डोळ्यावर गॉगल, ट्रॅडिशनल आऊटफिट; वरुण धवनच्या मेहंदीचे फोटो पाहिलेत का?

बॉलिवूड अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) आणि नताशा दलाल (Natasha Dalal)  आज विवाहबंधनात अडकणार आहेत.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 13:23 PM, 24 Jan 2021
डोळ्यावर गॉगल, ट्रॅडिशनल आऊटफिट; वरुण धवनच्या मेहंदीचे फोटो पाहिलेत का?

मुंबई : बॉलिवूड अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) आणि नताशा दलाल (Natasha Dalal)  आज विवाहबंधनात अडकणार आहेत. या दोघांच्या लग्नाचे कार्यक्रम 22 जानेवारीपासून सुरू झाले आहेत. वरुण आणि नताशाच्या लग्नाचे फोटो पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट बघत आहेत. वरुण धवनचा मेहंदीचा फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये वरुण डिझाईनर मनीष मल्होत्रा ​​आणि इतरांसह दिसत आहे. वरुणने या फोटोमध्ये ट्रॅडिशनल आऊटफिट आणि जॅकेट घातलेले दिसत आहे. (Varun Dhawan’s photo of Mehndi goes viral on social media)

फोटो काढताना त्याने गॉगल देखील घातला आहे. या लूकमध्ये वरुण हँडसम दिसत आहे. वरुणचे बॉलिवूडमधील मित्र करण जोहर, मनीष मल्होत्रा, सारा अली खान, अर्जुन कपूर-मलाइका अरोरा, जाह्नवी कपूर-खुशी कपूर, कतरिना कैफ, नीतू कपूर, कियारा अडवाणी, अनिल कपूर, रिया कपूर आणि हर्षवर्धन कपूर या लग्नात सहभागी होणार आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

वरुणची जिवलग मैत्रीण अभिनेत्री आलिया भट्टही लग्नाला हजेरी लावणार आहे. यावेळी, ती एकटी येणार नाही तर, रणबीर कपूरबरोबर या विवाहसोहळ्यात सामील होणार आहे. आलिया सध्या तिच्या आगामी ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटाच्या चित्रीकरणात आहे. पण, शूटिंगमधून ब्रेक घेत ती अलिबागला वरुणच्या लग्नात हजेरी लावणार आहे.

कोण आहे नताशा दलाल?
नताशा दलाल एक प्रसिद्ध फॅशन डिझायनर आहे. तिने आतापर्यंत अनेक बॉलिवूडमधील सेलेब्रिटींसाठी ड्रेस डिझाईन केले आहेत. तसेच वरुण धवन आणि नताशा लहापणापासूनचे मित्र आहेत. नताशाने न्यूयॉर्कमधून फॅशन डिझाईनिंगचे शिक्षण घेतले आहे. सध्या ती मुंबईत आई -वडिलांसोबत राहते. नताशाचे वडील उद्योगपती असून आई गृहिणी आहे. विशेष म्हणजे नताशाचा आवडता अभिनेताही वरुण धवन आहे.

संबंधित बातम्या : 

Varun Dhawan Car Accident | लग्नाला जाताना वरुण धवनच्या गाडीला अपघात

अक्षय कुमार-परेश रावल धमाल करण्यास सज्ज, लवकरच सुरु होतंय या चित्रपटाचं शूटिंग!

सलमान खान-जान्हवी कपूर यांच्या चित्रपटाला शेतकरी आंदोलनाचा फटका, आंदोलकांची आक्रमक भूमिका

(Varun Dhawan’s photo of Mehndi goes viral on social media)