Raj Kundra Case | आपली अटक बेकायदेशीर असल्याचा दावा, राज कुंद्राची मुंबई हायकोर्टात धाव

प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्रा (Raj Kundra) याने त्याच्या अटकेच्या विरोधात आता मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. आपली अटक बेकायदेशीर असल्याचं, त्याचं म्हणणं आहे.

Raj Kundra Case | आपली अटक बेकायदेशीर असल्याचा दावा, राज कुंद्राची मुंबई हायकोर्टात धाव
राज कुंद्रा

मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्रा (Raj Kundra) याने त्याच्या अटकेच्या विरोधात आता मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. आपली अटक बेकायदेशीर असल्याचं, त्याचं म्हणणं आहे. राज कुंद्रा याला मुंबई क्राईम ब्रांचने अटक केली आहे. आज त्याचा दुसऱ्यांना रिमांड घेण्यात आला. यावेळी त्याला पुन्हा पोलीस कोठडी सुनावण्यात आली. यानंतर त्याने तत्काळ मुंबई हायकोर्टात हेबियस कॉर्पस याचिका दाखल केली आहे.  या याचिकेत त्याने आपली अटक बेकायदेशीर असल्याचं म्हटलं आहे.

व्यावसायिक राज कुंद्रा आणि रायन थॉर्प या दोघांना आज रिमांडसाठी कोर्टात हजर करण्यात आलं असता, त्यांना 27 जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. राज कुंद्रा आणि रॉयन यांना अश्लील फिल्म बनवण्याच्या आरोपा खाली अटक करण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात अनेक महत्वाचे खुलासे होत असल्याने यांच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी क्राईम ब्रांचचे वकील एकनाथ ढमाल यांनी केली होती. ती कोर्टाने मान्य केली आहे.

राज कुंद्राला साथीदारसह अटक

व्यावसायिक राज कुंद्रा आणि त्याचा सहकारी रॉयन थॉर्प यांना 20 जुलै रोजी अटक करण्यात आली आहे. मुंबई क्राईम ब्रांचंने अटक केली आहे. क्राईम ब्रांचने फेब्रुवारी महिन्यात मालवणी येथे एक बंगल्यात धाड टाकून काही जणांना अटक केली होती. अश्लील फिल्म बनवण्याच्या गुन्ह्यात त्यांना अटक करण्यात आली होती. या तपासात राज कुंद्रा याच नाव उघड झाल्यानंतर राज कुंद्रा आणि रॉयन याला अटक करण्यात आली आहे.

आणखी तपासाची गरज

आज (23 जुलै) त्यांना रिमांड साठी हजर करण्यात आलं असता सरकारी वकील एकनाथ ढमाल यांनी युक्तिवाद केला. या गुन्ह्याची व्याप्ती मोठी आहे. आरोपी कुंद्रा याच्या कार्यलयाची झडती घेतली असता, त्यात मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक पुरावे सापडले आहेत. या आरोपीची हॉटशॉट साईट बंद पाडण्यात आल्यानंतर त्यांनी ‘बॉली फिल्म’ नावाची साईट सुरू केली होती. त्यांच्या येस बँकेच्या खात्यात युनायटेड बँक ऑफ आफ्रिका येथून मोठ्या प्रमाणात रक्कम आली आहे. या आणि आदी अनेक मुद्यावर तपास करायचा असल्याने कोठडी वाढवून देण्याची मागणी केली होती. कोर्टाने ती मागणी मान्य करत 27 जुलैपर्यंत कोठडी वाढवली आहे.

अश्लील चित्रपटांद्वारे मिळवलेले पैसे ऑनलाईन सट्टेबाजीसाठी वापरले जात असल्याचा त्यांना संशय आहे, असा आरोप मुंबई पोलिसांनी कोर्टाला केला आहे. या कारणास्तव, राज कुंद्राचे येस बँकेच्या खात्याची आणि युनायटेड बँक खात्याची चौकशी झाली पाहिजे, असेही म्हटले आहे.

(Raj Kundra Case Claiming that his arrest was illegal Raj Kundra appeals to the Mumbai High Court)

हेही वाचा :

Raj Kundra Controversy : बिटकॉईन घोटाळ्यापासून ते आयपीएल मॅच फिक्सिंगपर्यंत, राज कुंद्राभोवती नेहमीच वादाचं वलय!

Raj Kundra case : मुंबई ते लंडन चालणाऱ्या अश्लील चित्रपट रॅकेटची संपूर्ण माहिती, राज कुंद्राच्या आयटी हेडला अटक

Raj Kundra case : 30-40 अ‍ॅप्स, शेकडो अश्लील व्हिडीओ, भलं मोठं भांडार मुंबई पोलिसांच्या हाती, राज कुंद्रांचा पाय खोलात 

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI