KK च्या आठवणीत पत्नीने काढली सुंदर पेंटिंग; ‘मिस यू’ म्हणत व्यक्त केल्या भावना

ज्योती या पेशाने चित्रकार आहेत. केके यांच्या निधनानंतर त्यांनी काही काळ पेंटिंग काढणं थांबवलं होतं. आता पुन्हा एकदा त्यांनी चित्र काढायला सुरुवात केली असून त्यांनी केकेसोबतचीच सुंदर पेंटिंग काढली आहे.

KK च्या आठवणीत पत्नीने काढली सुंदर पेंटिंग; 'मिस यू' म्हणत व्यक्त केल्या भावना
KK च्या आठवणीत पत्नीने काढली सुंदर पेंटिंगImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 15, 2022 | 8:30 AM

दिवंगत गायक केके (singer KK) यांच्या पत्नी ज्योती कृष्णा (Jyothy Krishna) यांनी गुरुवारी सोशल मीडियावर एका पेंटिंगचा (painting) फोटो पोस्ट केला. ही पेंटिंग त्यांनी स्वत: काढली आहे. ज्योती या पेशाने चित्रकार आहेत. केके यांच्या निधनानंतर त्यांनी काही काळ पेंटिंग काढणं थांबवलं होतं. आता पुन्हा एकदा त्यांनी चित्र काढायला सुरुवात केली असून त्यांनी केकेसोबतचीच सुंदर पेंटिंग काढली आहे. 31 मे रोजी कोलकातामधील नझरुल मंच इथल्या एका कॉलेज फेस्टिव्हलदरम्यान परफॉर्म करताना केकेला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं होतं. केके 53 वर्षांचा होता.

‘पुन्हा चित्र काढण्याचा प्रयत्न करतेय, मिस यू स्वीटहार्ट’, असं कॅप्शन देत त्यांनी पेटिंगचा फोटो पोस्ट केला. त्यांच्या या पोस्टवर अनेकांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला. ‘केके नेहमीच आमच्या हृदयात आणि तुमच्या पेंटिंगमध्ये जिवंत राहतील’, असं एकाने लिहिलं. तर ‘खरं प्रेम कधीच मरत नाही’, असं दुसऱ्याने म्हटलं. केके आणि ज्योती यांनी 1991 मध्ये लग्नगाठ बांधली. तेव्हा केके यांनी गायक म्हणून त्यांच्या करिअरची सुरुवातसुद्धा केली नव्हती. दोघं लहानपणापासून एकमेकांचे खास मित्र होते. सहावीत असताना केके हे पहिल्यांदा ज्योती यांना भेटले होते. केके आणि ज्योती यांना नकुल आणि तामरा ही दोन मुलं आहेत.

हे सुद्धा वाचा

मे 31 रोजी कोलकातामधील नझरुल मंच इथल्या गुरुदास कॉलेजमध्ये केके यांना परफॉर्म करण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. जवळपास तासभर विद्यार्थ्यांसमोर परफॉर्म केल्यानंतर अचानक त्यांच्या छातीत दुखू लागलं होतं. हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचं निधन झालं.

केके यांनी हिंदीसोबतच तमिळ, तेलुगू, कन्नड आणि बंगाली भाषेतही गाणी रेकॉर्ड केली होती. त्यांनी शास्त्रीय संगीताचं प्रशिक्षण घेतलं नव्हतं. दुसऱ्यांची गाणी ऐकत, शिकत त्यांनी आपला प्रवास सुरू केला. 1994 मध्ये मुंबईत आलेल्या केके यांना संगीतकार-गायक लेस्ली लेवीस यांनी संधी दिली. एकाच वर्षी प्रदर्शित झालेल्या केके यांच्या ‘पल’ आणि ‘तडप तडप के’ या गाण्यांनी अभूतपूर्व यश मिळविला.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.