AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dating Advice | डेटिंगबद्दल सारा अली खानला आई अमृताने दिला होता सल्ला, म्हणाली ‘रिलेशनशिपमध्ये आल्यावर…’

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) तिची आई-अभिनेत्री अमृता सिंहच्या खूप जवळ आहे. तिच्या चांगल्या संगोपनाचे श्रेय ती नेहमी तिच्या आईलाच देते. साराने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले असून, वडील सैफ यांच्या पावलावर पाऊल टाकत ती इंडस्ट्रीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यात मग्न आहे.

Dating Advice | डेटिंगबद्दल सारा अली खानला आई अमृताने दिला होता सल्ला, म्हणाली ‘रिलेशनशिपमध्ये आल्यावर...’
Sara-Amrita
| Edited By: | Updated on: Oct 26, 2021 | 1:43 PM
Share

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) तिची आई-अभिनेत्री अमृता सिंहच्या खूप जवळ आहे. तिच्या चांगल्या संगोपनाचे श्रेय ती नेहमी तिच्या आईलाच देते. साराने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले असून, वडील सैफ यांच्या पावलावर पाऊल टाकत ती इंडस्ट्रीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यात मग्न आहे. सारा तिच्या प्रोफेशनल लाईफबाबतही चर्चेचा भाग राहते. नुकतेच तिने सांगितले की, आई अमृतानेच तिला डेटिंगबद्दल सल्ले दिले आहेत.

‘केदारनाथ’ या चित्रपटातून साराने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात ती दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतसोबत दिसली होती. सारा अनेकदा म्हणते की, तिची आई अमृता तिची प्रेरणा आहे आणि एक समीक्षकही आहे. ती तिला नेहमी योग्य मार्गदर्शन करते.

आई अमृता सिंहने डेटिंग टिप्स दिल्या!

सारा अलीकडेच टिंडर इंडियाला दिलेल्या मुलाखतीत आई अमृताने दिलेल्या डेटिंग सल्ल्याबद्दल बोलली. ती म्हणाली की, माझ्या आईने हे शिकवले आहे की एका व्यक्तीसोबत नातेसंबंधात आल्यानंतर स्वत: ला कधीच बदलू नये.

सारा पुढे म्हणाली की, मला असे वाटते की माझे मित्र आणि माझी आई किंवा माझ्या आजूबाजूचे लोक नेहमी सांगत असतात की, मी जशी आहे तशीच राहायला हवी. ते नेहमी म्हणतात की, स्वत:ला बदलू नकोस, कारण कोणीतरी तुम्हाला असेच पाहू इच्छित आहे. तुम्ही तुमचे मत दुसऱ्या व्यक्तीसमोर व्यक्त केले नाही तर ते नाते फार काळ टिकत नाही.

अभिनेत्री सारा अली खान तिची आई अमृतासोबत ट्रिपला जात असते. अनेक मंदिरांना भेटी देऊन ती आईसोबत धमाल करून आली आहे. काही काळापूर्वी ती आई अमृतासोबत काश्मीरलाही गेली होती. जिथे तिने सोशल मीडियावर व्हिडीओ आणि फोटो शेअर केले आहेत.

कामाच्या आघाडीवर, सारा अली खान शेवटची वरुण धवन सोबत ‘कुली नंबर 1’ या चित्रपटात दिसली होती. ती लवकरच आनंद एल रायच्या ‘अतरंगी रे’ या चित्रपटात अक्षय कुमार आणि धनुषसोबत दिसणार आहे.

नुकतीच मालदीववरून परतली अभिनेत्री

नुकतीच तिची आई अमृता सिंह आणि बेस्ट फ्रेंड्ससोबत मालदीवच्या सहलीतून परतलेली अभिनेत्री सारा अली खान सोशल मीडियावर फोटो शेअर करत आहे. अलीकडेच, तिने तिच्या ट्रिपमधून काही फोटो टाकले. ज्यातील तिच्या बिकिनी बीच लुकवर चाहत्यांच्या नजर खिळल्या आहेत आणि नेटिझन्स घायाळ झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून, सारा तिच्या आईसोबत मालदीवच्या प्रवासाची झलक शेअर करत होती आणि नेहमीप्रमाणे, तिच्या चाहत्यांना तिच्या या व्हेकेशन डायरीच्या प्रत्येक गोष्टी आवडत होत्या.

नुकतेच साराने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर तिचा सर्वात जवळची मैत्रीण कामियाह सोबत दोन फोटो शेअर केले होते. या फोटोंमध्ये सारा फ्लोरल ब्लू बिकिनीमध्ये पोज देताना दिसू शकते. तिचे केस अर्धवट बांधलेले होते आणि मेकअप अगदी कमीतकमी केला होता.

हेही वाचा :

‘माझे पती बॉलिवूडला टार्गेट करत नाहीयत’, समीर वानखेडेंच्या समर्थनार्थ पुढे आली पत्नी क्रांती रेडकर!

Aryan Khan Drugs Case | कोकेनचे आश्वासन, 80 हजारांचा गांजा!, आर्यन-अनन्याच्या चॅटमधून नवा खुलासा

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.