Photo : ‘प्‍यार में उम्र नहीं, दिल मायने रखता है’, या अभिनेत्री नवऱ्यापेक्षा वयाने मोठ्या!

या कलाकारांनी त्यांच्यापेक्षा मोठ्या मुलींशी लग्न केलं आहे आणि सुखात आयुष्य जगत आहेत. ('Age doesn't matter in Love, heart matters', these actresses are older than their husband!)

1/7
Couples
असे अनेक लोकप्रिय टेलिव्हिजन कलाकार आहेत ज्यांच्यासाठी वय ही एक फक्त संख्या आहे आणि प्रेम जास्त आहे. आज आम्ही अशा जोडप्यांबद्दल सांगणार आहोत ज्यांनी त्यांच्यापेक्षा मोठ्या मुलींशी लग्न केलं आहे आणि सुखात आयुष्य जगत आहेत.
2/7
Sanket Bhosale
संकेत भोसले-सुगंधा मिश्रा : संकेत भोसले आणि सुगंधा मिश्रा या दोघांचं 26 एप्रिल 2021 ला लग्न झालं. दोघं अनेक दिवस एकमेकांना डेट करत होते. संकेत सुगंधापेक्षा चार वर्षांनी लहान आहे. या दोघांचं लॉकडाऊन दरम्यान लग्न झालं त्यामुळे घरातल्या लोकांसोबतच सोहळा पार पडला.
3/7
Bharti Singh
हर्ष लिंबाचिया-भारतीसिंग : भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया एका कॉमेडी शोच्या सेटवर भेटले, त्यानंतर दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. या जोडप्यानं 3 डिसेंबर 2017 रोजी कुटुंब आणि मित्रांच्या उपस्थितीत लग्न गाठ बांधली. दोघांच्या वयाबद्दल बोलायचं झालं तर भारती सिंह हर्षपेक्षा अडीच वर्षांहून मोठी आहे.
4/7
Jay Bhanushali
जय भानुशाली आणि माही : लोकप्रिय होस्ट जय भानुशाली एका पार्टीदरम्यान माही विजला भेटला होता. नोव्हेंबर 2011 मध्ये त्यांनी एकमेकांशी लग्न केलं. माहीपेक्षा जय दोन वर्षांनी लहान आहे.
5/7
Prince
प्रिन्स नरुला-युविका चौधरी : प्रिन्स नरुला आणि युविका चौधरी यांची बिग बॉसच्या घरात भेट झाली होती. प्रिन्स युविकाच्या प्रेमात पडला आणि नंतर युविकाला तो आवडला. 12 ऑक्टोबर 2018 रोजी दोघांनी गाठ बांधली. प्रिन्स युविकापेक्षा सात वर्षे लहान आहे.
6/7
Krushna
कृष्णा अभिषेक- कश्मीरा शाहः कॉमेडियन कृष्णा अभिषेकनं जुलै 2013 मध्ये कश्मीरा शहाशी लग्न केलं होतं. लग्नाआधी हे जोडपे बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत होतं. कृष्णा पत्नी कश्मिरापेक्षा 11 वर्षांनी लहान आहे. कृष्णा आणि काश्मिरा हे दोन मुलांचे आई-वडिल आहेत, त्यांनी सरोगसीद्वारे मुलांचं स्वागत केलं.
7/7
Neha Dhupia
अंगद बेदी आणि नेहा धुपिया : नेहा धुपिया आणि अंगद बेदी यांनी 10 मे 2018 ला लग्न करून सर्व चाहत्यांना धक्का दिला. दिल्लीतील गुरुद्वारामध्ये आपल्या कुटुंबासमोर त्यांनी सात फेरे घेतले. लग्नाच्या 6 महिन्यांनंतर नेहा आणि अंगद यांनी मुलगी मेहरचं स्वागत केलं. नेहा धुपिया अंगद बेदीपेक्षा 2 वर्ष मोठी आहे.