Video: “जो लोग ऐसे सेक्सी टाईप”, ट्रोलर्सना उत्तर देण्यासाठी नीना गुप्ताचा बोल्ड अवतार, त्यावरून पुन्हा ट्रोल

अभिनेत्रींनी बोल्ड कपडे घातले आणि त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले त्या पोस्टवर कमेंट्सचा अक्षरश: पाऊस पडतो. अनेकजण त्यांच्या कपड्यावरून त्यांना ट्रोल करतात. त्यावर बॉलिवूडच्या वरिष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हीडिओ पोस्ट करत भाष्य केलंय.

Video: जो लोग ऐसे सेक्सी टाईप, ट्रोलर्सना उत्तर देण्यासाठी नीना गुप्ताचा बोल्ड अवतार, त्यावरून पुन्हा ट्रोल
नीना गुप्ता
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: आयेशा सय्यद

Mar 15, 2022 | 12:05 PM

मुंबई : सध्या कुणी कुठल्या प्रकारची कपडे घालतो यावरून त्या व्यक्तीच्या चारित्र्याबाबत तर्क लावले जातात. कपड्यावरून त्यांना ट्रोल केलं जातं. यात कलाकार मंडळी तर या ट्रोलर्सच्या कायमच निशाण्यावर असतात. अभिनेत्रींनी बोल्ड कपडे घातले आणि त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले त्या पोस्टवर कमेंट्सचा अक्षरश: पाऊस पडतो. काहीजण त्यांच्या सौंदर्याचं कौतुक करत असतात. तर अनेकजण त्यांच्या कपड्यावरून त्यांना ट्रोल करतात. त्यावर बॉलिवूडच्या वरिष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता (Neena Gupta) यांनी इन्स्टाग्रामवर (Instagram) एक व्हीडिओ पोस्ट करत भाष्य केलंय. “ट्रोलर्सना (Trollers) सांगू इच्छिते की कपड्यांवरून कुणाला जज करू नका”, असं त्यांनी ट्रोलर्सना ठणकावून सांगितलं आहे.

नीना गुप्ता यांची इन्स्टाग्राम पोस्ट

नीना गुप्ता यांनी एक व्हीडिओ पोस्ट केला आहे. यात त्यांनी कपड्यावरून ट्रोल करणाऱ्या ट्रोलर्सना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. त्यांनी स्वत: बोल्ड कपडे घालत ट्रोलर्सना उत्तर दिलंय.  “मी हा व्हीडिओ यासाठी पोस्ट केला आहे की, जे लोक असं समजतात की सेक्सी कपडे घालणारे लोक, जसे कपडे मी आता घातलेत ते ‘असेच’ असतात. पण मी त्यांना सांगू इच्छिते की मी संस्कृतमध्ये एमफिल केलं आहे आणि इतरही बऱ्याच गोष्टी केल्या आहेत. त्यामुळे कपडे बघून कुणाला जज नाही केलं पाहिजे, ट्रोल करणाऱ्यांनो, हे समजून घ्या”, असं नीना गुप्ता यांनी या व्हीडिओमध्ये म्हटलंय. या व्हीडिओला त्यांनी “सच कहूँ तो!” असं कॅप्शन दिलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Neena Gupta (@neena_gupta)

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

नीना गुप्ता यांच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट केली आहे. नीना यांच्या चाहत्यांनी त्यांच्या या विचारांना पाठिंबा दर्शवला आहे. तर काहींनी या पोस्टवरूनही नीना यांना ट्रोल केलं आहे. “ते सगळं ठीक आहे नीनाजी, पण आतापर्यंत किती पेग झालेत?”, असं एका नेटकऱ्याने म्हटलंय. तर दुसऱ्याने “तुम्ही 45 वर्षाच्या दिसत आहात”, असं म्हटलंय.

आणखी एका नेटकऱ्याने “एवढ्या प्रेमाने धमकी केवळ संस्कृत शिकलेलेच देऊ शकतात, अप्रतिम!”, असं म्हटलंय. “किती चांगली गोष्ट… तुम्ही सोप्या शब्दात मांडली, लव्ह यू”, असं एका नेटकऱ्याने म्हटलंय.

नीना यांच्या चाहतीने “तुम्ही सगळ्या ड्रेसमध्ये सुंदर दिसता”, असं म्हटलंय. तर दुसऱ्या एका चाहतीने “लव्ह यू सो मच”, म्हटलंय.

संबंधित बातम्या

The Kashmir Files : भाजपशासित राज्यात ‘काश्मीर फाईल्स’ टॅक्स फ्री करण्याची चढाओढ, गुजरात, उत्तर प्रदेशमध्ये टॅक्स फ्री, महाराष्ट्र काय करणार?

Alia Bhatt Birthday : वयाच्या 11 व्या वर्षी आलिया पडली होती रणबीर कपूरच्या प्रेमात, आलियाची ‘बचपन का प्यार’वाली लव्हस्टोरी

“काश्मीरी पंडितांवर अन्याय ही तर भाजपची चूक”, हिंदू महासंघाने भाजपला फटकारलं!

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें