AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वात मोठी बातमी ! शिवसेना कुणाची? सुनावणी कधी संपणार? फैसला कधी? मोठी अपडेट समोर

गेल्या चार वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील सुनावणी अंतिम टप्प्यात आहे. 30 ऑक्टोबरपर्यंत सुनावणी पूर्ण होण्याची शक्यता असून, त्यानंतर काही दिवसांत निकाल अपेक्षित आहे. हा निकाल एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या राजकीय भवितव्यासाठी तसेच देशासाठी ऐतिहासिक ठरणार आहे.

सर्वात मोठी बातमी ! शिवसेना कुणाची? सुनावणी कधी संपणार? फैसला कधी? मोठी अपडेट समोर
uddhav thackeray Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 09, 2026 | 1:37 PM
Share

गेल्या चार वर्षापासून सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील सुनावणी सुरू आहे. ही सुनावणी आता अंतिम टप्प्यात आहे. येत्या 30 ऑक्टोबरपर्यंत ही सुनावणी संपण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यानंतर काही दिवसातच या खटल्याचा निकाल येणार असल्याचं सांगितलं जात आहे. हा अत्यंत महत्त्वाचा खटला आहे. या खटल्याचा निकाल देशासाठी ऐतिहासिक ठरणार आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचं पुढील राजकीय भविष्य काय असेल? पक्ष कुणाकडे असेल? हे स्पष्ट होणार आहे. तसेच हा खटला सर्वच राजकीय पक्षांसाठी एक मार्गदर्शक खटलाही ठरणार आहे. त्यामुळेच देशाचं लक्ष या खटल्याच्या निकालाकडे लागलं आहे.

सर्वोच्च न्यायालायने एक खटल्या दरम्यान शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुनावणी 30 ऑक्टोबरपर्यंत संपण्याची शक्यता वर्तवली आहे. सर्वोच्च न्यायालयाने ही तोंडी टिप्पणी केली आहे. कोर्टात पश्चिम बंगाल एसआयआरची सुनावणी त्वरीत घ्यावी, अशी विनंती वकीलांतर्फं करण्यात आली होती, त्या वेळी सुप्रीम कोर्टाने सांगितले की, 30 ऑक्टोबरपर्यंत शिवसेनेची सुनावणी संपवायची आहे. त्यानंतर बंगाल एसआयआर प्रकरण घेतले जाईल. त्यामुळे 30 ऑक्टोबरनंतरच शिवसेनेचा फैसला होणार असल्याचं स्पष्ट होत आहे.

शिंदे गटाचा युक्तिवाद

दरम्यान, सध्या शिंदे गटाचा सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी सुरू आहे. शिंदे गटाकडून प्रसिद्ध वकील नीरज कौल हे बाजू मांडत आहेत. काल नीरज कौल यांनी पक्षचिन्हाबाबतचा युक्तिवाद संपवला. आता 13 ऑक्टोबर रोजी ते अपात्रते संबंधीचा युक्तिवाद करणार आहेत. त्यामुळे कौल या सुनावणीवेळी काय युक्तिवाद करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र, कौल यांना न्यायामूर्ती बागची यांनी या सुनावणी दरम्यान वारंवार एकच प्रश्न विचारला आहे. तो म्हणजे, निवडणूक आयोगाकडे शिंदे गटाला चिन्ह देण्याऐवजी दुसरा पर्याय नव्हता का? निवडणूक आयोग दुसऱ्या पर्यायांचा विचार करू शकत नव्हता का? कोर्टाच्याया सवालाने शिंदे गटाची मोठी अडचण होण्याची शक्यता आहे.

कौल यांचा युक्तिवाद संपल्यानंतर निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांच्या बाजूनेही युक्तिवाद होण्याची शक्यता आहे. 30 ऑक्टोबर पूर्वीच हे युक्तिवाद होणार असल्याने त्यानंतर कोर्ट यावर ऐतिहासिक निकाल देणार आहे. त्यामुळे कोर्ट काय निकाल देते याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.

Follow Us
ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच....
Shivsena : ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच, सर्वोच्च न्यायालयाकडून तारीख जाहिर
गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा बण यांच्यावर....
Vivekanand Patil : गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा नवनाथ बण यांच्यावर पलटवार, फडणवीसांनाही केलं आवाहन
CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
CJP Delhi Andolan : CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ?
Thackeray Group On Delhi Andolan : दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ? राष्ट्रपतींच्या भेटीवेळीही प्रतिनिधी....
सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून राऊतांनी...
Sanjay Raut : सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून संजय राऊतांनी सरकारला घेरलं
SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; सिब्बलांचा जुना व्हिडिओ
Devendra Fadnavis : SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; कपिल सिब्बलांचा जुना व्हिडिओ शेअर करत म्हणाले...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात सर्वपक्षीय नेते एकवटले; ठाण्यात आज....
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात सर्वपक्षीय नेते एकवटले; ठाण्यात आज मोर्चा निघणार
राहुल गांधींचा उद्धव ठाकरेंना फोन; इंडिया आघाडीत मोठ्या घडामोडी
Rahul Gandhi : राहुल गांधींचा उद्धव ठाकरेंना फोन; इंडिया आघाडीत मोठ्या घडामोडी - सूत्र
नाना पाटेकर यांच्या निधन प्रकरणी मोठी अपडेट समोर; गोवा पोलिसांकडून....
Nana Patekar : नाना पाटेकर यांच्या निधन प्रकरणी मोठी अपडेट समोर; गोवा पोलिसांकडून....
मुंबईकरांनो, उकाड्यासाठी तयार राहा; ऑक्टोबरमध्ये तापमान 37.6 अंशांवर
Mumbai Heat Wave : मुंबईकरांनो, उकाड्यासाठी तयार राहा; ऑक्टोबरमध्ये तापमान 37.6 अंशांवर, हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी