Weight Loss | कुणी मुगडाळ खाल्ली, तर कुणी आणखी वेगळी ट्रीक वापरली! 2021मध्ये सेलिब्रेटींचं ‘वेट लॉस’ चर्चेत!

गेल्या वर्षीप्रमाणेच, कोरोना महामारीमुळे लोकांनी 2021चा बहुतांश काळ घरी घालवला आहे. मात्र, यंदा अनेकांनी फिटनेसला प्राधान्य देऊन आपले ‘वेट लॉस’ ध्येय पूर्णही केले. खरं तर, अनेक जास्त वजन असलेल्या सेलिब्रिटींनी नियमितपणे सोशल मीडियावर त्यांच्या वर्कआऊटचे व्हिडीओ पोस्ट केले आणि कठोर परिश्रम आणि मेहनत घेऊन वजन कमी करण्याचे ध्येय गाठले आहे.

Weight Loss | कुणी मुगडाळ खाल्ली, तर कुणी आणखी वेगळी ट्रीक वापरली! 2021मध्ये सेलिब्रेटींचं ‘वेट लॉस’ चर्चेत!
Weight Loss
Follow us
| Updated on: Dec 18, 2021 | 11:33 AM

मुंबई : गेल्या वर्षीप्रमाणेच, कोरोना महामारीमुळे लोकांनी 2021चा बहुतांश काळ घरी घालवला आहे. मात्र, यंदा अनेकांनी फिटनेसला प्राधान्य देऊन आपले ‘वेट लॉस’ ध्येय पूर्णही केले. खरं तर, अनेक जास्त वजन असलेल्या सेलिब्रिटींनी नियमितपणे सोशल मीडियावर त्यांच्या वर्कआऊटचे व्हिडीओ पोस्ट केले आणि कठोर परिश्रम आणि मेहनत घेऊन वजन कमी करण्याचे ध्येय गाठले आहे.

बॉलिवूडमध्ये असे अनेक स्टार्स आहेत, ज्यांचे वजन आधी खूप जास्त होते. परंतु, त्यांनी खूप मेहनत आणि कठोर वजन कमी करण्याचा आहार फॉलो करून वजन कमी करण्यात यश मिळवले. त्यात स्मृती इराणी, भारती सिंह, फरदीन खान आणि लिझेल रेमो डिसूझा या नावांचा समावेश आहे.

गेल्या काही दिवसांत, तुम्ही सोशल मीडियावर या सेलिब्रिटींचे वजन कमी करतानाचे फोटो पाहिले असतील आणि तुम्हाला हे समजले असेल की, वजन कमी करण्यासाठी संयम आणि समर्पण खूप आवश्यक आहे. वर्षाच्या अखेरीस तुम्ही तुमचे वजन कमी करण्याचे ध्येय गाठले नसल्यास निराश होऊ नका. आम्ही तुमच्यासाठी प्रसिद्ध बॉलीवूड सेलिब्रिटींच्या वेटलॉस ट्रान्सफॉर्मेशन स्टोरीज घेऊन आलो आहोत ज्या तुम्हाला नक्कीच वजन कमी करण्यासाठी प्रेरित करतील…

शहनाज गिल

शहनाज गिलने 6 महिन्यांत 12 किलो वजन कमी करून चाहत्यांना आश्चर्यचकित केले. यासाठी तिने बाहेरचे खाणे-पिणे पूर्णपणे थांबवले आणि फक्त घरी शिजवलेले अन्न खाणेच खाल्ले, असे तिने मीडियाला सांगितले. शरीरातील चरबी कमी करण्यासाठी शहनाज गिलने तिचा दररोजचा आहार बदलला नाही. केवळ एका प्रकारच्या अन्नावर लक्ष केंद्रित केले. उदाहरणार्थ, जर ती दुपारच्या जेवणात डाळ आणि मूग खात असेल, तर ती रात्रीच्या जेवणातही तेच खात असे. ती नेहमी कॅलरी मोजणीकडे लक्ष ठेवायची.

