आर्यन खानला मुंबईत अटक, पण शाहरुख खान दुबईत, जाणून घ्या कारण?

शाहरुख खानची प्रतिक्रिया घेण्यासाठी अनेकांनी धावाधावही सुरु केली. मात्र, शाहरूख खान सध्या दुबईत असल्याची माहिती समोर आली आहे. दुबईत सध्या आयपीएल स्पर्धा सुरु आहे. शाहरुख खान हा आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघाचा मालक आहे. | Shah Rukh Khan's Son Aryan Khan

आर्यन खानला मुंबईत अटक, पण शाहरुख खान दुबईत, जाणून घ्या कारण?
शाहरुख खान आणि आर्यन खान

मुंबई: ड्रग्ज पार्टी प्रकरणात बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ताब्यात घेण्यात आले आहे. अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (NCB) शनिवारी रात्री गोव्याला जाणाऱ्या एका क्रुझवरील रेव्ह पार्टीवर धडक कारवाई केली होती. यावेळी आर्यन खानसह आठ जणांना ताब्यात घेण्यात आले होते. काहीवेळापूर्वीची एनसीबीकडून आर्यन खानला ताब्यात घेण्यात आल्याच्या वृत्ताला दुजोरा देण्यात आला. त्यानंतर सगळ्यांचे लक्ष शाहरूख खान काय प्रतिक्रिया देणार, याकडे लागले होते.

शाहरुख खानची प्रतिक्रिया घेण्यासाठी अनेकांनी धावाधावही सुरु केली. मात्र, शाहरूख खान सध्या दुबईत असल्याची माहिती समोर आली आहे. दुबईत सध्या आयपीएल स्पर्धा सुरु आहे. शाहरुख खान हा आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघाचा मालक आहे. ही स्पर्धा सध्या रोमांचक वळणावर उभी आहे. त्यामुळेच शाहरूख सध्या दुबईत असल्याचे कळते. दरम्यान, आर्यन खानवरील कारवाईनंतर पोलिसांचे कोणतेही पथक अद्याप शाहरूख खानच्या घरी गेलेले नाही. त्यामुळे आता पुढे काय घडणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

एनसीबीकडून रात्रभर आर्यन खानची कसून चौकशी

आर्यन खानसह आठ जणांना एनसीबीने ताब्यात घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये अरबाझ मर्चंट, मूनमून धमेचा, नुपूर सारिका, इस्मित सिंग, मोहक जैस्वाल, विक्रांत चोकेर आणि गोमित चोप्रा यांचा समावेश आहे.

एनसीबीने रात्रभर या सगळ्यांची कसून चौकशी करुन त्यांचे जबाब नोंदवले आहेत. आता थोड्याचवेळात या सगळ्यांवर गुन्हे दाखल करुन त्यांना अटक केली जाईल. त्यानंतर आर्यन खानसह आठ जणांची वैद्यकीय चाचणी करुन त्यांना किला कोर्टात हजर करण्यात येईल. यावेळी आर्यन खानची रवानगी पोलीस कोठडीत होणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. प्राथमिक माहितीनुसार, रेव्ह पार्टीवर धाड टाकण्यात आली तेव्हा आर्यन खान त्याठिकाणी उपस्थित होता. याठिकाणी एमडी, कोकेन आणि चरसचा मोठा साठा मिळाला. त्यामुळे आता न्यायालय काय निर्णय देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

कपड्यांमधून ड्रग्ज आणले

पार्टीमध्ये सहभागी झालेल्या व्यक्तींनी पँटच्या शिलाईत, महिलांच्या पर्समधील हँडलमध्ये, अंडरवेअरच्या शिलाईत तसंच कॉलरच्या शिलाईतून अंमली पदार्थ आणले होते. अंमली पदार्थ तस्करांच्या मुसक्या आवळल्यानंतर त्यांनीच या पार्टीबद्दल माहिती दिली होती. या माहितीच्या आधारे एनसीबीने छापा टाकून एकूण 22 जणांना ताब्यात घेतलं. कोडवर्ड वापरुन ही पार्टी आयोजित करण्यात आली होती. RTPCR असा हा कोड असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

संबंधित बातम्या :

मुंबईत नार्कोटिक्स ब्युरोची मोठी कारवाई; क्रुझवरील रेव्ह पार्टीवर धाड, बड्या अभिनेत्याच्या मुलाला अटक?

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात 35 वी अटक, डॅशिंग अधिकारी समीर वानखेडेंवर कौतुकाचा वर्षाव

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI