AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Radhe | भारतातील केवळ 3 थिएटरमध्ये प्रदर्शित होणार ‘राधे’, जाणून घ्या कसा आणि कुठे पाहू शकता सलमानचा ‘अॅक्शन पॅक’?

बॉलिवूडचा ‘दबंग’ अर्थात सलमान खान (Salman Khan) याचा चित्रपट ‘राधे : युवर मोस्ट वॉन्टेड भाई’ (Radhe Your Most Wanted Bhai) अखेर आज रिलीज झाला आहे. चाहते या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत होते.

Radhe | भारतातील केवळ 3 थिएटरमध्ये प्रदर्शित होणार ‘राधे’, जाणून घ्या कसा आणि कुठे पाहू शकता सलमानचा ‘अॅक्शन पॅक’?
राधे
| Updated on: May 13, 2021 | 12:50 PM
Share

मुंबई : बॉलिवूडचा ‘दबंग’ अर्थात सलमान खान (Salman Khan) याचा चित्रपट ‘राधे : युवर मोस्ट वॉन्टेड भाई’ (Radhe Your Most Wanted Bhai) अखेर आज रिलीज झाला आहे. चाहते या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत होते. हा चित्रपट काही चित्रपटगृहांसह ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहे. झीप्लेक्स आणि झी 5च्या पे पर व्यू प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे. भारतातील बर्‍याच ठिकाणी थिएटर बंद असल्यामुळे ‘राधे’ काही मोजक्याच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. यासह, मल्टिप्लेक्सचे मालक चित्रपट डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाल्यामुळे नाराज झाले आहेत (Radhe Your Most Wanted Bhai movie release know where you can watch this movie).

अनेक राज्यात थिएटर बंद असल्यामुळे, भारतातील नेमक्या कोणत्या चित्रपटगृहात हा चित्रपट रिलीज होणार हे लोकांना माहित नाही. आपणदेखील मोठ्या पडद्यावर सलमान खानच्या चित्रपटाचा आनंद घ्यायचा विचार करत असाल, तर हा चित्रपट नेमका कोणत्या सिनेमागृहात प्रदर्शित होणार हे जाणून घ्या. केवळ पूर्वोत्तर राज्य आणि त्रिपुरा मधील लोकच मोठ्या पडद्यावर या चित्रपटाचा आनंद घेऊ शकणार आहेत.

एसएसएल सिनेमा प्रायव्हेट लिमिटेडचे ​​सीईओ सतादीप सता यांनी ट्वीट केले होते की, सलमान खानचा चित्रपट राधे हा अगरतला येथील त्यांच्या थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. नोव्हेंबर 2020मध्ये त्यांनी सलमान खानला पत्र लिहून ‘राधे’ डिजिटल व्यासपीठावर प्रदर्शित करू नये, अशी विनंती केली होती.

‘या’ 3 चित्रपटगृहात प्रदर्शित होणार राधे!

बॉलिवूड हंगामाच्या अहवालानुसार, सतदीप साहाने सांगितले होते की, हा चित्रपट त्यांचे तीन थिएटर एसएसआर रुपासी, अगरतलातील बालाका सिनेमा आणि एसएसआर धर्मनगर थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. हे तिन्ही थिएटर त्रिपुरा राज्यात येतात. त्रिपुरातील नाईट कर्फ्यू सायंकाळी 6 वाजल्यापासून सुरू होतो, म्हणून चित्रपटाचा शेवटचा शो दुपारी 3 वाजता ठेवण्यात आला आहे (Radhe Your Most Wanted Bhai movie release know where you can watch this movie).

दुबईमध्ये रेड कार्पेट प्रीमियर

‘राधे’ हा चित्रपट दुबईसह जगातील इतर देशांतील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. यासाठी 12 मेला दुबईमध्ये रेड कार्पेट प्रीमियरही आयोजित करण्यात आला होता. ज्यासाठी सलमानच्या चाहत्यांमध्ये बरीच उत्सुकता पाहायला मिळतेय.

घरबसल्या पाहू शकता ‘राधे’ चित्रपट!

राधे या चित्रपटासाठी 249 रुपये देऊन, तुम्ही तुमच्या कुटूंबासोबत हा चित्रपट ZEEPlex आणि Zee5 वर पाहू शकता. महत्त्वाचं म्हणजे हा चित्रपट एकदा पैसे दिल्यानंतर केवळ एकदाच पाहता येईल. अर्थात तुम्हाला हा चित्रपट पुन्हा पाहण्याची इच्छा असेल, तर तुम्हाला पुन्हा पैसे द्यावे लागतील. ही किंमत 249 रुपये ठेवण्यात आली आहे.

परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर चित्रपट गृहात प्रदर्शित करणार!

अभिनेता सलमान खानने आपल्या चाहत्यांना आश्वासन दिले आहे की, जेव्हा भारतात कोरोनाची परिस्थिती सुधारेल, तेव्हा तो ‘राधे’ चित्रपटगृहात प्रदर्शित करेल. या चित्रपटाला अजूनही चांगला प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे, असे सलमानने म्हटले आहे.

(Radhe Your Most Wanted Bhai movie release know where you can watch this movie)

हेही वाचा :

Photo : दिव्यांका त्रिपाठीची केपटाऊनमध्ये धमाल, शो जिंकण्यासाठी करावी लागणार कमाल

Photo : ‘प्‍यार में उम्र नहीं, दिल मायने रखता है’, या अभिनेत्री नवऱ्यापेक्षा वयाने मोठ्या!

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.