भारती सिंह

प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंहला तुम्ही सर्वांनी पाहिलं असेल. या वर्षी तिने कठोर वर्कआउट आणि सकारात्मक दृष्टिकोनामुळे 15 किलो वजन कमी केले आहे. तिच्या वेट लॉस फोटोंनी इंस्टाग्रामवर प्रंचड चर्चा निर्माण केली आहे. वजन कमी करण्याच्या या प्रवासादरम्यान, भारतीने काहीवेळा उपवास केला, ज्यामध्ये तिने दुपारी 12 ते 7 वाजेपर्यंत काहीही खाल्ले नाही. ती म्हणाली की, वजन कमी केल्यानंतर तिला खूप निरोगी आणि बरे वाटत आहे. यामुळे तिला दमा आणि मधुमेह नियंत्रणात खूप मदत झाली.

लिझेल रेमो डिसूझा

डान्स कोरिओग्राफर रेमो डिसूजाची पत्नी लिझेल डिसूझा हिचे वजन 105 किलो होते. मात्र, तिने दोन वर्षांत तब्बल 40 किलो वजन कमी करून लोकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. दोन वर्षांत तिने वजन कमी करण्यात बऱ्यापैकी यश मिळवले. तिने या वजन परिवर्तनाच्या प्रवासाला दोन गोष्टींसह सुरुवात केली – ती म्हणजे कार्ब आणि साखर सेवन टाळणे. याशिवाय वजन कमी करण्यासाठी तिने अधूनमधून उपवास केला. लिझेल म्हणते की, प्रत्येक व्यक्तीचे आयुष्य वेगळे असते. आपण एकच अन्न खात असलो तरी ते प्रत्येकावर वेगळ्या पद्धतीने परिणाम करते. त्यामुळे तुमचे शरीर ते कसे स्वीकारते हे पाहणे महत्त्वाचे आहे.

समीरा रेड्डी

बॉलिवूड अभिनेत्री समीरा रेड्डी तिच्या फिटनेस रेजिमनचे अपडेट्स सोशल मीडियावर नियमितपणे शेअर करत असते. 42 वर्षीय अभिनेत्री बॅडमिंटन, बॉक्सिंग, योगा यांसारखे व्यायाम करून आणि अधूनमधून उपवास करून आहाराचे व्यवस्थापन करून व्यायामाची दिनचर्या सांभाळते. तिने सांगितले की, तिने 11 किलो वजन कमी केले आणि आता तिचे वजन 81 किलो आहे.

स्मृती इराणी

या वर्षातील सर्वात जास्त वजन कमी करण्याच्या परिवर्तनाची कहाणी व्हायरल झाली, ती आहे अभिनेत्री आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची. अलीकडेच त्यांचे वेगळे रूप पाहून लोक थक्क झाले आहेत. स्मृती यांनी जिममध्ये वर्कआउट करून बरेच वजन कमी केले आहे आणि आता त्या पूर्वीपेक्षा स्लिम झाली आहे. त्यांचा चेहराही आता पूर्वीपेक्षा अधिक चमकू लागला आहे. त्यांनी वजन कमी करण्यासाठी ग्लूटेन आणि डेअरी फ्री डाएट फॉलो केला आहे.

फरदीन खान

बॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता फरदीन खान हा सर्वात देखण्या आणि डॅशिंग अभिनेत्यांपैकी एक आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत तो वाढलेल्या वजनामुळे चर्चेत राहिला. पण, या वर्षी त्याने बरेच वजन कमी केले आणि तो फिट झाला. त्याने सांगितले की, वजन कमी करण्याचा त्याचा प्रवास त्याच्या मुलांकडून प्रेरित होता. ज्यांनी त्याला नवीन खेळ आणि शारीरिक व्यायामाची ओळख करून दिली. जाणून आश्चर्य वाटेल की, पण या अभिनेत्याने अवघ्या 6 महिन्यांत 18 किलो वजन कमी केले आहे. आता त्याचा हा मेकओव्हर खूपच आकर्षक आहे.

हेही वाचा :

Miss World 2021 | ‘मिस वर्ल्ड 2021’च्या महाअंतिम सोहळ्यावर कोरोनाचं सावट, मानसा वाराणसीला कोरोनाची लागण!

83 First Movie Review : टीम इंडियाच्या ऐतिहासिक कामगिरीचे सुवर्णक्षण पडद्यावर, 83 इज मास्टरपीस! अभिनयापासून दिग्दर्शनापर्यंत दमदार कामगिरी

RRR : ज्यांच्या जीवनावर RRR चित्रपट बनला, ते ‘अल्लुरी सीताराम राजू’ आणि ‘कोमाराम भीम कोण होते? जाणून घ्या

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.