Bigg Boss Marathi 3 | Shocking! मांजरेकर म्हणाले मीराचा प्रवास संपला, दाराबाहेर जाता-जाता…

अखेर बॉटम 2 मध्ये गायत्री दातार (Gayatri Datar) आणि मीरा जगन्नाथ उरल्या. त्यानंतर गायत्री सेफ असल्याचं मांजरेकरांनी जाहीर केलं आणि मीराच्या अश्रूंचा बांध फुटला. मीराचा प्रवास इथेच संपला, असं मांजरेकर म्हणाले. त्यासोबतच जयही रडायला लागला. तर रडवेला झालेला उत्कर्ष तिच्या बाजूला बसून धीर देऊ लागला.

Bigg Boss Marathi 3 | Shocking! मांजरेकर म्हणाले मीराचा प्रवास संपला, दाराबाहेर जाता-जाता...
मीरा जगन्नाथ, बिग बॉस मराठी सीझन 3
Follow us
| Updated on: Dec 06, 2021 | 9:41 AM

मुंबई : ‘बिग बॉस मराठी 3’ ची (Bigg Boss Marathi 3) स्पर्धा अंतिम टप्प्याच्या दिशेने प्रवास करत असताना चुरस वाढत चालली आहे. गेल्या आठवड्यात स्पर्धकांचे कुटुंबीय त्यांना घरी भेटायला आले होते. यावेळी नॉमिनेशन प्रक्रिया झाल्यानंतरही व्होटिंग लाईन्स बंद ठेवण्यात आल्या होत्या. मात्र स्पर्धकांना याविषयी माहिती नसल्याने सूत्रसंचालक महेश मांजरेकर (Mahesh Manjarekar) यांनी सगळ्यांची फिरकी घ्यायचं ठरवलं. मीरा जगन्नाथ (Meera Jagannath) स्पर्धेतून बाहेर झाल्याची घोषणा मांजरेकरांनी केली, मात्र दरवाजातून बाहेर जाण्याची वेळ येताच तिला फसवल्याचं सांगण्यात आलं.

जय-मीराची खरडपट्टी

‘बिग बॉस मराठी 3’ची चावडी दर शनिवार-रविवारी रंगते. दर आठवड्याप्रमाणेच महेश मांजरेकरांनी स्पर्धकांची शाळा घेतली. जय दुधाणे (Jay Dudhane) आणि मीरा जगन्नाथ या दोघांना मांजरेकरांनी धारेवर धरलं होतं. आठवड्याभरातील वर्तनावर बोट ठेवत मांजरेकर यांनी जयची चांगलीच खरडपट्टी काढली. तसंच मीरालाही महेश मांजरेकरांनी खडे बोल सुनावले. तर या आठवड्याच्या टॉप 3 मध्ये विशाल निकम (Vishal Nikam), उत्कर्ष शिंदे (Utkarsh Shinde) आणि मीनल शाह (Meenal Shah) हे खेळाडू वाटत असल्याचं मत मांजरेकरांनी मांडलं.

टॉप 8 स्पर्धकांचा टास्क

रविवारच्या दिवशी मांजरेकरांनी एक टास्क दिला होता. यामध्ये टॉप 8 स्पर्धकांपैकी कोणत्याही दोन सदस्यांची नावं बदलून एलिमिनेट झालेल्या स्पर्धकांची नावं ठेवण्याची संधी देण्यात आली होती. सर्वप्रथम मीराने विशाल निकमच्या जागी दादूस अर्थात संतोष चौधरी (Santosh Chaudhari) यांचा फोटो लावला. हे पाहून विशालने स्मितहास्य केलं, तर मांजरेकर खो-खो हसत सुटले. दादूस विशालपेक्षा जास्त अॅक्टिव्ह होते आणि मनोरंजन करायचे, तर विशाल आक्रमकपणे खेळत असून त्याचा उद्देश फक्त इतरांना दुखापत करण्याचा असतो, असा दावा तिने केला.

महेश मांजरेकरांचं प्रँक

एलिमिनेशनची वेळ जवळ आली तशी सर्वांचीच धाकधूक वाढली होती. मीनल शाह आणि विकास पाटील (Vikas Patil) हे दर आठवड्याचे मेंबर्स आहेत, असं मांजरेकर गमतीने म्हणाले. त्यानंतर दोघांनाही सेफ करण्यात आलं. तिसऱ्या क्रमांकावर सोनाली पाटील (Sonali Patil) सुरक्षित झाली. अखेर बॉटम 2 मध्ये गायत्री दातार (Gayatri Datar) आणि मीरा जगन्नाथ उरल्या. त्यानंतर गायत्री सेफ असल्याचं मांजरेकरांनी जाहीर केलं आणि मीराच्या अश्रूंचा बांध फुटला. मीराचा प्रवास इथेच संपला, असं मांजरेकर खोटं-खोटं म्हणाले. त्यासोबतच जयही रडायला लागला. तर रडवेला झालेला उत्कर्ष तिच्या बाजूला बसून धीर देऊ लागला.

मीराने दारावरची पाटी काढून मुख्य दरवाजाकडे कूच केली. यावेळी घरातील सर्व सदस्यांनी मिठ्या मारुन तिचा निरोप घेतला. चर्चा फक्त तुझ्याच नावाची असेल, तू या घराची स्टार असेल, असं म्हणत विकासने तिला धीर दिला. तर गायत्रीनेही ‘गिले-शिकवे’ मिटवून घराबाहेर पडल्यानंतर मासे खायला येणार असल्याचं सांगितलं. शेवटी दरवाजा उघडला, मीरा निघणार तोच बाहेरुन एक कार्ड तिला देण्यात आलं, ज्यावर लिहिलं होतं ‘फसवलं’. सगळे सदस्य धावत घरात गेले आणि मांजरेकरांनी या आठवड्यात एलिमिनेशन नसल्याचा बॉम्ब फोडला. मीरा तुला या घरातून कसं बाहेर काढणार, असं म्हणत तिच्या टॉप 5 मध्ये असण्याचे संकेतच जणू मांजरेकरांनी दिले.

संबंधित बातम्या :

Jacqueline Fernandes | मनी लाँड्रिंग प्रकरण : जॅकलिन फर्नांडिसला भारत सोडण्यास बंदी, ईडीने जारी केली लुकआउट नोटीस

BanLipstick | प्राजक्ता माळी का म्हणाली मला लिपस्टिकचा रंग नकोय, मला लिपस्टिक आवडत नाही, बॅन लिपस्टिक

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.