AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mimi Trailer Out : धमाल आणि इमोशन्सची जुगलबंदी, असा असणार क्रितीचा सरोगेट ‘मदर’ बनण्याचा प्रवास, पाहा ट्रेलर

क्रिती सेनॉनच्या ‘मिमी’ या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात ती तिच्या वेगळ्या अवतारात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘मिमी’ हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर आज (13 जुलै) रिलीज झाला आहे. जो चाहत्यांना खूपच आवडला आहे.

Mimi Trailer Out : धमाल आणि इमोशन्सची जुगलबंदी, असा असणार क्रितीचा सरोगेट ‘मदर’ बनण्याचा प्रवास, पाहा ट्रेलर
मिमी
| Edited By: | Updated on: Jul 13, 2021 | 12:17 PM
Share

मुंबई : क्रिती सेनॉनच्या ‘मिमी’ या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात ती तिच्या वेगळ्या अवतारात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘मिमी’ हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर आज (13 जुलै) रिलीज झाला आहे. जो चाहत्यांना खूपच आवडला आहे.

ट्रेलर शेअर करताना क्रितीने लिहिले की, ‘या अनपेक्षित प्रवासासाठी मिमी सर्व काही करते. ही मिमी खास तुमच्यासाठी.. आपल्या कुटुंबासमवेत या कथेची छोटीशी झलक पाहा… हा चित्रपट 30 जुलै रोजी रिलीज होत आहे.’

पाहा ट्रेलर :

View this post on Instagram

A post shared by Kriti (@kritisanon)

पंकज त्रिपाठी, क्रिती सेनॉन आणि सई ताम्हणकर कारमध्ये कुठेतरी जात असतात, इथूनच 2 मिनिट 59 सेकंदाच्या ट्रेलरची सुरुवात होते. मग, पंकज त्रिपाठी आई आणि मुलाच्या नात्याबद्दल सांगतात. क्रिती या चित्रपटात डान्सरच्या भूमिकेत दिसणार आहे. गावातील राजवाड्यात एक परदेशी जोडपं राहायला येतं, त्यांना क्रिती खूप आवडते आणि ते तिला सरोगेट आई होण्याबद्दल विचारतात. त्या बदल्यात तिला 20 लाख रुपयांची ऑफर दिली जाते. आधी ती नकार देते पण नंतर हो म्हणते. जेव्हा हा परदेशी जोडप्याच्या मुलाला क्रिती आपल्या पोटात वाढवते तेव्हा ते हे मूल त्यांना नकोय, असे ते म्हणतात. त्यानंतर कथा भावनिक होऊ लागते. क्रितीने मुलाला जन्म दिल्यानंतर काय होईल, हे पाहण्यासाठी आपल्याला या चित्रपटाची प्रतीक्षा करावी लागेल.

ट्रेलर रिलीज होण्यापूर्वी कृतीने चित्रपटाची अनेक पोस्टर्स शेअर केली होती. ज्यामध्ये ती बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसली होती. पंकज त्रिपाठी, सुप्रिया पाठक, मनोज पाहवा या चित्रपटात क्रिती सोबत महत्वाच्या भूमिका साकारताना दिसणार आहेत.

भूमिकेसाठी वाढवले वजन

क्रिती सेनॉन या चित्रपटात सरोगेट मदरच्या भूमिकेत दिसणार आहे. या पात्रासाठी तिने खूप परिश्रम घेतले आहेत. क्रितीने एका मुलाखतीत सांगितले होते की, या चित्रपटासाठी तिने 15 किलो वजन वाढवले ​​आहे. ती म्हणाली होती की, दिग्दर्शक लक्ष्मणने मला आधीच सांगितले आहे की मी कमजोर दिसू नये, म्हणून मला वजन वाढवावे लागेल सांगितले होते. वजन वाढवणे माझ्यासाठी सोपे नव्हते. मी वजन वाढवण्यासाठी कसरत करणेही सोडून दिले आणि खूप गोड पदार्थ खाल्ले. 30 जुलै रोजी हा चित्रपट नेटफ्लिक्स आणि जिओ सिनेमावर रिलीज होणार आहे.

(Mimi Trailer Out watch Kriti Sanon’s aka Mimi’s Surrogacy journey)

हेही वाचा :

अनुष्काने सोशल मीडियावर शेअर केले लेकीचे फोटो, प्रत्येक वेळी केला चेहरा लपवण्याचा प्रयत्न!

रणवीर नाही तर ‘या’वर दीपिका पदुकोणचे सर्वात जास्त प्रेम, व्हिडीओ शेअर करत सांगितलं सिक्रेट…

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.