Video | ‘नराज’ नाही ‘नाराज’, अशुद्ध हिंदीमुळे जेव्हा शाहरुख खानला खावी लागली होती बोलणी, रेणुका शहाणेंनी सांगितला भन्नाट किस्सा…

अभिनेत्री रेणुका शहाणे (Renuka Shahane) आणि अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) दूरदर्शनच्या टीव्ही सीरियल सर्कसमध्ये एकत्र दिसल्याला आता जवळपास 20 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. ही टीव्ही मालिका 1989मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली होती, ज्यात अनेक बड्या कलाकारांनी एकत्र काम केले होते.

Video | ‘नराज’ नाही ‘नाराज’, अशुद्ध हिंदीमुळे जेव्हा शाहरुख खानला खावी लागली होती बोलणी, रेणुका शहाणेंनी सांगितला भन्नाट किस्सा...
Circus Scene


मुंबई : अभिनेत्री रेणुका शहाणे (Renuka Shahane) आणि अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) दूरदर्शनच्या टीव्ही सीरियल सर्कसमध्ये एकत्र दिसल्याला आता जवळपास 20 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. ही टीव्ही मालिका 1989मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली होती, ज्यात अनेक बड्या कलाकारांनी एकत्र काम केले होते. त्या काळात हा शो मूळ अपोलो सर्कसमध्ये चित्रित करण्यात आला. कोरोना काळात दूरदर्शनवरील अनेक क्लासिक टीव्ही शो पुन्हा दाखवले जात आहेत, जे चाहत्यांना बरेच आवडत आहेत. याकाळातच शाहरुख खानची ‘सर्कस’ ही मालिका देखील पुन्हा प्रक्षेपित झाली होती. या टीव्ही शोमध्ये अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी मारियाची भूमिका साकारली होती, तर शाहरुख खानने शेखरन रायची भूमिका साकारली होती.

रेणुका शहाणे यांनी कपिल शर्माच्या ‘द कपिल शर्मा शो’मध्ये पती आशुतोष राणा यांच्यासोबत हजेरी लावली होती. यावेळी स्वतः रेणुका शहाणे यांनी या मालिकेच्या सेटवर शाहरुख सोबत घडलेला भन्नाट किस्सा ऐकवला.

अशुद्ध हिंदीमुळे खावी लागली बोलणी!

यावेळी कपिल शर्माने रेणुका शहाणे यांना विचारले की, मालिकेच्या सेटवर जर उशीर झाला तर तुम्ही सीनमध्ये मुद्दाम हिंदी संवाद मराठीत बोलायचात, हे खरं आहे का? यावर उत्तर देताना रेणुका म्हणाल्या की, असं अजिबात नाही. मी हिंदी अशा टोनमध्ये बोलायचे की ऐकणाऱ्याला वाटायचं मी मराठीमध्येच बोलत आहे. पण असं काहीच नव्हतं. एकदा असाच सीन झाल्यानंतर अझीझ मिर्झा माझ्याकडे आले आणि म्हणाले की, रेणुका तुला तुझ्या हिंदी भाषेवर जरा काम करावं लागेल. हिंदी वाच नित शिकून घे, म्हणजे तुझ्या बोलण्यात हिंदी भाषेची लकब येईल.

शाहरुखलाही मिळाली तंबी!

यावेळी आमच्या सहकलाकार असणाऱ्या रेखा सहाय यांना खूप वाईट वाटले त्या म्हणाल्या की शाहरुख खानचा पंजाबी लहेजा चालतो. मग, रेणुका तर निदाद स्पष्ट उच्चार तरी करते. त्याला बोलले जात नाही, तर तिला का बोलता? यावर अझीझ मिर्झा यांना वाटले की आपण दुजाभाव करत आहोत. यानंतर ते शाहरुख खानकडे गेले आणि त्याला म्हणाले की, शाहरुख तुला तुझी पंजाबी लकब बदलावी लागेल. ते ‘अराम’ नाही ‘आराम’ असतं आणि ‘नराज’ नाही तर ‘नाराज’. यानंतर शाहरुख देखील सतत ‘नराज’ नाही ‘नाराज’ अशी उजळणी करत होता.

… अन् भलताच शब्द बोलून बसला शाहरुख!

काहीवेळाने चित्रीकरण सुरु झाले. सीन असा होता की, शाहरुखला रेणुका यांच्या जवळ येऊन एक संवाद बोलायचा होता, ज्यात नाराज हा शब्द होता. त्याने या शब्दाची भरपूर उजलाणु केली होती. मात्र, संवाद सुरु होताच तो चुकून नाराजच्या ऐवजी ‘अनार’ बोलून बसला. अशावेळी तिथे उपस्थित असेलल्या प्रत्येकामध्येच जोरदार हशा पिकला होता.

पाहा व्हिडीओ :

हेही वाचा :

ऋतुराज गायकवाडची दमदार खेळी, मैदानीतील धुव्वेबाजी पाहून चाहत्यांना आली मराठी अभिनेत्रीची आठवण!

Prachi Singh : टीम इंडियाचा कोणता फलंदाज करतोय प्राची सिंहला डेट?; सोशल मीडियात चर्चांना उधाण!

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI