काय म्हणता….लग्नानंतर लगेच विकी कौशलला सोडून सलमानकडे परतणार कतरिना कैफ!

अभिनेता विकी कौशलसोबत (Vicky Kaushal) लग्न केल्यानंतर आता कतरिना कैफ (Katrina Kaif) पुन्हा तिच्या व्यावसायिक आयुष्यात बिझी होणार आहे. कतरिना लवकरच सलमान खानसोबत ‘टायगर 3’ या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे.

काय म्हणता....लग्नानंतर लगेच विकी कौशलला सोडून सलमानकडे परतणार कतरिना कैफ!
Katrina-Salman
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Harshada Bhirvandekar

Dec 18, 2021 | 3:34 PM

मुंबई : अभिनेता विकी कौशलसोबत (Vicky Kaushal) लग्न केल्यानंतर आता कतरिना कैफ (Katrina Kaif) पुन्हा तिच्या व्यावसायिक आयुष्यात बिझी होणार आहे. कतरिना लवकरच सलमान खानसोबत ‘टायगर 3’ या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. रशिया, तुर्की, ऑस्ट्रिया आणि मुंबईत शूटिंग केल्यानंतर आता कतरिना आणि सलमान चित्रपटाच्या शेवटच्या शेड्यूलचं शूटिंग पूर्ण करणार आहेत. वृत्तानुसार, चित्रपटाचे शूटिंग पुढील वर्षी जानेवारीमध्ये दिल्लीत होणार आहे.

पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, हे 15 दिवसांचे शूट असेल आणि दोघेही एकत्र चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करतील. सलमान आणि कतरिना दिल्लीच्या रिअल लोकेशनवर शूट करणार आहेत. आता रिअल लोकेशनवर शूटिंग असल्याने चित्रपटाची टीम पूर्ण तयारी करत आहे, कारण तिथे खूप गर्दी होणार आहे आणि कलाकारांना बघून गर्दीही वाढणार आहे. दोघांचे लूक लीक होऊ नयेत यासाठी पूर्ण सुरक्षा तैनात केली जाईल.

चित्रपटाची तयारी सुरू!

रिपोर्ट्सनुसार, रिअल लोकेशन्सवर शूट करणे खूपच आव्हानात्मक आहे. परंतु, आदित्य चोप्रा, मनीश शर्मा आणि चित्रपटाची संपूर्ण टीम हा चित्रपट अधिक चांगला बनवण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाहीये. चित्रपटाला एका वेगळ्या उंचीवर नेण्याची योजना सुरु आहे.

सलमान खान आणि कतरिना कैफ हे दोघेही त्यांचे व्यावसायिक आयुष्य चांगलेच समजून घेतात. दोघांनाही माहित आहे की, हे चित्रपटाचे सर्वात महत्वाचे शेड्यूल आहे, त्यामुळे दोघेही त्यासाठी खूप मेहनत घेत आहेत. या वेळापत्रकासाठी दोघांनाही त्यांच्या फिटनेसचीही काळजी घ्यावी लागणार आहे.

हे 15 दिवसांचे शेड्यूल असेल आणि त्यानंतर चित्रपटाचे शूटिंग संपेल. ‘टायगर 3’ हा फ्रँचायझीचा तिसरा चित्रपट आहे. ‘एक था टायगर’ हा पहिला चित्रपट 2012मध्ये प्रदर्शित झाला होता. यानंतर 2017मध्ये ‘टायगर जिंदा है’ रिलीज झाला. दोन्ही चित्रपट ब्लॉकबस्टर ठरले. आता चाहत्यांना ‘टायगर 3’कडून खूप आशा आहेत.

इमरान हाश्मीही दिसणार महत्त्वपूर्ण भूमिकेत!

या चित्रपटाच्या कास्टमध्ये इमरान हाश्मीचे नावही समोर आले आहे. रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटात इमरान देखील दिसणार आहे. या चित्रपटात तो खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. तथापि, अभिनेता किंवा चित्रपटाच्या निर्मात्यांकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. त्याचवेळी इम्रानला याबाबत विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला की, जर मला सलमान खानसोबत काम करण्याची संधी मिळाली, तर हे त्याच्यासाठी स्वप्न पूर्ण झाल्यासारखे ठरेल. सलमान आणि इम्रानने यापूर्वी कधीही एकत्र काम केलेले नाही.

हेही वाचा :

Miss World 2021 | ‘मिस वर्ल्ड 2021’च्या महाअंतिम सोहळ्यावर कोरोनाचं सावट, मानसा वाराणसीला कोरोनाची लागण!

83 First Movie Review : टीम इंडियाच्या ऐतिहासिक कामगिरीचे सुवर्णक्षण पडद्यावर, 83 इज मास्टरपीस! अभिनयापासून दिग्दर्शनापर्यंत दमदार कामगिरी

RRR : ज्यांच्या जीवनावर RRR चित्रपट बनला, ते ‘अल्लुरी सीताराम राजू’ आणि ‘कोमाराम भीम कोण होते? जाणून घ्या


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें