Vicky Kaushal-Katrina Kaif : कतरिना कैफसोबत साखरपुड्याच्या बातमीवर विकी कौशलनं सोडलं मौन, म्हणाला…

विकी कौशल आणि कतरिना कैफ रिलेशनशिपमध्ये असल्याच्या बातम्या खूप दिवसांपासून येत आहेत. कतरिनाच्या टीमने ही बातमी अफवा म्हणून फेटाळून लावली होती. आता विकी कौशलच्या साखरपुड्याच्या बातमी बद्दल बोललं जातं आहे. (Vicky Kaushal-Katrina Kaif: Vicky Kaushal broke the silence on the news of engagement with Katrina Kaif, said ...)

Vicky Kaushal-Katrina Kaif : कतरिना कैफसोबत साखरपुड्याच्या बातमीवर विकी कौशलनं सोडलं मौन, म्हणाला...

मुंबई : बॉलिवूड अभिनेता विकी कौशलचा (Vicky Kaushal) चित्रपट सरदार उधम OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला आहे. विकी कौशल या चित्रपटात सरदार उधम सिंह यांच्या भूमिकेत दिसला आहे. विकी कौशल सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. रिपोर्ट्सनुसार, विकी आणि कतरिना एकमेकांना डेट करत आहेत. आता चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान त्यांनी याबद्दल बोललं आहे.

विकी कौशल आणि कतरिना कैफ रिलेशनशिपमध्ये असल्याच्या बातम्या खूप दिवसांपासून येत आहेत. कतरिनाच्या टीमने ही बातमी अफवा म्हणून फेटाळून लावली होती. आता विकी कौशलच्या साखरपुड्याच्या बातमी बद्दल बोललं जातं आहे.

साखरपुड्याच्या चर्चेवर विकीने तोडलं मौन

साखरपुड्याच्या अफवा पसरवण्यासाठी विकीने पापाराझींना दोष दिला. त्याने लीडिंग डेलीला सांगितलं की तुम्ही मित्रांनी ही बातमी पसरवली आहे. योग्य वेळ आल्यावर मी लवकरच लग्न करेन. त्याची वेळही येईल.

कतरिना पोहोचली स्पेशल स्क्रिनिंगसाठी 

विकी कौशल आणि कतरिना कैफ अनेकदा एकत्र दिसतात. विकीला अनेक वेळा कतरिनाच्या घरी जाताना पाहिलं गेलं आहे. एवढंच नाही तर शुक्रवारी कतरिना कैफ सरदार उधमच्या स्पेशल स्क्रिनिंगला हजर होती.

कतरिनाने केलं चित्रपटाचे कौतुक

सरदार उधम पाहिल्यानंतर कतरिना कैफने सोशल मीडियावर चित्रपटाचे कौतुक केलं. सरदार उधमचे पोस्टर शेअर करत त्यांनी सुजित सरकारसह विकी कौशलचं कौतुक केलं. तिने लिहिलं – सुजित सरकारची दृष्टी कमाल होती. मनमोहक, उत्तम चित्रपट. शुद्ध कथाकथन. विकी कौशल शुद्ध प्रतिभा, प्रामाणिक आणि हृदयद्रावक आहे. यासह, तिने हार्ट इमोजी पोस्ट केली.

Vicky Kaushal

सरदार उधमबद्दल बोलायचं झालं तर, अमोल पराशर, बंडिता संधूसह अनेक कलाकार चित्रपटात विकी कौशलसह महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसले. या चित्रपटाचे दिग्दर्शन शूजित सरकार यांनी केलं आहे.

सरदार उधम

‘सरदार उधम’ मध्ये विकी कौशल मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटात तो एका स्वातंत्र्य सेनानीची भूमिका साकारत आहे. Amazon Prime Video वर तुम्ही हा चित्रपट पाहू शकता. या चित्रपटामध्ये विकी कौशल सरदार उधम यांची भूमिका साकारत आहे. ज्यांनी जालियनवाला बाग हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी जनरल डायरला लंडनमध्ये गोळ्या घातल्या होत्या. चाहते हा चित्रपट पाहण्यासाठी अतिशय उत्सुक आहेत.

‘सरदार उधम’ हा एका स्वातंत्र्य सेनानीचा बायोपिक आहे. सरदार उधम यांच्या जीवनाची कथा या चित्रपटात सांगितली गेली आहे, जी नक्कीच जाणून घेण्यासारखी आणि पाहण्यासारखी आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक शूजित सरकार आहेत.  ‘सरदार उधम’ हा एक चित्रपट आहे, जो तुम्हाला संपूर्ण वेळ खिळवून ठेवेल. चित्रपटाच्या शेवटच्या तासात तुम्ही जनरल डायरचा तिरस्कार करू लागता. कारण, तुम्ही चित्रपटात इतके रमता की, तुम्हाला ती पात्रे जाणवू लागतात. हा एक पिरीयड बायोपिक आहे जो बॉलिवूडमध्ये बनवलेल्या उर्वरित चित्रपटांपेक्षा खूप वेगळा आहे.

संबंधित बातम्या

Simi Garewal Birthday : बोल्ड पात्र साकारत खळबळ उडवणाऱ्या सिमी गरेवालचं निखळ सौंदर्य, पाहा फोटो

Birthday Special : बालकलाकार म्हणून करियरची सुरूवात; राष्ट्रीय पुरस्कारही प्राप्त, वाचा कीर्ती सुरेशचा फिल्मी प्रवास

Akshay Kumar : सेवानिवृत्त लष्करी अधिकाऱ्याने दाखवली ‘गोरखा’च्या पोस्टरमध्ये चूक, अक्षय कुमारने मानले आभार

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI