स्वतःच्याच लग्नात तीन तास उशिरा पोहोचले होते शत्रुघ्न सिन्हा, 5 वर्षांच्या डेटिंगनंतर बांधली लग्नगाठ!

चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) यांनी त्यांच्या लग्नाबाबत एक महत्त्वपूर्ण खुलासा केला आहे. लग्नाच्या दिवशीही ते कसे उशीर पोहोचले होते, हे त्यांनी सांगितले होते.

स्वतःच्याच लग्नात तीन तास उशिरा पोहोचले होते शत्रुघ्न सिन्हा, 5 वर्षांच्या डेटिंगनंतर बांधली लग्नगाठ!
Shatrughna Sinha
Follow us
| Updated on: Sep 26, 2021 | 8:22 AM

मुंबई : चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) यांनी त्यांच्या लग्नाबाबत एक महत्त्वपूर्ण खुलासा केला आहे. लग्नाच्या दिवशीही ते कसे उशीर पोहोचले होते, हे त्यांनी सांगितले होते. त्यांनी त्यांच्या उशिरा येण्याच्या सवयीबद्दल सांगताना हा किस्सा सांगितला होता. वास्तविक, शत्रुघ्न सिन्हा केवळ त्यांच्या अभिनयासाठीच नव्हे तर, त्यांच्या उशिराने येण्याच्या सवयीमुळे देखील ओळखले जातात. अगदी ते स्वतःच्या लग्नात देखील उशिरा आले होते, ज्याबद्दल त्यांनी अलीकडेच एका कार्यक्रमात खुलासा केला आहे.

70 आणि 80च्या दशकात शत्रुघ्न सिन्हा यांनी आपल्या अभिनयामुळे प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य केले होते. पण, ते अजिबात वक्तशीर नव्हते. त्यांनी स्वतः देखील खुलासा केला की, तो स्वतःच्याच लग्नाला 3 तास उशिरा पोहोचले होते.

उशिरा जाऊनही काम पूर्ण करायचे!

शत्रुघ्न सिन्हा उद्योगातील बदलांविषयी आणि ते काम करण्याच्या पद्धतीबद्दल नेहमीच बोलतात. असाच एक किस्सा सांगताना त्यांनी स्वतःच्या लग्नाची गोष्ट सांगितली. ते म्हणाला, ‘मी अजिबात वक्तशीर नव्हतो. तो खूप वेळा सेटवर उशिरा पोहचायचो. ती माझी सवय झाली होती. मी माझ्याच लग्नाला देखील 3 तास उशिरा पोहोचलो होते.’

शत्रुघ्न सिन्हा यांनी 1980मध्ये अभिनेत्री पूनम चंदिरमानीसोबत लग्न केले. शत्रुघ्न सिन्हा आणि पूनम एकमेकांना 5 वर्षे डेट करत होते. यानंतर दोघेही लग्नाच्या बंधनात अडकले. सिन्हा म्हणाले की, चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तो खूप उशिरा सेटवर पोहोचत असे. ते म्हणतात की, सेटवर उशिरा पोहोचल्यानंतरही मला वेळेवर काम पूर्ण करण्यासाठी ओळखले जात होते. उशिरा सेटवर पोहोचल्यावरही मी वेळेआधी माझे काम पूर्ण करायचो.

शत्रुघ्न सिन्हा म्हणाले की, मी कधीही कोणालाही त्रास दिला नाही. लहान-सहन गोष्टीही दाखवल्या नाहीत. मी शूटिंगच्या मनःस्थितीत नाही, असे कधीच सांगितले नाही. मला ताप येत असला तरी मी सेटवर जात असे. ते म्हणाले की, आजारी असूनही मी ‘मेरे अपने’ चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले होते.

कागदावर चित्रपटाचे संवाद लिहून केले प्रपोज

शत्रुघ्न सिन्हा म्हणाले की, मी माझ्या कारकिर्दीत कोणत्याही चित्रपटाचे शूटिंग कधीही रद्द केले नाही. शत्रुघ्नला बॉलिवूडमध्ये ‘शॉटगन’ची पदवी देण्यात आली आहे. त्यांनी चित्रपटांसोबतच राजकारणातही यशस्वी डाव खेळला आहे. बॉलिवूड अभिनेता शत्रुघ्न सिन्हा हे नेहमी आपल्या स्पष्ट वक्तव्यांसाठी ओळखले जातात. पूनम सिन्हा आई शत्रुघ्न यांची पहिली भेट पाटणाहून मुंबईला जाणाऱ्या ट्रेनमध्ये भेट झाली होती. पूनम पहिल्या भेटीतच शत्रुघ्न सिन्हाच्या प्रेमात पडल्या होत्या, पण त्यावेळी ते रीना रॉयला डेट करत होते. मात्र, नंतर शत्रुघ्न सिन्हा यांनी माजी मिस यंग इंडिया ‘पूनम सिन्हा’ सोबत लग्न केले. शत्रुघ्न यांनी कागदावर ‘पाकीजा’ चित्रपटाचे संवाद लिहून पूनम यांना चालत्या ट्रेनमध्ये प्रपोज केले होते.

हेही वाचा :

Monalisa : पारंपारिक अवतारात मोनालिसाने लावलं चाहत्यांना वेड, चाहते म्हणाले – ‘तुम्ही नेहमी इतक्या सुंदर कशा दिसता?’

Bigg Boss Marathi 3 | ‘महिला, महिला आणि भांडायला पहिला…’, सोनालीची तृप्ती देसाईंसोबत तूतू-मैमै!

Drugs Case | मुंबई आणि गोवा एनसीबीची संयुक्त कारवाई, अर्जुन रामपालचा मेहुणा अ‍ॅगिसिलोसला पुन्हा अटक!

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.