AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | शहनाज गिल हिचा ‘हा’ व्हिडीओ बघताच चाहत्यांना आली सिद्धार्थ शुक्ला याची आठवण

गेल्या काही दिवसांपासून गुरु रंधावा आणि शहनाज यांचेही अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नुकताच शहनाज गिल हिने एक व्हिडीओ शेअर केलाय.

Video | शहनाज गिल हिचा 'हा' व्हिडीओ बघताच चाहत्यांना आली सिद्धार्थ शुक्ला याची आठवण
| Updated on: Jan 14, 2023 | 5:24 PM
Share

मुंबई : शहनाज गिल हिला बिग बाॅस १३ मधून एक खास ओळख मिळालीये. शहनाज गिल (Shehnaaz Gill) ही लवकरच सलमान खान याच्या चित्रपटामध्ये दिसणार असून बिग बाॅसच्या घरात सहभागी झाल्यानंतर शहनाजच्या चाहत्यांमध्येही मोठी वाढ झालीये. बिग बाॅसच्या घरात असताना शहनाज आणि सिद्धार्थ शुक्ला यांची जोडी हीट ठरली. मात्र, सिद्धार्थ शुक्ला याने अचानकपणे जगाचा निरोप घेतला. सिद्धार्थ शुक्ला याच्या जाण्याने शहनाज गिल हिला मोठा धक्का बसला. सिद्धार्थ शुक्ला याचे चाहते देखील शहनाज गिल हिचा कायम सपोर्ट करतात. गेल्या काही दिवसांपासून गुरु रंधावा आणि शहनाज यांचेही अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

नुकताच शहनाज गिल हिने एक व्हिडीओ शेअर केलाय. हा व्हिडीओ शेअर करून काही तासांच्या आतमध्येच याला 2 लाख 70 हजारांपेक्षा अधिक लाईक मिळाले आहेत. शहनाजचा हा खास व्हिडीओ चाहत्यांना प्रचंड आवडताना दिसत आहे.

या व्हिडीओवर शहनाज गिलचे चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. एकाने हा व्हिडीओवर कमेंट करत म्हटले की, बहुतेक शहनाजला सिद्धार्थ शुक्लाची आठवण येत आहे.

दुसऱ्याने लिहिले की, खूप जास्त छान व्हिडीओ आहे…शहनाज गॉर्जियस…एकाने विचारले की, शहनाज तुझा साऊथमध्ये कधी डेब्यू आहे…म्हणजेच चाहते आता बाॅलिवूड चित्रपटांसोबतच शहनाजला साऊथच्या चित्रपटांमध्ये बघू इच्छित आहेत.

या व्हिडीओमध्ये शहनाज गिल समुद्रकिनारी दिसत आहे. व्हिडीओमध्ये शहनाज गिल हिने काही खास पोज दिल्या आहेत. बिग बाॅसच्या घराबाहेर पडल्यानंतर शहनाज गिल हिने स्वत: मध्ये अनेक बदल केले आहेत.

बिग बाॅसच्या घरात सहभागी होताना शहनाज गिल हिचे वजन जास्त होते. मात्र, बिग बाॅसच्या घराबाहेर पडल्यानंतर तिने वजन कमी केले. शहनाजची फॅन फाॅलोइंग देखील जबरदस्त आहे.

काही दिवसांपूर्वी गुरु रंधावा याने शहनाज गिलसोबतचा एक व्हिडीओ शेअर केला होता. त्याने हा व्हिडीओ शेअर करत म्हटले होते की, अनेकजण म्हणतात, आम्ही दोघेसोबत खूप क्यूट दिसतो…हे खरे आहे का? यावर चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात कमेंट केल्या होत्या.

बिग बाॅस १३ मध्ये दाखल झाल्यानंतर शहनाज गिल हिचे नशीबच बदलले आहेत. अगोदर शहनाज हिला फक्त पंजाबमध्ये ओळखले जायते. मात्र, आता शहनाजचे फॅन संपूर्ण देशामध्ये असून तिच्या आगामी बाॅलिवूड चित्रपटाची वाट पाहात आहेत.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.