Shershaah | सिद्धार्थ-कियाराचा शेरशाह चित्रपट ‘या’ तारखेला रिलीज होणार!

बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) ​​आणि कियारा अडवाणीचा (Kiara Advani) चित्रपट शेरशाह (Shershaah)  या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट आहे.

Shershaah | सिद्धार्थ-कियाराचा शेरशाह चित्रपट 'या' तारखेला रिलीज होणार!

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) ​​आणि कियारा अडवाणीचा (Kiara Advani) चित्रपट शेरशाह (Shershaah)ची चाहते आतुरतेने वाट आहे. तर दुसरीकडे त्यांच्या लग्नाची बातमी समोर येत आहे. नुकताच सिद्धार्थ आणि कियाराच्या शेरशाह चित्रपटाची रिलीज तारीख पुढे आली आहे. हा चित्रपट 2 जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. (Sidharth Malhotra and Kiara Advani’s film Shershaah will be released on July 2, 2021)

करण जोहरने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन याची माहिती दिली आहे. शेरशाहाची दोन नवीन पोस्टर्स शेअर करत करण जोहरने लिहिले आहे की, कॅप्टन विक्रम बत्राची कधीही न ऐकलेली कहानी मोठ्या पडद्यावर दाखविण्यासाठी तयार आहे. शेरशाह 2 जुलै 2021 रोजी चित्रपटगृहात रिलीज होईल. या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी दिसणार आहेत.

विष्णू वर्धन यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. कियारा इंदू की जवानी या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला होता. आता कियारा जुग-जुग जिओ, शेरशाह आणि भूल भुलैया या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. कियारा वरुण धवनसोबत जुग-जुग जिओमध्ये दिसणार आहे. या चित्रपटातील अनिल कपूर आणि नीतू कपूरही मुख्य भूमिकेत आहेत.

सिद्धार्थ मल्होत्रा​​सोबत कियारा शेरशाहमध्ये दिसणार असून भूमिका भुलैया 2 मध्ये कियारा आणि कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. सिद्धार्थ मल्होत्रा मरजावां चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात सिद्धार्थबरोबर तारा सुतारिया मुख्य भूमिकेत होती. आता तो शेरशाहमध्ये दिसणार आहे. याशिवाय नुकताच त्याने थँक्स गॉड चित्रपटाची घोषणा केली आहे. सध्या तो थँक्स गॉड चित्रपटाचे शूट करत आहे.

संबंधित बातम्या : 

श्वेता तिवारीविरोधात पती अभिनवची कोर्टात धाव, मुलाला भेटू न देण्याचा आरोप!

अक्षयची ‘बेल बॉटम’ दहशतवादी घटनेवर आधारीत; वाचा चित्रपटाची कहाणी! 

VIDEO | विनामास्क-विनाहेल्मेट बाईक राईड, विवेक ओबेरॉयला ‘मस्ती’ नडली, मुंबई पोलिसांची कारवाई

(Sidharth Malhotra and Kiara Advani’s film Shershaah will be released on July 2, 2021)

Published On - 11:25 am, Sat, 20 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI