Sherlyn Chopra Video : ‘मला मदतीचा हात द्या…’ राज कुंद्रा प्रकरणात शर्लिन चोप्राची थेट मुख्यमंत्र्यांना साद

शर्लिनने तिच्या सोशल मीडियावर ही माहिती दिली. शर्लिन चोप्राने ट्विटरवर तिचा एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यात ती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुंबई पोलिसांना विनंती करताना दिसते आहे. ('Please help me ...' Sherlyn Chopra's request to CM in Raj Kundra case)

Sherlyn Chopra Video : 'मला मदतीचा हात द्या...' राज कुंद्रा प्रकरणात शर्लिन चोप्राची थेट मुख्यमंत्र्यांना साद

मुंबई : पॉर्नोग्राफी प्रकरणात शिलपा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती राज कुंद्राचे (Raaj Kundra) नाव समोर आल्यापासून अभिनेत्री शर्लिन चोप्रा सतत त्याच्यावर आरोप करत आहे. आता शर्लिन चोप्राने राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांच्याविरोधात पोलीस तक्रार दाखल केली आहे. एवढंच नाही तर तिनं एक खास व्हिडीओ करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मदतीची मागणी केली आहे.

शर्लिनने तिच्या सोशल मीडियावर ही माहिती दिली. शर्लिन चोप्राने ट्विटरवर तिचा एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यात ती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुंबई पोलिसांना विनंती करताना दिसते आहे. कॅप्शनमध्ये शर्लिनने लिहिलं – ‘माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,
गृहमंत्री पाटीलजी, पोलिस आयुक्त, मुंबई, नगराळे जी, कृपया मला मदत करा.. माझा जाब लवकरात लवकर नोंदवण्यात यावा जेणेकरून सत्य बाहेर येईल.’

पाहा व्हिडीओ

शर्लिनने लावला विनयभंगाचा आरोप

शर्लिन चोप्राने शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रावर जबरदस्तीने घरात घुसून चुंबन घेण्यासारखे गंभीर आरोप केले आहेत. शर्लिनचा दावा आहे की, राज कुंद्रा यांनीच तिला या अश्लील उद्योगात आणले. 2019 पासून, ती राजच्या प्रौढ अनुप्रयोगांसाठी सामग्री तयार करत आहे. या दरम्यान, राज एकदा तिच्या घरात शिरला आणि त्याने शर्लिनसोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला.

राज कुंद्रा जामिनावर बाहेर

पॉर्न चित्रपट आणि आशयाच्या निर्मितीसाठी राज कुंद्रा बराच काळ मुंबई पोलिसांच्या निशाण्यावर होता. त्याला पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. तो सध्या त्याच्या घरी आहे आणि चौकशीला सामोरा जात आहे. मॉडेल्सची तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी राज कुंद्राविरोधात तपास सुरू केला होता आणि त्यानंतर पोलिसांनी राजची कुंडली उघडल्यावर लोक स्तब्ध झाले आहेत.

अश्लील चित्रपट रॅकेट प्रकरणी पोलिसांनी राज कुंद्राला मुख्य आरोपी बनवले आहे. त्यांच्यावर त्यांच्या साथीदारांच्या मदतीने पॉर्न चित्रपटांचे शुटींग आणि त्यांचा आशय विविध कंपन्या बनवण्याचा आणि त्यातून प्रचंड रक्कम कमवल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. मात्र, शिल्पा शेट्टीने मुंबई पोलिसांना दिलेल्या निवेदनात राज कुंद्राच्या फसवणुकीबद्दल तिला काही माहिती नसल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे.

संबंधित बातम्या

Adhura First Look Poster : सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाज गिलच्या गाण्याचं पोस्टर पाहून चाहते भावुक, ‘या’ दिवशी होणार गाणं रिलीज

Bombay Times Fashion Week : पांढऱ्या गाऊन ड्रेसमध्ये मलायकाचा रॅम्प वॉक, कातिलाना अदा पाहून चाहतेही झाले घायाळ!

Vicky Kaushal-Katrina Kaif : कतरिना कैफसोबत साखरपुड्याच्या बातमीवर विकी कौशलनं सोडलं मौन, म्हणाला…

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI