AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nora Fatehi Net Worth : कमाईतही सर्वात ‘भारी’ नोरा फतेही, अँडोर्समेंट आणि आयटम साँग्समधून कमावली ‘इतकी’ संपत्ती!

बॉलिवूडची सध्याची टॉप डान्सर नोरा फतेही (Nora Fatehi) हिने आज स्वत:च्या कलेने आपले नाव कमावले आहे. अभिनेत्री तिच्या आयटम साँग्ससाठी बरीच प्रसिद्ध आहे. डान्सर आणि अभिनेत्री असणाऱ्या नोराचा जन्म कॅनडामध्ये झाला होता.

Nora Fatehi Net Worth : कमाईतही सर्वात ‘भारी’ नोरा फतेही, अँडोर्समेंट आणि आयटम साँग्समधून कमावली ‘इतकी’ संपत्ती!
नोरा फतेही
| Edited By: | Updated on: Jun 22, 2021 | 9:34 AM
Share

मुंबई : बॉलिवूडची सध्याची टॉप डान्सर नोरा फतेही (Nora Fatehi) हिने आज स्वत:च्या कलेने आपले नाव कमावले आहे. अभिनेत्री तिच्या आयटम साँग्ससाठी बरीच प्रसिद्ध आहे. डान्सर आणि अभिनेत्री असणाऱ्या नोराचा जन्म कॅनडामध्ये झाला होता. तिची स्टाईल पाहताच तिचे चाहते मंत्रमुग्ध होतात. हार्डी संधूच्या ‘नाह’ (Naah)  या गाण्याद्वारे नोरा फतेहीने इंडस्ट्रीमध्ये जोरदार एंट्री केली. या गाण्यातील नोराच्या अदा पाहून प्रत्येकजण तिचा दिवाना झाला. अभिनेत्रीचे हे गाणे हिट ठरताच, ती टी-सीरीजच्या अनेक गाण्यांमध्ये दिसू लागली. नोराला बर्‍याच वेळा सर्वोत्कृष्ट डान्सरचा पुरस्कारही मिळाला आहे. या सर्वांतून तिने आतापर्यंत नावाबरोबरच संपत्तीदेखील कमावली आहे (Know about actress Nora Fatehi Net Worth).

फिल्मसियाप्पा डॉट कॉमच्या माहितीनुसार नोरा फतेही एका गाण्यात काम करण्यासाठी तब्बल 40 लाख रुपये घेते. बॉलिवूड आणि पंजाबी इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या कोणत्याही मॉडेलपेक्षा हे जास्त आहे. इतकेच नाही तर अभिनेत्रीचे ‘गर्मी’ हे गाणे सोशल मीडियावर सुपरहिट झाले आहे. त्यानंतर तिने आपली फी देखील वाढवली होती.

सोशल मीडियावर ब्रँडची जाहिरात करण्यासाठी नोरा 5 लाख रुपये मानधन आकारते. एवढ्या कमी कालावधीत नोराने बॉलिवूडमधील अनेक मोठ्या स्टार्सबरोबर काम केले आहे. ज्यात वरुण धवन, श्रद्धा कपूर, नेहा कक्कर आणि जॉन अब्राहमसह अनेक बड्या स्टार्सचा समावेश आहे.

नोराचा नेट वर्थ

नोरा आज बॉलिवूडची सर्वाधिक मागणी करणारी अभिनेत्री बनली आहे. ज्यामुळे तिच्या हातात सतत काम असते. अभिनेत्रीची एकूण संपत्ती जवळपास दीड दशलक्ष डॉलर्स इतकी आहे. जर, आपण ही रक्कम रुपयांमध्ये पाहायला गेलो, तर ही रक्कम 12 कोटी इतकी आहे. अभिनेत्री सतत चर्चेत राहते आणि काम करत असते. नोरा दरवर्षी 2 कोटी रुपये कमवते. तिने नुकतेच एका चित्रपटाचे चित्रीकरणही केले आहे. ज्यामुळे आता अभिनेत्रीची कमाई दर वर्षी वाढत आहे.

नोराची कारकीर्द

नोराने बॉलिवूडमध्ये तसेच कन्नड आणि तेलगू चित्रपटांमध्ये बरेच काम केले आहे. सुरुवातीला, तिला काम करण्यात खूप अडचण होती. परंतु, तिने कधीही हार मानली नाही आणि नेहमीच कामासाठी कठोर परिश्रम केले. नोराच्या कुटुंबात तिचे आईवडील आणि एक भाऊ आहे. आपल्या धमाकेदार आयटम साँग्समुळे तिने बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. ज्यामुळे तो आजही खूप लोकप्रिय आहे.

(Know about actress Nora Fatehi Net Worth)

हेही वाचा :

Photo : ब्लॅक ड्रेसमध्ये मौनी रॉयचा ग्लॅमरस अंदाज, पाहा फोटो

World Music Day 2021 : ‘सावनी रविंद्र’कडून चाहत्यांना खास भेट!, नवं मल्याळम गाणं रिलीज

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.