Vivek Agnihotri | विवेक अग्निहोत्री यांचा पारा पुन्हा चढला, म्हणाले बेरोजगार बॉलिवूड

शितल मुंडे, Tv9 मराठी

|

Updated on: Dec 04, 2022 | 3:39 PM

अनुपम खेर यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत नदव लापिडचा चांगलाच समाचार घेतला होता.

Vivek Agnihotri | विवेक अग्निहोत्री यांचा पारा पुन्हा चढला, म्हणाले बेरोजगार बॉलिवूड

मुंबई : विवेक अग्निहोत्री त्यांच्या बिनधास्त बोलण्यामुळे कायमच चर्चेत असतात. नुकताच द काश्मीर फाइल्स या चित्रपटाबद्दल नदव लापिड याने एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. ज्यावर सर्वच स्तरातून टीका केली जात होती. त्यादरम्यान विवेक अग्निहोत्री यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट आणि व्हिडीओ शेअर करत नदव लापिड याला ओपन चॅलेंज दिले होते. मात्र, काही वेळामध्येच नदवने द काश्मीर फाइल्स चित्रपटाबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल माफी मागितली होती. अनुपम खेर यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत नदव लापिडचा चांगलाच समाचार घेतला होता.

विवेक अग्निहोत्री हे आता थोड्या वेगळ्या कारणामुळे चर्चेत आले आहेत. काही दिवसांपूर्वी एक चर्चा होती की, विवेक अग्निहोत्री यांनी 17.9 कोटींचे घर खरेदी केले आहे. हे घर त्यांच्या पत्नी पल्लवी जोशी यांच्या नावावर घेतल्याचे सांगितले जात होते.

विवेक अग्निहोत्री आणि त्यांची पत्नी पल्लवी जोशी यांनी मुंबईतील वर्सोवा येथील पार्थेनॉन टॉवर्समध्ये एक अपार्टमेंट खरेदी केले आहे. द काश्मीर फाइल्स चित्रपटाच्या यशानंतर त्यांनी हे घर बुक केल्याचे सांगितले जात होते.

यावरच आता विवेक अग्निहोत्री यांनी मोठा खुलासा केला असून असे कोणतेही घर घेतले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. इतकेच नाही तर या फक्त आणि फक्त अफवा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

विवेक अग्निहोत्री यांनी म्हटले आहे की, दररोज नवीन अपार्टमेंट बांधल्याबद्दल बेरोजगार ‘बॉलिवूडियन्स’चे आभार मानतो. काही दिवसांपूर्वी विवेक अग्निहोत्री यांनी बाॅलिवूडच्या फ्लाॅप जाणाऱ्या चित्रपटांबद्दल देखील मोठे विधान केले होते.

द काश्मीर फाइल्स या चित्रपटाबद्दल बोलताना विवेक अग्निहोत्री म्हणाले होते की, मी चित्रपट तयार करण्यापूर्वी तब्बल 700 लोकांना प्रत्यक्षात भेटलो होतो. हे लोक असे होते ज्यांच्या आई-वडील, बहिण, भाऊ यांच्यावर अत्याचार झाले होते.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI