AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shweta Tiwari | किसी का भाई किसी की जान चित्रपट बघितल्यानंतर श्वेता तिवारी हिने केले मोठे भाष्य, मुलगी पलकबद्दल म्हणाली…

बाॅलिवूड अभिनेता सलमान खान याचा किसी का भाई किसी की जान हा चित्रपट नुकताच रिलीज झालाय. विशेष म्हणजे हा चित्रपट कमाई जबरदस्त करताना देखील दिसत आहे. सलमान खान याच्या चित्रपटातून पलक तिवारी हिने बाॅलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.

Shweta Tiwari | किसी का भाई किसी की जान चित्रपट बघितल्यानंतर श्वेता तिवारी हिने केले मोठे भाष्य, मुलगी पलकबद्दल म्हणाली...
| Updated on: Apr 24, 2023 | 3:02 PM
Share

मुंबई : बाॅलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) याचा किसी का भाई किसी की जान हा चित्रपट 21 एप्रिल रोजी रिलीज झालाय. विशेष म्हणजे या चित्रपटाने धमाकेदार कामगिरी करण्यास सुरूवात केलीये. चित्रपटाचा (Movie) ओपनिंग डे काही खास ठरला नाही. परंतू, वीकेंडचा फायदा हा चित्रपटाला नक्कीच झालाय. सलमान खान याचे चाहते त्याच्या या चित्रपटाची वाट पाहत होते. या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्येही मोठे क्रेझ होते. सलमान खान याने या चित्रपटात धमाकेदार अभिनय केलाय. विशेष म्हणजे सलमान खान याच्या किसी का भाई किसी की जान (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) चित्रपटामध्ये साऊथ स्टार राम चरण याचीही झलक चाहत्यांना बघायला मिळालीये.

सलमान खान याच्या किसी का भाई किसी की जान या चित्रपटातून बिग बाॅस फेम शहनाज गिल आणि श्वेता तिवारी हिची लेक पलक तिवारी यांनी बाॅलिवूडमध्ये पदार्पण केले. किसी का भाई किसी की जान चित्रपटाची संपूर्ण टिम चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसली. या चित्रपटात सलमान खान याच्यासोबत पूजा हेगडे ही मुख्य भूमिकेत आहेत.

चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी काही दिवसांपूर्वी सलमान खान हा कपिल शर्मा याच्या शोमध्ये पोहचला होता. पलक तिवारी हिने देखील चित्रपटाचे जोरदार प्रमोशन केले आहे. एका मुलाखतीमध्ये पलक तिवारी हिने आर्यन खान याच्याबद्दल मोठे भाष्य केले. पलक तिवारी ही इब्राहिम अली खान याला डेट करत असल्याच्या चर्चा सर्वत्र रंगताना दिसत आहेत.

नुकताच श्वेता तिवारी हिने एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये श्वेता तिवारी ही मुलगी पलक हिच्याबद्दल बोलताना दिसली. श्वेता तिवारी म्हणाली की, मी थिएटरमध्ये जाऊन किसी का भाई किसी की जान या चित्रपट बघितला आहे. मला पलक हिचा अभिनय प्रचंड आवडलाय. तिने चित्रपटामध्येज जबरदस्त पध्दतीने तिची भूमिका पार पाडलीये.

तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा दिल्या पुढच्या करिअरसाठी हव्या आहेत. मला खरोखरच पलक हिच्यावर गर्व आहे. पलक ही एक लहान मुलगी आहे. मी जेंव्हा जेंव्हा तिचे वागणे बघते, घरी राहण्याची तिची पध्दत बघत त्यावेळी मला नेहमीच तिच्यावर गर्व वाटतो. चित्रपटात तिने खरोखरच जबरदस्त असा अभिनय केल्याचे देखील श्वेता तिवारी हिने म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपासून सतत एक चर्चा रंगत आहे की, पलक तिवारी ही सैफ अली खान याचा मुलगी इब्राहिम अली खान याला डेट करत आहे.

Follow Us
भोंदूबाबा खरातने सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरलं... मोठा कारनामा समोर
भोंदूबाबा खरातने सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरलं... मोठा कारनामा समोर.
आताच सोनं खरेदी करा बरं... गेल्या 40 वर्षात झालं नव्हतं एवढं स्वस्त...
आताच सोनं खरेदी करा बरं... गेल्या 40 वर्षात झालं नव्हतं एवढं स्वस्त....
शिवसेना- भाजपमध्ये तणाव, एकनाथ शिंदे यांची तातडीने मंत्र्यांसोबत बैठक
शिवसेना- भाजपमध्ये तणाव, एकनाथ शिंदे यांची तातडीने मंत्र्यांसोबत बैठक.
सातारा पोलीस अधीक्षकांचे निलंबन करा, उपसभापती नीलम गोऱ्हेंकडून आदेश
सातारा पोलीस अधीक्षकांचे निलंबन करा, उपसभापती नीलम गोऱ्हेंकडून आदेश.
मला अडवले, ओढत नेले... शंभुराज देसाई संतापले... विधान परिषदेत....
मला अडवले, ओढत नेले... शंभुराज देसाई संतापले... विधान परिषदेत.....
त्या सॉफ्ट टार्गेट, 9 माजी मंत्र्यांची चौकशी करा; संजय राऊत....
त्या सॉफ्ट टार्गेट, 9 माजी मंत्र्यांची चौकशी करा; संजय राऊत.....
खरातसोबत कुणाकुणाचे संबंध? संजय राऊतांनी थेट नावच घेतली
खरातसोबत कुणाकुणाचे संबंध? संजय राऊतांनी थेट नावच घेतली.
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?.
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह..
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह...
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी.