सलमान खान-जान्हवी कपूर यांच्या चित्रपटाला शेतकरी आंदोलनाचा फटका, आंदोलकांची आक्रमक भूमिका

दबंग स्टार सलमान खान (Salman Khan) आणि अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) यांचा 'गुड लक जेरी' या आगामी चित्रपटाचे शूटिंग 15 जानेवारीपासून पंजाब येथे सुरू होते.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 11:08 AM, 24 Jan 2021
सलमान खान-जान्हवी कपूर यांच्या चित्रपटाला शेतकरी आंदोलनाचा फटका, आंदोलकांची आक्रमक भूमिका

मुंबई : दबंग स्टार सलमान खान (Salman Khan) आणि अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) यांचा ‘गुड लक जेरी’ या आगामी चित्रपटाचे शूटिंग 15 जानेवारीपासून पंजाब येथे सुरू होती. मात्र, याची माहिती शेतकरी आंदोलकांना लागली आणि शेतकऱ्यांनी आपला मोर्चा चित्रपटाच्या सेटकडे वळवला त्यांचे म्हणणे आहे की, जोपर्यंत देशात लावण्यात आलेले नवे कृषी कायदे रद्द होत नाहीत तोपर्यंत कुठल्याही चित्रपटाचे शूटिंग पंजाबमध्ये होऊ देणार नाहीत. या चित्रपटाच्या सेटवर जान्हवी कपूर त्यावेळी शूटिंग करत होती. तिला शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. (Farmers stopped shooting for ‘Good Luck Jerry’ movie)

 

View this post on Instagram

 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

त्यानंतर काही वेळ चित्रपटाच्या टिमने शेतकऱ्यांशी चर्चा केली मात्र, जोपर्यंत शूटिंग बंद होणार नाही, तोपर्यंत आम्ही येथून जाणार नाहीत अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आणि चित्रपटाचे शूटिंग थांबवले. यामुळे चित्रपटाच्या टिमला शेवटी हाॅटेलवर परत जावे लागले. विशेष म्हणणे सलमान खान या चित्रपटाच्या शूटिंगसाठी लवकरच पंजाबला दाखल होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक सिद्धार्थ सेन करत आहेत तर पंकज मत्ताने हा चित्रपट लिहिला आहे. या चित्रपटाचे निर्माते आनंद एल राय आहेत.

श्रीदेवी यांचा पुण्यतिथी निमित्ताने जान्हवी कपूर भावुक झाली होती. तिने सोशल मीडियावर भावूक कॅप्शन देत फोटो शेअर करत पोस्ट लिहिली होती. जान्हवीने आपल्या ईन्स्टाग्राम अकाऊंटवर ब्लॅक अँड व्हाईटमध्ये फोटो शेअर केला होता. तो फोटो पाहून तुम्ही अंदाज लावू शकता की, या फोटोमध्ये जान्हवी आणि श्रीदेवी आहे.

या फोटोमध्ये श्रीदेवी यांनी जान्हवीला आपल्या कुशीत घेतल्याचे दिसत होते. “माझं ह्रदय नेहमीच जड झालेलं असतं. पण मी चेहऱ्यावर हसू ठेवून वावरते. कारण माझ्या हृदयात तू राहतेस, अशी भावनिक पोस्ट तिने फोटोसोबत लिहिली होती. दरम्यान 24 फेब्रुवारी 2018 ला श्रीदेवी यांचे दुबईमध्ये एका हॉटेलमधील बाथरुममध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झाला होता. अचानक झालेल्या या घटनेने संपूर्ण देश हळहळला होता. श्रीदेवींच्या चाहत्यांनाही या घटनेने धक्का बसला होता. आईच्या जाण्याने मला खुप धक्का बसला, अजूनही मी त्यातून बाहेर पडू शकली नाही”, असं जान्हवी कपूरने एका मुलखतीमध्ये सांगितले होते.

संबंधित बातम्या : 

अक्षय कुमार-परेश रावल धमाल करण्यास सज्ज, लवकरच सुरु होतंय या चित्रपटाचं शूटिंग!

Varun Dhawan Car Accident | लग्नाला जाताना वरुण धवनच्या गाडीला अपघात

(Farmers stopped shooting for ‘Good Luck Jerry’ movie)