Maharashtra Lockdown | महाराष्ट्रातील लॉकडाऊन पाळण्यास मनोरंजन विश्व तयार, मुख्यमंत्र्यांसमोर ठेवली ‘ही’ अट

कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे महाराष्ट्रात 15 दिवस लॉकडाऊन लादण्यात आला आहे. या लॉकडाऊनमुळे अनेक चित्रपटांचे शूटींग थांबवण्यात आले आहे, ज्यामुळे या चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या लोकांच्या रोजच्या भाकरीवर देखील संकट उभे राहिले आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 10:25 AM, 15 Apr 2021
Maharashtra Lockdown | महाराष्ट्रातील लॉकडाऊन पाळण्यास मनोरंजन विश्व तयार, मुख्यमंत्र्यांसमोर ठेवली ‘ही’ अट
महाराष्ट्र लॉकडाऊन

मुंबई : कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे महाराष्ट्रात 15 दिवस लॉकडाऊन लादण्यात आला आहे. या लॉकडाऊनमुळे अनेक चित्रपटांचे शूटींग थांबवण्यात आले आहे, ज्यामुळे या चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या लोकांच्या रोजच्या भाकरीवर देखील संकट उभे राहिले आहे. दरम्यान, 15 दिवसांच्या लॉकडाऊन नियमांचे पालन करण्यास फिल्म इंडस्ट्रीने सहमती दर्शवल्याची बातमी समोर आली आहे. परंतु, त्याचवेळी त्यांनी महाराष्ट्रचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray ) यांच्याकडेही एक मागणी केली आहे (Maharashtra Lockdown film industry FWICE ready to abide lockdown urges demand to CM).

चित्रपटसृष्टीतील लोकांना असे वाटते की, मुख्यमंत्री ठाकरे यांनी ज्याप्रमाणे रिक्षाचालक आणि बांधकाम कामगारांना आर्थिक सहाय्य करण्याचे वचन दिले आहे, त्याचप्रमाणे चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या दैनंदिन वेतन कामगारांनाही त्यांनी आर्थिक सहाय्य करण्याचे आश्वासन दिले पाहिजे. मीडिया रिपोर्टनुसार, फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्पायरशी (FWICE) संबंधित अशोक दुबे म्हणाले की, आम्ही कर्फ्यूचे पालन करणार आहोत. 30 एप्रिलपर्यंत सर्व शुटींग थांबवण्यात आले आहे. परंतु, सरकारने आमच्या दैनंदिन वेतन कामगारांना आर्थिक मदत करावी, अशी आमची इच्छा आहे.

रोजंदारीवरील कामगारांची अन्नाला भ्रांत

ते म्हणाले की, आमच्याकडे एक संपूर्ण यादी आहे, ज्यामध्ये सर्व बँक खात्यांचा तपशील देण्यात आला आहे. आम्ही ही यादी सरकारला देऊ शकतो. जर शूटिंग थांबले किंवा बंद पडले असेल, तर या उद्योगातील रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांची भाकरी देखील धोक्यात आहेत. आम्हाला दुसर्‍या स्थलांतरणाची परिस्थिती नको आहे, म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की, त्यांनी आपल्या उद्योगातील कामगारांना इतर क्षेत्रात ज्या प्रकारे मदत केली आहे, त्याच प्रकारे मदत करावी (Maharashtra Lockdown film industry FWICE ready to abide lockdown urges demand to CM).

लॉकडाऊनमुले थांबलेली कामे पुन्हा सुरु होऊ द्या!

यासह अशोक दुबे यांनी असेही म्हटले आहे की, लॉकडाऊनमुळे ज्या सेटचे काम मध्यभागी सोडले आहे, त्यांना सरकारने पुन्हा एकदा सेट उभारण्याची परवानगी द्यावी, अशी आमची इच्छा आहे. सेटवर काम करणारे आमचे लोक काम पूर्ण होईपर्यंत तिथेच राहतील आणि कोरोनाच्या योग्य निकषांचेदेखील पालन करतील याची आम्ही खात्री देऊ.

मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणात म्ह्नातले होते की, लॉकडाऊन कालावधीत रिअल इस्टेट क्षेत्रातील लोक आपले काम नियमितपणे करू शकतील. परंतु, बांधकाम खेत्रात कामे करणार्‍या कामगारांना त्या जागेवरच रहावे लागेल, अशी अट आहे. या कारणास्तव, चित्रपटसृष्टीतही असेच नियम लावून, त्यांचे देखील काम अशाप्रकारे सुरू राहू द्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे.

(Maharashtra Lockdown film industry FWICE ready to abide lockdown urges demand to CM)

हेही वाचा :

गाणं गायल्यावरच भीक मिळायची, नंतर अख्ख्या देशाला आपल्या गाण्याने वेड लावलं; वाचा, ‘या’ गायकाचा किस्सा!

‘चंद्र आहे साक्षीला’नंतर सुबोध भावे पुन्हा सिनेमाकडे, बालगंधर्वांचे नाटक रुपेरी पडद्यावर