मुंबईत बॉलिवूड अभिनेत्रीवर बलात्कार; कास्टिंग डायरेक्टरविरोधात गुन्हा दाखल

या अभिनेत्रीच्या तक्रारीनुसार पोलिसांनी कलम 376 अतंर्गत गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली आहे. | Casting director accused of raping

  • ब्रिजनभान जैसवार, टीव्ही 9 मराठी, मुंबई
  • Published On - 23:31 PM, 29 Nov 2020
Rape on bollywood actress in Mumbai Versova Police file FIR against casting director Aayush Tiwari

मुंबई: गेल्या काही दिवसांत ड्रग्ज रॅकेटशी संबंध असल्यावरुन प्रतिमा डागाळलेल्या बॉलिवूड (Bollywood) इंडस्ट्रीच्या नावाला पुन्हा एकदा काळिमा फासला गेला आहे. मुंबईतील एका अभिनेत्रीवर कास्टिंग डायरेक्टरकडून बलात्कार झाल्याची माहिती पुढे येत आहे. याप्रकरणी मुंबईच्या वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Casting director accused of raping bollywood actress)

प्राथमिक माहितीनुसार, बॉलिवूडमधील कास्टिंग डायरेक्टर आयुष तिवारीवर (Aayush Tiwari) एका अभिनेत्रीने बलात्काराचा आरोप केला आहे. या अभिनेत्रीने वर्सोवा पोलीस ठाण्यात आपला जबाब नोंदवला. या अभिनेत्रीच्या तक्रारीनुसार पोलिसांनी कलम 376 अंतर्गत गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली आहे.

तक्रारीत म्हटल्याप्रमाणे आयुष तिवारीने संबंधित अभिनेत्रीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अनेकवेळा आणि वेगवेगळ्या ठिकाणी बलात्कार केला. पोलीस सध्या याप्रकरणाचा तपास करत आहेत. मात्र, आयुष तिवारीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

अभिनेता अक्षय कुमार याच्या आगामी ‘बेल बॉटम’ चित्रपटासाठी आयुष तिवारी कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम बघत होता. तर पीडित तरुणीने आतापर्यंत अनेक चित्रपट आणि वेब सिरीजमध्ये काम केले आहे. पोलिसांनी आयुष तिवारी याचा मित्र राकेश शर्मा याच्यावरही बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकारामुळे बॉलिवूड इ्ंडस्ट्रीची प्रतिमा आणखी डागाळण्याची शक्यता आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येमुळे अनेक दिग्दर्शक आणि कलावंत वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. यावेळी बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शनचा पर्दाफाश झाला होता. बॉलिवूडमधील अनेक कलाकार ड्रग्ज सेवन करत असल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे कधी नव्हे ती बॉलिवूडची प्रतिमा प्रचंड मलीन झाली आहे.

इतर बातम्या:

संगीतकार वाजिदच्या निधनानंतर पत्नीचे सासरवर गंभीर आरोप, कंगनाचा पंतप्रधानांना प्रश्न

बंगालमधून फसवून आणून चिपळूणमध्ये वेश्या व्यवसाय, दोन मुलींची थरारक सुटका

घरात झोपलेली असताना 90 वर्षीय वृद्धेवर अतिप्रसंग, नराधमाला अटक

कल्याणजवळ थरार, विनयभंगानंतर तरुणीला धावत्या लोकलमधून फेकण्याचा प्रयत्न, तरुणीचा जिगरबाज लढा

(Casting director accused of raping bollywood actress)