AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘नागराज मंजुळे भावा.. त्या ओळी मनातून जातच नाहीत’; ‘झुंड’साठी सिद्धार्थने लिहिलेली पोस्ट वाचली का?

सोशल मीडियावर सध्या नागराज मंजुळे दिग्दर्शित 'झुंड' (Jhund) याच चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. अनेक कलाकारांनी पुढाकार घेत 'झुंड' हा चित्रपट का पाहावा याबद्दल सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे. त्यातीलच एक कलाकार म्हणजे सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav).

'नागराज मंजुळे भावा.. त्या ओळी मनातून जातच नाहीत'; 'झुंड'साठी सिद्धार्थने लिहिलेली पोस्ट वाचली का?
Siddharth Jadhav and Nagraj ManjuleImage Credit source: Instagram
| Updated on: Mar 06, 2022 | 11:56 AM
Share

सोशल मीडियावर सध्या नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ (Jhund) याच चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. अनेक कलाकारांनी पुढाकार घेत ‘झुंड’ हा चित्रपट का पाहावा याबद्दल सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे. त्यातीलच एक कलाकार म्हणजे सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav). सिद्धार्थने ‘झुंड’ पाहिला आणि त्यानंतर इन्स्टाग्रामवर लिहिलेल्या पोस्टमध्ये त्याला भावलेल्या गोष्टी त्याने सांगितल्या आहेत. “बच्चों से लेकर बच्चन तक” सर्वांचंच अभिनय दमदार असल्याचं त्याने म्हटलंय. या चित्रपट अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका आहेत. एकीकडे बॉलिवूडचा महानायक आणि दुसरीकडे झोपडपट्टी, फुटपाथवरील मुलं असं समीकरण दिग्दर्शक नागराज मंजुळेंनी (Nagraj Manjule) या चित्रपटात घडवून आणलंय. अप्रतिम या शब्दाचा खरा अर्थ समजून घ्यायचा असेल तर ‘झुंड’ पहायलाच हवा, अशी भावना सिद्धार्थने व्यक्त केली आहे.

सिद्धार्थ जाधवची पोस्ट-

“तुम्ही आमचं अस्तित्व नाकारूच शकत नाही..” नागराज मंजुळे भावा, अप्रतिम हा शब्द फक्त नावाला आहे. त्याचा खरा अर्थ समजून घ्यायचा असेल तर ‘झुंड’ पहायलाच हवा. स्वप्न प्रत्येकाची असतात. पण ती पूर्ण करण्याची धमक ‘झुंड’मध्ये होती, आहे, आणि कायम राहणार हे तू पुन्हा एकदा सिध्द केलंस. अभिमान वाटतो तुझा. “अपून की बस्ती गटर मे है… पर तुम्हारे मन मे गंद है”, या ओळी मनातून जातच नाहीत. अजय अतुल दादा… आय लव्ह यू फॉरेव्हर. कलाकारांच्या कामाबद्दल मी काय बोलणार? “बच्चों से लेकर बच्चन तक”, सगळेच वरचा क्लास. जे जगणं आहे तेच नागराज ने खरंखरं मांडलंय. माणसाच्या माणुसकीचा प्रवास.. झुंड… नक्की बघा नाही, पहायलाच हवा, असं सिद्धार्थने म्हटलंय.

नागपुरातील विजय बारसे (Vijay Barse) या फुटबॉल प्रशिक्षकांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटाची कथा असून यामध्ये बिग बी बारसेंची भूमिका साकारत आहेत. टीझर, ट्रेलरपासून या चित्रपटाची जोरदार चर्चा झाली. आमिर खान, धनुष यांसारख्या कलाकारांनीही ‘झुंड’चं तोंडभरून कौतुक केलं आहे. झोपडपट्टी, फुटपाथवर राहणाऱ्या मुलांना घेऊन बारसे हे फुटबॉलची टीम बनवतात. सोनसाखळी चोरणाऱ्या, गांजा विकणाऱ्या, गुंडगिरी करणाऱ्या मुलांची टीम बनवू पाहण्याचं स्वप्न ते पाहत असतात. ‘झुंड’मध्ये अनेक मराठी कलाकारांचे चेहरे पहायला मिळतात. ‘सैराट’ या चित्रपटाची टीम म्हणजेच रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. अजय-अतुल या लोकप्रिय जोडगोळीने चित्रपटाला संगीत दिलं आहे. चित्रपटात छाया कदम आणि किशोर कदम यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

हेही वाचा:

‘जात.. जात नाही तोवर…’; नागराज मंजुळेंच्या ‘झुंड’वर टीका करणाऱ्यांना केदार शिंदेंचं सडेतोड उत्तर

कोण आहेत विजय बारसे? ज्यांच्यावर नागराज मंजुळेंनी बनवला ‘झुंड’ चित्रपट

निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.