AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Birthday Special: नागार्जुन अमला अक्किनेनीच्या प्रेमात आकंठ बुडाला होता, असं केलं होतं प्रपोज

अमलाने मॉडेल म्हणून करिअरला सुरुवात केली. मॉडेलिंग केल्यानंतर तिनं चित्रपट जगतात पाऊल ठेवलं. नागार्जुन आणि अमला यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं. शूटिंग दरम्यान दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघांनी अनेकदा एकत्र वेळ घालवला. (Nagarjuna was in love with Amla Akkineni, he proposed her during their shoot)

Birthday Special: नागार्जुन अमला अक्किनेनीच्या प्रेमात आकंठ बुडाला होता, असं केलं होतं प्रपोज
| Edited By: | Updated on: Sep 12, 2021 | 12:48 PM
Share

मुंबई : अभिनेत्री अमला अक्किनेनी (Amala Akkineni) आज तिचा 54 वा वाढदिवस साजरा करत आहे. अमलाचा ​​जन्म 12 सप्टेंबर 1967 रोजी कोलकाता येथे झाला. अमलानं सुपरस्टार नागार्जुनशी लग्न केलं. दोघांची लव्हस्टोरी खूप गोड आहे. ही लव्हस्टोरी एखाद्या फिल्मी कथेपेक्षा कमी नाहीये. आज अमलाच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तुम्हाला अमला आणि नागार्जुनच्या लव्हस्टोरीबद्दल  सांगत आहोत.

अमला आणि नागार्जुनचं लग्न झालं तेव्हा ती तिच्या करिअरच्या पीकवर होती. जेव्हा अमला आणि नागार्जुनची लव्हस्टोरी सुरू झाली, तेव्हा तो आधीच विवाहित होते.

अशाप्रकारे सुरू झाली लव्हस्टोरी

अमलाने मॉडेल म्हणून करिअरला सुरुवात केली. मॉडेलिंग केल्यानंतर तिनं चित्रपट जगतात पाऊल ठेवलं. नागार्जुन आणि अमला यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं. शूटिंग दरम्यान दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघांनी अनेकदा एकत्र वेळ घालवला.

रिपोर्ट्सवर विश्वास ठेवायचा झाला कर, अमला तिच्या एका चित्रपटाचं शूटिंग करत होती. त्या काळात नागार्जुन तिला सप्राईज देण्यासाठी सेटवर पोहोचला होता. मात्र जेव्हा तो अमलाला भेटला तेव्हा ती रडत होती. जेव्हा नागार्जुननं तिला रडण्याचं कारण विचारलं, तेव्हा अमलानं सांगितले की पुढच्या सिनमध्ये तिला जे कपडे घालायचे आहेत ते खूप विचित्र आहेत आणि तिला ते घालायचे नाहीत. यावर नागार्जुननं तिला सांगितलं की तो तिच्या दिग्दर्शकाशी बोलतो. त्यानंतर नागार्जुननं दिग्दर्शकाशी बोलून अमलाचे कपडे बदलून घेतले होते.

नागार्जुनच्या या वागण्यानं अमला प्रभावित झाली आणि तिच्या मनातही त्याच्याबद्दल प्रेम जागृत झालं. त्यावेळी त्यांच्या नात्याबद्दल बातम्या येऊ लागल्या मात्र दोघांपैकी कोणीही याची पुष्टी केली नाही.

परदेशात केलं होतं प्रपोज

अमला आणि नागार्जुन एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी परदेशात गेले होते. जिथं नागार्जुनने अमलाला खास पद्धतीने प्रपोज केलं होतं. त्यानंतर नागार्जुननं पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला. नागार्जुन आणि अमला यांनी 1992 मध्ये एकमेकांशी लग्न केलं. लग्नात फक्त कुटुंबातील सदस्य आणि खास मित्र उपस्थित होते. अमला आणि नागार्जुन यांना आता एक मुलगा आहे. या मुलाचं नाव अखिल असं आहे. अखिल देखील त्याच्या वडिलांप्रमाणेच एक अभिनेता आहे.

संबंधित बातम्या

Ganpati Visarjan: जल्लोष आणि उत्साहात बाप्पाला निरोप… शिल्पा शेट्टीच्या घरी दीड दिवसाच्या गणपतीचं विसर्जन, पाहा खास फोटो

Kangana Ranaut Lookalike : कंगना रनौतची कार्बन कॉपी आहे ही ‘छोटी कंगना’, ‘थलायवी’ लूकमधील फोटो व्हायरल

Gautami Deshpande: छबिदार सुरत देखणी, जणू हिरकणी, नार गुलजार… गौतमी देशपांडेचा अस्सल मराठमोळा अंदाज पाहाच!

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.