Video | मलायका अरोरा, अर्जुन कपूरसह मालदीवला! पूलमध्ये रोमान्सऐवजी घाम गाळताना पाहून चाहते म्हणतायत…

बॉलिवूडचे हॉट कपल अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) आणि अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) हे कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत चर्चेत असतात. सध्या हे दोन्ही लव्ह बर्ड्स मालदीवमध्ये आहेत, जिथे ते एकमेकांसोबत चांगला वेळ घालवत आहेत.

Video | मलायका अरोरा, अर्जुन कपूरसह मालदीवला! पूलमध्ये रोमान्सऐवजी घाम गाळताना पाहून चाहते म्हणतायत...
Malaika-arjun

मुंबई : बॉलिवूडचे हॉट कपल अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) आणि अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) हे कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत चर्चेत असतात. सध्या हे दोन्ही लव्ह बर्ड्स मालदीवमध्ये आहेत, जिथे ते एकमेकांसोबत चांगला वेळ घालवत आहेत. दरम्यान, अर्जुन कपूरने मलायकासोबतचा पूल वर्कआऊटचा एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये दोघेही धमाल करताना दिसत आहेत.

या व्हिडीओमध्ये मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर पूलमध्ये सायकल चालवताना दिसत आहेत. ही सायकल व्यायामाची सायकल आहे, जी जिममध्ये व्यायामासाठी वापरली जाते. एकाच सायकलवर स्वार होऊन हे दोन कलाकार वेगवेगळे व्यायाम करत आहेत आणि ते एकत्र खूप आनंदी दिसत आहेत.

पाहा व्हिडीओ :

 

View this post on Instagram

 

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor)

अर्जुन कपूर मलायकाला म्हणाला ‘टफ टास्कमास्टर’

अर्जुन कपूरने हा व्हिडीओ इंस्टाग्रामच्या अधिकृत अकाऊंटवर शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना अर्जुन कपूरने कॅप्शनमध्ये लिहिले- ‘जेव्हा तुमची गर्लफ्रेंड जास्त कडक टास्क मास्टर असते… मी सुट्टीतही व्यायाम करतोय.’ तर या व्हिडीओवर अर्जुनच्या फिटनेस ट्रेनरनेही कमेंट केली आहे. तो म्हणाला, ‘हे पाहून सगळ्यात जास्त आनंद मला झाला आहे. मलायका तुझे खूप खूप आभार!’ काही चाहते देखील यावर कमेंट करत, त्याला रोमान्स ऐवजी वर्कआऊट करायला लागल्याबद्दल चुकचुकत आहेत.

बऱ्याच काळापासून एकमेकांना करतायत डेट!

अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. हे दोघे अनेकदा सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत असतात आणि कधी-कधी ते रेस्टॉरंट आणि पार्ट्यांमध्ये एकत्र दिसतात. पण या दोघांचे फोटो आणि व्हिडीओ पाहून असे म्हणता येईल की, ते दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करतात आणि एकमेकांसोबत एन्जॉय करतात.

ब्रेकअपच्या चर्चा!

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर बरेच दिवस एकमेकांशी बोलत नसल्याच्या आणि त्यांचा ब्रेकअप झाल्याच्या बातम्या चर्चेत आल्या होत्या. या दरम्यान दोघेही क्वचितच एकत्र दिसले होते. अशा परिस्थितीत आता त्यांचे मार्ग वेगळे झाल्याचा अंदाज चाहत्यांकडून बांधला जात होता. पण आता दोघांना एकत्र सुट्टी घालवताना पाहून, त्यांच्या ट्रोलर्सच्या तोंडाला कुलूप लागले आहे.

वर्कफ्रंट

अभिनेता अर्जुन कपूर नुकताच ‘भूत पोलिस’ या चित्रपटात दिसला होता. लवकरच तो ‘एक व्हिलन रिटर्न्स’मध्येही दिसणार आहे. तर, अभिनेत्री मलायका अरोरा डान्स रियालिटी शो ‘इंडियाज बेस्ट डान्सर 2’ला जज करताना दिसली होती.

हेही वाचा :

Bigg Boss Marathi 3 | Shocking! मांजरेकर म्हणाले मीराचा प्रवास संपला, दाराबाहेर जाता-जाता…

Jacqueline Fernandes | मनी लाँड्रिंग प्रकरण : जॅकलिन फर्नांडिसला भारत सोडण्यास बंदी, ईडीने जारी केली लुकआउट नोटीस


Published On - 10:31 am, Mon, 6 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI