिती आणि कार्तिक यांचा तो व्हिडीओ पंजाबमधील आहे. या व्हिडीओमध्ये दोघेही नवीन लग्न केलेल्या जोडप्याप्रमाणे दिसत आहेत. आता हाच व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतोय.

शहजादा हा चित्रपट लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. कार्तिक आर्यन आणि क्रिती सेनॉन यांची जोडी पडद्यावर बघण्यासाठी चाहते आतुर आहेत. मात्र, चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदरच यांचा एक व्हिडीओ चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे.

चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी कार्तिक आर्यन आणि क्रिती सेनॉन हे जालंधरमधील लवली यूनिवर्सिटीमध्ये पोहचले होते. यावेळी यांचे स्वागत खास पध्दतीने करण्यात आले. इतकेच नाहीतर यावेळी लोहड़ी देखील सेलिब्रेट करण्यात आली.

या कार्यक्रमामध्ये कार्तिक आर्यन आणि क्रिती सेनॉन यांना पाहून अनेकांना असे वाटले की, या दोघांनी लग्नच केले आहे की काय? आता हा व्हिडीओ व्हायरल होत असून चाहते यावर मोठ्या प्रमाणात कमेंट करत हा व्हिडीओ शेअर करत आहेत.

एका चाहत्याने या व्हिडीओवर कमेंट करत म्हटले की, मिस्टर आणि मिसेस आर्यन पाहुण्यांना भेटायला गेल्यासारखे दिसत आहेत. दुसऱ्याने म्हटले की, सुरूवातीचे तीन सेकंड मला वाटले की, यांनी लग्नच केले आहे….

एका चाहत्याने तर थेट म्हटले की, हा व्हिडीओ पाहून मला वाटले, इथे लग्नच सुरू आहे…आता कार्तिक आणि क्रिती सेनॉन हाच व्हिडीओ व्हायरल होत असून चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत.

सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....