Khoya Khoya chand | ‘नदिया के पार’च्या ‘गुंजा’ने प्रेक्षकांना घातली भुरळ, छोट्या पडद्यावरही चमकली साधना सिंह!

बॉलिवूडमध्ये असे अनेक हुशार कलाकार आहेत ज्यांनी आपल्या कारकिर्दीत बरेच नाव कमावले, पण ते अचानक मोठ्या पडद्यावरून गायब झाले. यातील एक नाव म्हणजे अभिनेत्री साधना सिंह (Sadhana Singh).

Khoya Khoya chand | ‘नदिया के पार’च्या ‘गुंजा’ने प्रेक्षकांना घातली भुरळ, छोट्या पडद्यावरही चमकली साधना सिंह!
साधना सिंह
Follow us
| Updated on: Jul 20, 2021 | 9:54 AM

मुंबई : बॉलिवूडमध्ये असे अनेक हुशार कलाकार आहेत ज्यांनी आपल्या कारकिर्दीत बरेच नाव कमावले, पण ते अचानक मोठ्या पडद्यावरून गायब झाले. यातील एक नाव म्हणजे अभिनेत्री साधना सिंह (Sadhana Singh). साधना सिंहचे नाव घेताच चाहत्यांना ‘नदिया के पार’ हा सुपरहिट चित्रपट आठवेल. साधना ‘नदिया के पार’मध्ये ‘गुंजा’च्या भूमिकेत दिसली होती.

आपल्या पहिल्याच चित्रपटातून चाहत्यांच्या हृदयात घर करणारी साधना सिंह चाहत्यांच्या मनावर राज्य करायची. या अभिनेत्रीने तिच्या कारकीर्दीत बर्‍याच चित्रपटांमध्ये काम केले. पण चाहत्यांच्या पसंतीस उतरलेली ही अभिनेत्री आता प्रसिद्धीपासून दूर आहे.

‘नदियो के पार’मधून मिळाली प्रसिद्धी

आपल्या गो स्मित हास्याने सर्वांना वेड लावणारी अभिनेत्री साधना सिंहने ‘नादिया के पार’ मध्ये गुंजाची भूमिका साकारली होती. एका छोट्या खेड्यावर आधारित हा चित्रपट चाहत्यांमध्ये चांगलाच गाजला होता. चाहत्यांनी चित्रपटावर जेवढे प्रेम केले होते, तेवढेच प्रेम साधनालाही मिळाले.

कसा मिळाला चित्रपट?

माध्यमांच्या वृत्तानुसार, साधना सिंह एकदा तिच्या बहिणीसमवेत चित्रपटाचे शूटिंग पाहण्यासाठी गेली होती, तिथे सूरज बड़जात्याने तिचे लक्ष वेधले गेले. अशा परिस्थितीत सूरजने थेट आपल्या आगामी चित्रपटासाठी साधनाची निवड केली होती.

पहिल्याच चित्रपटातून प्रसिद्धी!

साधना अजूनही ‘नदियो के पार’मधील गुंजाच्या रूपाने लोकांच्या हृदयावर राज्य करते. हा चित्रपट सुपर-डुपर हिट झाला. एक वेळ असा होता की साधना जिथे जात असे, तिथे लोक तिला ‘गुंजा’ या नावाने हाक मारत. मीडिया रिपोर्टनुसार साधनाला गाण्याबरोबरच अभिनयाची आवड होती.

चित्रपटांपासून झाली दूर

‘नदियो के पार’ या चित्रपटानंतर साधना सिंह बर्‍याच चित्रपटांमध्ये दिसली, पण पुन्हा दुसर्‍या कोणत्याही चित्रपटात तिला अधिक प्रसिद्धी मिळाली नाही. ‘नदियो के पार’नंतर साधना ‘तुलशी’, ‘औरत’, ‘ससुराल’, ‘पत्थर’ आणि ‘पापी संसार’ अशा बर्‍याच चित्रपटांमध्ये दिसली होती.

चित्रपटांमध्ये जास्त यश न मिळाल्यामुळे अचानक साधनाने स्वतःला चित्रपटाच्या झगमगाटापासून दूर केले. चित्रपट विश्वाचा निरोप घेऊन अभिनेत्रीने चित्रपट निर्माता राजकुमार शहाबादीशी लग्न केले. आता ती तिच्या विवाहित जीवनात व्यस्त झाली आहे.

चित्रपटांपासून बरीच वर्षे दूर राहिल्यानंतर अभिनेत्रीने टीव्ही जगात पुनरागमन केले. अभिनेत्री साधना सिंह ‘किस देश में है मेरा दिल’, ‘फुलवा’, ‘संतोषी मां’ या टीव्ही कार्यक्रमात दिसली आहे.

(Khoya Khoya chand Nadiyon ke paar fame Actress Sadhana Singh also worked in tv serials)

हेही वाचा :

डॉक्टरांचा कोट, चेहऱ्यावर खट्याळ हसू, ‘डॉक्टर जी’मधील आयुष्मान खुरानाचा ‘फर्स्ट लुक’ रिलीज!

Indian Idol 12|अटी-तटीच्या सामना अन् शेवटच्या टप्प्यात पवनदीप गाण्याचे बोलच विसरला! एक चूक महागात पडणार?

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.