Akshay Kumar : सेवानिवृत्त लष्करी अधिकाऱ्याने दाखवली ‘गोरखा’च्या पोस्टरमध्ये चूक, अक्षय कुमारने मानले आभार

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने नुकतंच सोशल मीडियावर गोरखा चित्रपटातील त्याचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. अक्षयच्या आगामी चित्रपटातील हे पोस्टर गोरखा रायफल रेजिमेंटचे अधिकारी मेजर माणिक एम जोली यांनी त्यांच्या ट्वीटरवर शेअर केलं आहे. हे पोस्टर शेअर करताना त्यांनी एक गंभीर चूक सर्वांच्या नजरेस आणून दिली आहे. (Akshay Kumar: Retired Army officer points out mistake in 'Gorkha' poster, Akshay Kumar retweeted)

Akshay Kumar : सेवानिवृत्त लष्करी अधिकाऱ्याने दाखवली 'गोरखा'च्या पोस्टरमध्ये चूक, अक्षय कुमारने मानले आभार
Follow us
| Updated on: Oct 17, 2021 | 10:57 AM

मुंबई : सध्या नवनवीन चित्रपटांची घोषणा करण्यात येत आहे. त्यातच आता ‘अतरंगी रे’ (Atrangi Re) आणि ‘रक्षाबंधन’ (Raksha Bandhan) पाठोपाठ बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा (Akshay Kumar) एक नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं नाव ‘गोरखा’असून चित्रपटाची निर्मिती आनंद एल रॉय करत आहेत. नुकतंच या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. हा फर्स्ट लूक प्रदर्शित होताच तो सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. मात्र या पोस्टरमध्ये माजी लष्कर अधिकारी मेजर माणिक एम जोली यांनी एक चूक सांगितली आहे. “ही चूक गंभीर असून याप्रकरणी लक्ष द्यावे,” असा सल्लाही त्यांनी यावेळी अक्षयला दिला आहे. विशेष म्हणजे अक्षयनेही यावर प्रतिक्रिया देत “यापुढे मी काळजी घेईन,” असं सांगितलं आहे.

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने नुकतंच सोशल मीडियावर गोरखा चित्रपटातील त्याचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. हे पोस्टर शेअर करत त्याने लिहिलं, ‘कधी कधी तुमच्या समोर अशा कथा येतात ज्या तुम्हाला प्रेरणादायी वाटतात. त्यावर काम करण्याची तुमची इच्छा होते. अक्षयच्या आगामी चित्रपटातील हे पोस्टर गोरखा रायफल रेजिमेंटचे अधिकारी मेजर माणिक एम जोली यांनी त्यांच्या ट्वीटरवर शेअर केलं आहे. हे पोस्टर शेअर करताना त्यांनी एक गंभीर चूक सर्वांच्या नजरेस आणून दिली आहे.

पाहा ट्विट

मेजर माणिक एम जोली म्हणालेत, “प्रिय अक्षय कुमार, मी एक माजी गोरखा अधिकारी आहे. त्यामुळे तुम्ही या चित्रपटाची निर्मिती केल्याबद्दल मी सर्वप्रथम तुमचे आभार मानतो. पण तुम्हाला एक महत्त्वाची माहिती द्यायची आहे. या चित्रपटाच्या पोस्टरमधील खुकरी ही व्यवस्थित दाखवावी. खुकरी हे एक धारदार शस्त्र असून त्याची धार ही आतील बाजूला असते. ही तलवार नाही तर खुकरी आहे, जिचा वार आतील बाजूने होतो. यासाठी मी तुम्हाला खुकरीचा एक फोटोही पाठवत आहे. धन्यवाद,” असं ट्वीट त्यांनी केलं आहे.

मेजर माणिक एम जोली यांनी ही चूक दाखवल्यानंतर अक्षय कुमारने तातडीने त्यांना प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, “आदरणीय, मेजर जोली जी, तुम्ही ही चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. या चित्रपटाचे चित्रिकरण करतेवेळी आम्ही याची अत्यंत काळजी घेऊ. ‘गोरखा’ हा चित्रपट बनवताना मला खूप अभिमान वाटतो आहे. या चित्रपटातून खरं वास्तव लोकांच्या समोर आणण्यासाठी कोणत्याही सूचनांचे स्वागत केलं जाईल,” अशी प्रतिक्रिया अक्षयने दिली.

‘गोरखा’ हा चित्रपट भारतीय लष्कराच्या गोरखा रेजिमेंटच्या पाचव्या गोरखा रायफल्सचे अनुभवी अधिकारी मेजर जनरल इयान कार्डोझो यांच्या जीवनावर आधारित आहे.. कार्डोजो यांनी 1962, 1965 साली झालेले युद्ध आणि 1971 साली भारत-पाकिस्तान युद्धात कामगिरी बजावली होती.

संबंधित बातम्या

Video | ‘नराज’ नाही ‘नाराज’, अशुद्ध हिंदीमुळे जेव्हा शाहरुख खानला खावी लागली होती बोलणी, रेणुका शहाणेंनी सांगितला भन्नाट किस्सा…

अमिताभ बच्चन ते आमिर खानपर्यंत, जेव्हा बॉलिवूड कलाकारांना मिळाल्या जीवे मारण्याच्या धमक्या…

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.