Video : विमानतळावरील कर्मचाऱ्यांवर भडकली नीना गुप्ता, व्हिडीओ शेअर करत म्हणाली- ‘मला ओरडायचं नव्हत …’

नीना गुप्ता यांनी इन्स्टाग्रामवर एक नवीन व्हिडीओ पोस्ट केला आहे, जो आता चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये नीना गुप्ता विमानतळावरील कर्मचाऱ्यांवर चिडताना दिसत आहे. (Nina Gupta gets angry with airport staff, shares video and says- 'I didn't want to shout ...')

Video : विमानतळावरील कर्मचाऱ्यांवर भडकली नीना गुप्ता, व्हिडीओ शेअर करत म्हणाली- 'मला ओरडायचं नव्हत ...'

मुंबई : बॉलिवूडची ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता (Neena Gupta) तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी तसेच तिच्या अनोख्या स्टाईलसाठी ओळखली जाते. ती केवळ सोशल साईटवर आपल्या फॅशन सेन्सने लोकांना प्रभावित करत नाही, तर सामान्य आयुष्यातील समस्या तिच्या चाहत्यांसोबत शेअर करायला ती मागेपुढे पाहत नाही. नीना गुप्ता यांनी इन्स्टाग्रामवर एक नवीन व्हिडीओ पोस्ट केला आहे, जो आता चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये नीना गुप्ता विमानतळावरील कर्मचाऱ्यांवर चिडताना दिसत आहे.

नीना या व्हिडीओमध्ये सांगते की परस्पर समन्वयाच्या अभावामुळे तिला विमानतळावर खूप त्रास कसा सहन करावा लागला. तिने व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘खरं सांगू. आज मला विमानतळावर खूप वाईट अनुभव आला. तुमच्याकडे ऑनलाईन बोर्डिंग पास असला तरी त्याची हार्ड कॉपी तुमच्याकडे ठेवा… माझ्याकडे हार्ड कॉपी नव्हती, मी रांगेत उभे होते. त्याने विचारलं तुझा बोर्डिंग पास कुठे आहे? मी म्हणाले अहो! मी आणला नाही, विसरले. जेव्हा मी बोर्डिंग पास घेण्यासाठी परत गेले, तेव्हा ते म्हणाले की तुमच्या फोनमधील बोर्डिंग पास तेच काम करतो. मग मी येऊन रांगेत उभे राहिले, त्यांनी पुन्हा बोर्डिंग पासची हार्ड कॉपी मागितली. यामुळे मला खूप राग आला, मला ओरडायचं नव्हतं. मग मी म्हणाले की तुम्ही लोकांनी एक गोष्ट ठरवायला पाहिजे “. व्हिडीओच्या शेवटी, नीना म्हणते, ‘माझा अनुभव सांगते की तुम्ही लोकांनी आतापासून हार्ड कॉपी सोबत ठेवावी.’

नीना गुप्ताच्या या पोस्टवर चाहतेही आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. जिथे काही लोक तिच्या शब्दांशी सहमत आहेत. त्याच वेळी, काही जण असं म्हणत आहेत की त्यांनी अशा प्रकारे मार्ग अडवून व्हिडीओ बनवू नये.

पाहा व्हिडीओ

 

View this post on Instagram

 

A post shared by Neena Gupta (@neena_gupta)

नीना गुप्ताची मुलगी मसाबा गुप्ता हिनंही व्हिडीओवर कमेंट केली आहे. तिने लिहिलं, ‘जेव्हा तुम्ही व्हिडीओ बनवत होता, तेव्हा तुमच्या जवळून जाणारी एक व्यक्ती, ज्याच्या हातात निळी पिशवी आहे, तो बोर्डिंग गेटमधून बाहेर पडण्यासाठी धडपडत होता.’ ‘प्रतिसादात नीना गुप्ता म्हणतात,’ हो. अगदी! तिथे बरीच जागा होती.

नीना गुप्ताच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल बोलायचं झालं तर  त्यांनी ‘पंचायत’ या वेब सीरिजच्या दुसऱ्या सीझनचं शूटिंग सुरू केलं आहे. तिने स्वतः ही माहिती त्याच्या इन्स्टाग्रामवर दिली आहे.

संबंधित बातम्या

Sunny Leone : अभिनेत्री सनी लिओनीच्या किलर अदा, पाहा नव्या फोटोशूटचे क्लासी फोटो

Sophie Choudry : समुद्रकिनारी बिकिनी परिधान करून सोफी चौधरीने दाखवला बोल्ड अवतार, पाहा क्लासी फोटो

Apurva Nemlekar : नवरात्रीचा चौथा दिवस; नारंगी रंग आणि जया जगदंबा मातेचा लूक, पाहा अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरचा खास अंदाज

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI