Ranveer Singh: ‘रणवीरचं वागणं खूपच लज्जास्पद’; पुन्हा एकदा नेटकरी भडकले

हा एपिसोड आणि रणवीरचं वागणं नेटकऱ्यांना आवडलं नाही. ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर करत अनेकांनी त्याच्यावर टीका केली. रणवीरने मर्यादा ओलांडल्या, असं काहींनी म्हटलंय.

Ranveer Singh: 'रणवीरचं वागणं खूपच लज्जास्पद'; पुन्हा एकदा नेटकरी भडकले
Ranveer Singh
Image Credit source: Instagram
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: स्वाती वेमूल

Sep 06, 2022 | 7:12 PM

‘फॅब्युलस लाइव्स ऑफ बॉलिवूड वाइव्स’ (Fabulous Lives of Bollywood Wives 2) या वेब सीरिजचा दुसरा सिझन नेटफ्लिक्सवर (Netflix) प्रदर्शित झाला. अगदी पहिल्या एपिसोडपासून हा सिझन सोशल मीडियावर चर्चेत आहे. यामध्ये चंकी पांडेची पत्नी भावना पांडे, संजय कपूरची पत्नी महीप कपूर, समीर सोनीची पत्नी नीलम कोठारी आणि सोहैल खानची पूर्वाश्रमीची पत्नी सीमा किरण सजदेह यांनी सहभाग घेतला आहे. सेलिब्रिटींच्या या पत्नींनी त्यांच्या खासगी आयुष्याविषयी यात बरेच खुलासेदेखील केले आहेत. यातील एक एपिसोड सध्या सोशल मीडियावर विशेष चर्चेत आहे. या एपिसोडमुळे अभिनेता रणवीर सिंगला (Ranveer Singh) ट्रोल करण्यात येत आहे.

रणवीरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाच्या सेटवर या चौघींनी त्याची भेट घेतली. या भेटीदरम्यान रणवीर अचानक त्याच्या पायाला दुखापत झाल्याचं दाखवत महीपच्या मांडीवर पाय ठेवतो. यावेळी नेमकं काय करावं असं महीपला सुचत नाही आणि इतर तिघी जणी हसू लागतात.

पहा व्हिडीओ

हा एपिसोड आणि रणवीरचं वागणं नेटकऱ्यांना आवडलं नाही. ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर करत अनेकांनी त्याच्यावर टीका केली. रणवीरने मर्यादा ओलांडल्या, असं काहींनी म्हटलंय. ‘हे सर्व ठरवून केलंय हे माहितीये, पण तरी यामुळे रणवीरविषयीचं मत बदलत नाही. जेव्हा तो खरंच करण जोहरशी स्वत:ला दूर करेल, तोपर्यंत वेळ निघून गेलेली असेल’, असं एका युजरने लिहिलं.

“ही अशीच लोकं आहेत, ज्यांच्यामुळे बॉलिवूडचा अनादर होतो. रणवीरला या एपिसोडमध्ये पाहून खरंच चीड येते”, असं दुसऱ्या युजरने म्हटलं. ‘रणवीरचं हे वागणं दीपिकासाठी खूपच लज्जास्पद असेल. रणबीर कपूरने असं कधीच केलं नसतं,’ अशीही तुलना एका नेटकऱ्याने केली. फॅब्युलस लाइव्स ऑफ बॉलिवूड वाइव्स या सीरिजची निर्मिती करण जोहरने केली आहे. पहिला सिझन गाजल्यानंतर या सीरिजचा दुसरा सिझन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

हे सुद्धा वाचा


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें