Mira Rajput | स्टार वाइफ हा शब्द ऐकला की चिड येते म्हणत मीरा राजपूत हिने मनातील खदखद केली व्यक्त

शितल मुंडे, Tv9 मराठी

Updated on: Dec 04, 2022 | 4:24 PM

नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमुळे मीरा चर्चेत आलीये.

Mira Rajput | स्टार वाइफ हा शब्द ऐकला की चिड येते म्हणत मीरा राजपूत हिने मनातील खदखद केली व्यक्त

मुंबई : बाॅलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा राजपूत हे बाॅलिवूडमधील फेमस कपल्सपैकी एक आहेत. मीरा सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. मीरा चाहत्यांसोबत फोटो आणि व्हिडीओ शेअर करते. नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमुळे मीरा चर्चेत आलीये. मीरा म्हणाली की मला स्टार वाइफ या शब्दाची प्रचंड चिड आहे. स्टार वाइफ शिवाय काहीतरी एक वेगळी ओळख सर्वांचीच असते. परंतू जेंव्हा तुमच्या नावासमोर स्टार वाइफ हा टॅग लागतो. त्यावेळी तुमची स्वत: ची ओळख लोक विसरून जायला लागतात.

मीरा राजपूत पुढे म्हणाली की, मला अजिबातच स्टार वाइफ हा शब्द ऐकायला आवडत नाही. स्टार किड्स आणि स्टार वाइफ हे शब्द ऐकले की मला कायमच चिड येते. लोकांनी आता थोडे पुढे जाण्याची नक्कीच गरज आहे.

लोकांनी हा विचार करायला हवा की, स्टार वाइफ आणि स्टार किड्स यापेक्षाही त्यांची वेगळी ओळख आहे. पुढे मीरा म्हणाली की, मुळात म्हणजे स्टार वाइफ याची मला व्याख्याच कळत नाही. मीरा नेपोटिज्म यावरही बोलली आहे.

आपण नेहमीच बघितले असेल की, एखाद्या फेमस अभिनेत्याच्या पत्नीला स्टार वाइफ हा टॅग दिला जातो. परंतू कधीच कुठल्याही अभिनेत्रीच्या पतीला स्टार हसबॅंड हा टॅग का दिला जात नाही. फक्त अभिनेत्याच्याच पत्नीला स्टार वाइफ हा टॅग दिला जातो.

इतकेच नाही तर पुढे मीरा म्हणाली की, मला स्टार वाइफ आणि स्टार किड्स या शब्दाची चिड येते. मला असे वाटते की, हे दोन शब्द कायमसाठी बॅन करायला हवेत. आता मीराची ही मुलाखत चर्चेचा विषय नक्कीच ठरलीये.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI