लब्बाड कियारा, सिद्धार्थ मल्होत्रासोबत ट्रीपला आणि कॅप्शनमध्ये म्हणते एकटीच?

बॉलिवूड सेलिब्रिटींनी यंदा नवीन वर्षाचे जोरदार स्वागत केले आहे.

लब्बाड कियारा, सिद्धार्थ मल्होत्रासोबत ट्रीपला आणि कॅप्शनमध्ये म्हणते एकटीच?

मुंबई : बॉलिवूड सेलिब्रिटींनी यंदा नवीन वर्षाचे जोरदार स्वागत केले आहे. बऱ्याच जणांनी आपल्या कुटुंबासोबत नवीन वर्षाचे स्वागत केले तर काहीजण नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी बाहेर गेले. कियारा अडवाणी (Kiara Advani) आणि सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) हे नवीन वर्ष साजरे करण्यासाठी मालदीवमध्ये गेले आहेत. दोघांनीही मालदीवमधील त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केले आहेत. (Kiara Advani and Siddharth Malhotra in Maldives)

नुकताच कियाराने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केले आहे ज्यामध्ये ती सिद्धार्थ मल्होत्रासोबत मालदीवमध्ये असल्याचे वृत्त चुकीचे आहे सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. तिने इंस्टावर एक अतिशय छोटा व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये कियारा हसताना दिसत आहे. व्हिडिओ शेअर करताना कियाराने लिहिले की, ‘जेव्हा तुम्ही एकटे असता आणि स्वतःच तुम्हाला तुमचे फोटो घ्यावे लागतात.

Kiara Advani

सिद्धार्थ मल्होत्रा ​​व्यतिरिक्त कियारा अडवाणी, ईशान खट्टर आणि अनन्या पांडे देखील मालदीवमध्ये आहेत. बॉलिवूडमधील सेलिब्रिटींनी मालदीवमध्ये खूप मजा करत आहेत. त्याची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. कियारा आणि सिद्धार्थ कधीही त्यांच्या नात्याबद्दल खुलेपणाने बोलत नाहीत पण बर्‍याचदा एकत्र वेळ घालवतानाही दिसतात. कपिल शर्माने जेव्हा कियाराला आपल्या शोमधील नात्याबद्दल विचारले तेव्हा ती म्हणाले की होती की, मी माझ्या रिलेशनबद्दल तेंव्हाच सांगेल जेंव्हा मी लग्न त्या व्यक्तीसोबत लग्न करेल.

संबंधित बातम्या : 

ड्रग्ज केसमध्ये फसलेल्या अर्जुनसोबत कंगनाची पार्टी, चिडलेल्या प्रेक्षकांची चित्रपटावर बहिष्कार घालण्याची धमकी!

Ancestral House | दिलीप कुमार-राज कपूर यांचं वडिलोपार्जित घर बनणार म्यूजियम, इतक्या कोटींना संपत्ती विकणार!

(Kiara Advani and Siddharth Malhotra in Maldives)

Published On - 10:50 am, Sun, 3 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI