वरुण-नताशा विवाहबंधनात, ‘जियो जी भर के’, बॉलिवूडमधून शुभेच्छांचा वर्षाव!

बॉलिवूड अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan )अखेर 24 जानेवारीला विवाहबंधनात अडकला. वरुणने फॅशन डिझायनर नताशा दलालसोबत (Natasha Dalal) लगीनगाठ बांधली.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 11:26 AM, 25 Jan 2021
वरुण-नताशा विवाहबंधनात, 'जियो जी भर के', बॉलिवूडमधून शुभेच्छांचा वर्षाव!

मुंबई : बॉलिवूड अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan )अखेर 24 जानेवारीला विवाहबंधनात अडकला. वरुणने फॅशन डिझायनर नताशा दलालसोबत (Natasha Dalal) लगीनगाठ बांधली. या दोघांनी कुटुंब आणि जवळच्या मित्रमैत्रिणींच्या साक्षीने सप्तपदी घेतली. अलिबागमध्ये अगदी मोजक्या कुटुंबाच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडला. यात लग्नसोहळ्यात फक्त 50 जण सहभागी झाले होते. वरूणने पत्नीबरोबर फोटो शेअर करताना लिहिले की, “आयुष्यभराचे प्रेम आता अधिकृत झाले आहे”, वरुणचे चाहते त्याच्या लग्नाचा फोटोची आतुरतेने वाट पहात होते. (Marriage of Varun Dhawan and Natasha Dalal)

दीपिका पादुकोणनी दिल्या शुभेच्छा…

varun 1

varun 2

बॉलिवूड स्टारसुद्धा वरुणच्या लग्नासाठी शुभेच्छा देत आहेत. श्रद्धा कपूरने वरुण आणि त्याच्या पत्नीचे अभिनंदन केले. नेहा धुपियानेही यांचे अभिनंदन केले. नताशा दलाल एक प्रसिद्ध फॅशन डिझायनर आहे. तिने आतापर्यंत अनेक बॉलिवूडमधील सेलेब्रिटींसाठी ड्रेस डिझाईन केले आहेत. तसेच वरुण धवन आणि नताशा लहापणापासूनचे मित्र आहेत.

varun 3

नताशाने न्यूयॉर्कमधून फॅशन डिझाईनिंगचे शिक्षण घेतले आहे. सध्या ती मुंबईत आई -वडिलांसोबत राहते. नताशाचे वडील उद्योगपती असून आई गृहिणी आहे. विशेष म्हणजे नताशाचा आवडता अभिनेताही वरुण धवन आहे. तसेच ती स्केच आणि डॉग लव्हर आहे.

संबंधित बातम्या : 

डोळ्यावर गॉगल, ट्रॅडिशनल आऊटफिट; वरुण धवनच्या मेहंदीचे फोटो पाहिलेत का?

सलमान खान-जान्हवी कपूर यांच्या चित्रपटाला शेतकरी आंदोलनाचा फटका, आंदोलकांची आक्रमक भूमिका

(Marriage of Varun Dhawan and Natasha Dalal)