AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अस्थी सावडल्यानंतर मल्हार पाटेकर यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, शेवटी…

अभिनेता नाना पाटेकर यांच्या निधनानंतर आज अस्थी सावडण्याचा कार्यक्रम झाला. यावेळी कुटुंबातील मोजकेच मंडळी उपस्थित होते. अस्थी सावडल्यानंतर नाना पाटेकर यांचे चिरंजीव मल्हार पाटेकर यांनी मीडियाशी संवाद साधला. नाना पाटेकर यांचं सामाजिक कार्य अखंडपणे सुरूच ठेवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

अस्थी सावडल्यानंतर मल्हार पाटेकर यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, शेवटी...
Malhar PatekarImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 09, 2026 | 2:29 PM
Share

अभिनेता नाना पाटेकर यांचं काल निधन झाल्यानंतर रात्री उशिरा त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले. त्यानंतर आज त्यांच्या अस्थी सावडण्याचा कार्यक्रम होता. यावेळी कुटुंबातील मोजकेच मंडळी उपस्थित होते. वडील जाण्याच्या दु:खातून मल्हार पाटेकर हे अद्याप सावरलेले नाहीत. अस्थी सावडल्यानंतर त्यांनी मीडियाशी प्रतिक्रिया दिली. नानांचा मृत्यू हार्ट अटॅक आल्याने झाल्याचं आम्हाला हॉस्पिटलमधून सांगण्यात आलं. अजून आम्ही माहिती घेतलेली नाही, असं मल्हार पाटेकर यांनी स्पष्ट केलं.

गोवा पोलिसांनी नानांच्या मृत्यूची अनैसर्गिक मृत्यू अशी नोंद केली आहे. त्यावर बोलताना मल्हार पाटेकर म्हणाले की, मला यातलं काहीच माहीत नाही. माझ्या कानावर तसं काही आलं नाही. माझा भाऊ अमेय हा पोलिसांच्या संपर्कात होता. आता इथे घरीच आहे.

हॉस्पिटलमधूनच माहिती मिळेल

नाना पाटेकर यांचा मृत्यू नेमका कशाने झाला? यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. नानांचा मृत्यू हार्ट अटॅकने झाल्याचं आम्हाला सांगितलं गेलं. पण शेवटी हॉस्पिटलमध्ये सर्व काही बघूनच नेमकं कारण आम्हाला कळेल, असं मल्हार यांनी स्पष्ट केलं.

काम थांबलं नाही पाहिजे…

यावेळी त्यांनी नाना पाटेकर यांचं सामाजिक कार्य सुरूच ठेवणार असल्याचं स्पष्ट केलं. नाम फाऊंडेशन, पाणी फाऊंडेशनमार्फत शेतकऱ्यांसाठी काम सुरू आहे. आता आपण बोलतोय, पण हे काम थांबलेलं नाही. काम अजून सुरू आहे. काम थांबलं नाही पाहिजे, असं नाना साहेब म्हणायचे. त्यांच्या कामाची ती पद्धत होती. त्यामुळे नानासाहेबांना अखंड आणि अथांग रूपातच आम्ही घेऊन चाललो आहे, असं त्यांनी सांगितलं.

प्रत्येक गोष्टीत आयुष्याचे धडे

प्रत्येक गोष्टीमध्येच नाना मला समोर दिसत आहेत. त्यांच्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आयुष्याचे धडे आहेत. नाना हे विश्वची माझे घर असं मानायचे. त्यामुळे प्रत्येकाच्या घरचा माणूस गेलाय अशी भावना लोक व्यक्त करत आहेत. त्यांना मानणाऱ्यांचे फोन येत आहेत. आपण सर्वांनी एकवटूयात. योग्य त्या दिशेने आपण सामाजिक वाटचाल करूयात, असा त्यांचा एकच संदेश होता. तोच आता पुढे घेऊन जायचा आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, नाना पाटेकर यांचं काल पहाटे 5 च्या सुमारास निधन झालं. गोवा येथील घरी रात्री दीड वाजता त्यांच्या छातीत दुखू लागलं. असह्य वेदना होत होत्या. त्यांना घाम आला. श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांनी मित्राला अडीचच्या सुमारास मेसेजही केला. प्रकृती खालावल्याचं त्या मेसेजमध्ये म्हटलं होतं. पण रात्रीची वेळ असल्याने मेसेज उशिरा मिळाला. पहाटे जेव्हा मित्र आला तेव्हा नाना जमिनीवर निपचित पडलेले होते. त्यांचा मृत्यू झाला होता. रुग्णालयात गेल्यावर त्यांनी सीपीआर देण्यात आला. त्यांच्यावर ट्रीटमेंट करण्यात आली. पण त्याला त्यांच्या शरीराने प्रतिसाद दिला नाही. शेवटी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

Follow Us
एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर दीपकेंचा सरकारला टोला
Abhijeet Dipake : एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर अभिजित दीपकेंचा सरकारला टोला
ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच....
Shivsena : ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच, सर्वोच्च न्यायालयाकडून तारीख जाहिर
गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा बण यांच्यावर....
Vivekanand Patil : गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा नवनाथ बण यांच्यावर पलटवार, फडणवीसांनाही केलं आवाहन
CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
CJP Delhi Andolan : CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ?
Thackeray Group On Delhi Andolan : दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ? राष्ट्रपतींच्या भेटीवेळीही प्रतिनिधी....
सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून राऊतांनी...
Sanjay Raut : सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून संजय राऊतांनी सरकारला घेरलं
SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; सिब्बलांचा जुना व्हिडिओ
Devendra Fadnavis : SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; कपिल सिब्बलांचा जुना व्हिडिओ शेअर करत म्हणाले...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात सर्वपक्षीय नेते एकवटले; ठाण्यात आज....
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात सर्वपक्षीय नेते एकवटले; ठाण्यात आज मोर्चा निघणार
राहुल गांधींचा उद्धव ठाकरेंना फोन; इंडिया आघाडीत मोठ्या घडामोडी
Rahul Gandhi : राहुल गांधींचा उद्धव ठाकरेंना फोन; इंडिया आघाडीत मोठ्या घडामोडी - सूत्र
नाना पाटेकर यांच्या निधन प्रकरणी मोठी अपडेट समोर; गोवा पोलिसांकडून....
Nana Patekar : नाना पाटेकर यांच्या निधन प्रकरणी मोठी अपडेट समोर; गोवा पोलिसांकडून....