Alia Bhatt: आलिया भट्टच्या प्रेग्नंसीवर नीतू कपूर यांची पहिली प्रतिक्रिया; पहा व्हिडीओ

कपूर घराण्यात लवकरच ज्युनियर कपूरचं आगमन होणार असून आलियाने प्रेग्नंट असल्याचं जाहीर केलं. रुग्णालयात अल्ट्रासाऊंड करतानाचा फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट करताच क्षणार्धात तो व्हायरल झाला.

Alia Bhatt: आलिया भट्टच्या प्रेग्नंसीवर नीतू कपूर यांची पहिली प्रतिक्रिया; पहा व्हिडीओ
आलिया भट्टच्या प्रेग्नंसीवर नीतू कपूर यांची पहिली प्रतिक्रिया
Image Credit source: Instagram
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: स्वाती वेमूल

Jun 27, 2022 | 12:50 PM

अभिनेत्री आलिया भट्टने (Alia Bhatt) सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत चाहत्यांना ‘गुड न्यूज’ दिली. कपूर घराण्यात लवकरच ज्युनियर कपूरचं आगमन होणार असून आलियाने प्रेग्नंट असल्याचं जाहीर केलं. रुग्णालयात अल्ट्रासाऊंड करतानाचा फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट करताच क्षणार्धात तो व्हायरल झाला. त्यावर बॉलिवूड इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींपासून ते चाहत्यांपर्यंत अनेकांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला. ‘आमचं बाळ.. लवकरच येतंय’ असं कॅप्शन देत आलियाने फोटो पोस्ट केला. आता त्यावर रणबीरची (Ranbir Kapoor) आई आणि आलियाची सासू नीतू कपूर (Neetu Kapoor) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पापाराझींकडून पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये नीतू कपूर व्हॅनिटी व्हॅनमधून बाहेर येताच त्यांना पापाराझी शुभेच्छा देताना पहायला मिळत आहे.

‘दादी बनने वाली हो’, असं एकाने म्हणताच, त्यांनी धन्यवाद म्हणत आभार व्यक्त केला. त्याचप्रमाणे रणबीरच्या ‘शमशेरा’ आणि ‘ब्रह्मास्त्र’ हे चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. नीतू कपूर यांचा ‘जुग जुग जियो’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटातून त्यांनी बऱ्याच वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन केलंय. तर रणबीरचा ‘शमशेरा’ हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. जवळपास चार वर्षांनंतर रणबीरचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

पहा व्हिडीओ-

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

रणबीरची बहीण रिधिमा कपूर सहानी हिनेसुद्धा इन्स्टा स्टोरीमध्ये रणबीर-आलियाचा फोटो पोस्ट करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. याशिवाय प्रियांका चोप्रा, करण जोहर, टायगर श्रॉफ, इशान खट्टर, वाणी कपूर, फरहान अख्तर, मलायका अरोरा, अनिल कपूर, बिपाशा बासू, आकांक्षा रंजन, शशांक खैतान, इशा गुप्ता, रकुल प्रीत सिंग, परिणीती चोप्रा यांनीसुद्धा शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

आलियाची पोस्ट-

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt 🤍☀️ (@aliaabhatt)

रणबीर-आलियाची प्रेमकहाणी एखाद्या परीकथेपेक्षा कमी नाही. 2012 मध्ये आलियाने पहिल्यांदा कबूल केलं होतं की तिला रणबीरवर क्रश आहे. स्टुडंट ऑफ द इयर या तिच्या पहिल्या चित्रपटाचं प्रमोशन करताना ती एका पत्रकार परिषदेत म्हणाली, “मला रणबीर खूप आवडतो. बर्फी चित्रपटानंतर मला तो जास्त आवडायला लागला. तो माझा सर्वात मोठा क्रश आहे आणि तो नेहमीच माझा सर्वात मोठा क्रश असेल.” 2017 च्या अखेरीस ‘ब्रह्मास्त्र’च्या सेटवर या दोघांमध्ये प्रेम फुलू लागल्याच्या चर्चा पसरू लागल्या. 2018 मध्ये सोनम कपूरच्या लग्नात रणबीर आणि आलियाने एकत्र हजेरी लावत सर्वांना सुखद धक्का दिला.

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें