Vande Mataram : टाइगर श्रॉफच्या आवाजात ऐकायला मिळणार देशभक्तीपर गीत, ‘वंदे मातरम’चे मोशन पोस्टर प्रदर्शित

देशभक्ती गीत 'वंदे मातरम'चे मोशन पोस्टर प्रदर्शित केलं आहे. या गीताला टाइगर श्रॉफनं आवाज दिला असून हे त्याचं पहिलं हिंदी गाणं आहे. (Patriotic song to be heard in Tiger Shroff's voice, motion poster of 'Vande Mataram' screened)

Vande Mataram : टाइगर श्रॉफच्या आवाजात ऐकायला मिळणार देशभक्तीपर गीत, 'वंदे मातरम'चे मोशन पोस्टर प्रदर्शित

मुंबई : टाइगर श्रॉफसोबत (Tiger Shroff) जॅकी भगनानीच्या (Jackky Bhagnani) जे जस्ट म्यूझिकनं आज देशभक्ती गीत ‘वंदे मातरम’चे (Vande Mataram) मोशन पोस्टर प्रदर्शित केलं आहे. या गीताला टाइगर श्रॉफनं आवाज दिला असून हे त्याचं पहिलं हिंदी गाणं आहे. या आधी त्यानं गायलेली दोन इंग्रजी गाणी यशस्वी ठरली आहेत. हे गाणे 10 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.

आपल्या मनात देशभक्तीची भावना निर्माण करणारं गाणं!

जे जस्ट म्यूझिकनं या आधी आलिया भट्टवर चित्रित केलेलं प्रादा, मुस्कुराएगा इंडिया आणि जुगनी 2.0 सारखी गाणी प्रचंड गाजली आहेत. आज प्रदर्शित करण्यात आलेलं हे मोशन पोस्टर तात्काळ आपल्या मनात देशभक्तीची भावना निर्माण करणारं आहे. हे गाणं रेमो डिसूजाद्वारे दिग्दर्शित करण्यात आलं असून त्यांची दृष्टि या शानदार गाण्याला आणखी खास बनवते आहे.

पाहा मोशन पोस्टर

 

View this post on Instagram

 

A post shared by JACKKY BHAGNANI (@jackkybhagnani)

जॅकी भगनानी आणि टाइगर श्रॉफ या सुंदर ट्रॅकसाठी एकत्र

जॅकी भगनानी आणि टाइगर श्रॉफ या सुंदर ट्रॅकसाठी गायक आणि संगीत निर्माता म्हणून एकत्र येत आहेत. हा ट्रॅक सर्वात मोठा आणि सर्वात बोल्ड सिंगल्स पैकी एक असेल जो लवकरच आपण पाहू शकणार आहोत. तेव्हा जॅकी भगनानी, टाइगर श्रॉफ आणि रेमो डिसूजा यांच्यासोबत या सर्वोत्तम गाण्यासाठी तयार रहा!

टाइगर श्रॉफनं गायलेलं, वंदे मातरम रेमो डिसूजाद्वारे दिग्दर्शित, विशाल मिश्रा द्वारा रचित, कौशल किशोर द्वारा लिखित आणि अंकन सेन, जुईली वैद्य आणि राहुल शेट्टी यांच्याद्वारे कोरियोग्राफ करण्यात आलं आहे.

संबंधित बातम्या

Mira Rajput : ‘प्रत्येकाचे तीन वेगळे चेहरे असतात…’ शाहिदची पत्नी मीरा राजपूतची खास पोस्ट पाहाच

‘व्हेकेशन मूड’, बिकिनी परिधान करून ‘संजू बाबा’ची लाडकी त्रिशाला जंगलात डायनासोरच्या शोधात!

’10 वर्षांनी टीव्हीवर पुनरागमन करतेय…’, नव्या मालिकेच्या निमित्ताने प्रार्थना बेहेरेने व्यक्त केल्या मनातील भावना!

 

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI