सिनेमात खलनायक, पण गाव दत्तक घेऊन विकासमार्गाने ठरतोय सर्वसामान्यांचा नायक

प्रकाश राज यांनी महबूब नगरमधील कोंडा रेड्डीपल्ली केशमपेट या गावाचे रूपच बदलून टाकल्याचे दिसते आहे. यामुळे आता प्रकाश राजवर काैतुकांचा वर्षाव होत आहे.

सिनेमात खलनायक, पण गाव दत्तक घेऊन विकासमार्गाने ठरतोय सर्वसामान्यांचा नायक
Follow us
| Updated on: Sep 21, 2022 | 10:08 AM

मुंबई : अभिनेता सोनू सूद गरजू लोकांना मदत करण्यासाठी ओळखला जातो. कोरोनाच्या काळात सोनूने अनेकांना मदत केलीये. मात्र, सोनू व्यतिरिक्तही असे बरेच कलाकार (Artist) आहेत, जे गरीब आणि गरजू लोकांच्या मदतीला कायम धावून जातात. त्यापैकीच एक असा कलाकार आहे, जो चित्रपटांमध्ये (Movie) कायमच खलनायकची भूमिका करतो. परंतू रिअल लाईफमध्ये तो सर्वसामान्य लोकांसाठी एक नायकच ठरलांय. हा दुसरा तिसऱ्या कोणी कलाकार नसून सिंघम चित्रपटात खलनायकाची भूमिका करणारा जयकांत शिकरे अर्थात प्रकाश राज (Prakash Raj) आहे.

इथे पाहा गावातील विकासाचे फोटो…

हा अभिनेता गावकऱ्यांसाठी ठरला खरा नायक

प्रकाश राज सध्या खास केलेल्या कामामुळे चर्चेत आहे. प्रकाश राजने तेलंगणातील एक गाव दत्तक घेऊन गावाचा जबरदस्त विकास केलाय. एखाद्या मोठ्या शहरात देखील ऐवढे सुंदर रस्ते नसतील तेवढे तेलंगणातील या गावात बघायला मिळतात. प्रकाश राज यांनी कोंडा रेड्डीपल्ली केशमपेट या गावाचे रूपच बदलून टाकल्याचे दिसते आहे. गावाचे फोटो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. प्रकाश राज यांचे काैतुक आता सर्वच स्तरातून केले जातंय.

गावाच्या विकासाचे फोटो पाहून अभिनेत्यावर काैतुकांचा वर्षाव

तेलंगणा राज्यातील मंत्री केटीआर यांनी ही माहिती दिली आहे. केटीआर यांनी गावाचे हे फोटो रिट्विट केले आहेत. इतकेच नाही तर त्यांनी प्रकाश राज आणि तेथील आमदारांचे काैतुकही केले आहे. यावर अभिनेत्याने कमेंट करत लिहिले की, हे सर्व काही तुमच्या पाठिंब्यामुळे झाले आहे. आता प्रकाश राज यांचे हे ट्विट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या ट्विटमध्ये गावाचे एकून चार फोटो शेअर करण्यात आले आहेत.

Non Stop LIVE Update
मला इंग्रजी येत नाही... धंगेकरांचा साधेपणा अन् थरूर यांच्याकडून कौतुक
मला इंग्रजी येत नाही... धंगेकरांचा साधेपणा अन् थरूर यांच्याकडून कौतुक.
महायुतीच्या 'त्या' जाहिरातीवर काँग्रेसचा आक्षेप, थेट आयोगाकडे तक्रार
महायुतीच्या 'त्या' जाहिरातीवर काँग्रेसचा आक्षेप, थेट आयोगाकडे तक्रार.
नारायण राणेंसाठी राज ठाकरे मैदानात, उद्धव ठाकरेंवर केला हल्लाबोल?
नारायण राणेंसाठी राज ठाकरे मैदानात, उद्धव ठाकरेंवर केला हल्लाबोल?.
पंकजा मुंडेंच्या शब्दानंतर अपक्षाची माघार? बीडमध्ये 'ती' क्लिप व्हायरल
पंकजा मुंडेंच्या शब्दानंतर अपक्षाची माघार? बीडमध्ये 'ती' क्लिप व्हायरल.
बारामतीकरांचा कौल देणार? अजित पवार की शरद पवार? कोण मारणार मैदान?
बारामतीकरांचा कौल देणार? अजित पवार की शरद पवार? कोण मारणार मैदान?.
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.