AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शुटिंग सुरू असतानाच शिल्पा शेट्टीची पाठ जळाली, तरीही काम सुरू; अभिनेत्री म्हणाली…

Shilpa Shetty : शिल्पा शेट्टी ही बॉलिवूडमधील फिटनेस क्वीन आहे, शिल्पाने अलिकडेच आपल्या आयुष्यात घडलेला एक वेदनादायक प्रसंग सांगितला आहे. एकदा शुटींग सुरू असताना ती गंभीर जखमी झाली होती.

शुटिंग सुरू असतानाच शिल्पा शेट्टीची पाठ जळाली, तरीही काम सुरू; अभिनेत्री म्हणाली...
Shilpa Shetti AccidentImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Apr 11, 2026 | 7:17 PM
Share

शिल्पा शेट्टी ही बॉलिवूडमधील एक यशस्वी अभिनेत्री आहे. तिला फिटनेस क्वीन म्हणूनही ओळखले जाते. शिल्पा शेट्टीने अलिकडेच आपल्या आयुष्यात घडलेला एक वेदनादायक प्रसंग सांगितला आहे. शिल्पाने सांगितले की 90 च्या दशकात एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ती जखमी झाली होती आणि तिची पाठ गंभीररीत्या भाजली होती. मात्र तरीही तिने काम सुरू ठेवले. शिल्पाने पुढे बोलताना हेही सांगितले की, मेहनतीमुळेच मला अनेक चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. कामाप्रती असलेल्या बांधिलकीमुळे मला दिग्दर्शक पसंती देत होते. टुमारो टुडे शो या यूट्यूब चॅनेल बोलताना शिल्पाने ही माहिती दिली आहे.

शिल्पा शेट्टी काय म्हणाली?

शिल्पा शेट्टीने सांगितले की, ‘मला नेहमी काम मिळाले कारण लोकांनी माझी मेहनत पाहिली होती. मी नेहमी काम पूर्ण करत असे आणि कोणत्याही परिस्थितीत सेटवर पोहोचत असे. एकदा शूटिंगदरम्यान माझी पाठ HMI लाईटमुळे भाजली होती. मला फ्रेममधून बाहेर पडायचे होते आणि मागे एक छोटी लाईट होती. माझी पाठ त्याला लागली, त्यामुळे पाठ भाजली गेली.

मी आयुष्यात खूप मेहनत घेतली

पुढे बोलताना शिल्पा म्हणले की, जेव्हा भाजते तेव्हा लगेच कळत नाही, मात्र थोड्या वेळाने वेदना जाणवतात. तरीही मी दुसऱ्या दिवशी पुन्हा कामावर गेले. त्या दिवशी मला एक खास कॉस्ट्यूम घालायचा होता, पण पाठ भाजल्यामुळे तो व्यवस्थित घालता येत नव्हता. त्यामुळे मी तो फक्त पुढूनच घातला आणि मागून सुई-दोऱ्याने शिवून घेतला, त्यामुळे चैन लावण्याची गरज पडली नाही. माझ्यामुळे कोणालाही नुकसान होऊ नये म्हणून मी माझ्या आयुष्यात खूप मेहनत घेतलेली आहे.

शिल्पा केडी द डेविल चित्रपटात झळकणार

दरम्यान, शिल्पा शेट्टीने आपल्या करिअरची सुरुवात शाहरुख खानच्या बाजीगर या 1993 मधील चित्रपटातून केली होती. ती गेल्या 32 वर्षांरासून सक्रीय असून सुमारे 60 चित्रपटांमध्ये काम केले आहे. यातील काही चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. ती अलिकडेच रोहित शेट्टीच्या इंडियन पोलिस फोर्स या वेब सिरीजमध्ये झळकली होती. आता ती लवकरच संजय दत्त यांच्यासोबत केडी द डेविल या कन्नड चित्रपटात दिसणार आहे.

Follow Us
फडणवीस बोलले, महायुती म्हणून एकत्र लढू; शिंदेंचा मात्र अपक्षाला खुला..
Mahayuti : फडणवीस बोलले, महायुती म्हणून एकत्र लढू; शिंदेंचा मात्र अपक्षाला खुला पाठिंबा, नेमकं प्रकरण काय?
दिल्लीत आज सीजेपीची लहरा दो तिरंगा रॅली; रॅलीकडे....
CJP Tiranga Rally : दिल्लीत आज सीजेपीची लहरा दो तिरंगा रॅली; रॅलीकडे देशाचं लक्ष
ज्ञानेश कुमार मोदींना काय देतात? अभिजीत दिपकेंचा थेट सवाल
Abhijeet Dipke : ज्ञानेश कुमार मोदींना काय देतात? अभिजीत दिपकेंचा थेट सवाल, दिल्लीचं रूपांतर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिरांबाबतही नवे नियम
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी,
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी, नेमकं टार्गेट किती?
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून...
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून तातडीचे आदेश
दुष्काळात मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे प्रत्युतर
महाराष्ट्र दुष्काळ मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे पुराव्यांसोबत प्रत्युत्तर; कर्नाटकमधील आकडेवारीसह...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्ष...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्षांची मोठी मागणी, नेमकं कारणही सांगितलं
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना...
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना... नवे नियम काय?
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद,
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद, सरकारला घेरलं...