खिशात पैसे नसलेल्या किशोर कुमारांवर कँटीनची उधारी जमली अन् तयार झालं ‘चलती का नाम गाडी’चं गाणं!

'चलती का नाम गाडी'  (Chalti Ka Naam Gaadi) या चित्रपटातील 'पाँच रुपय्या बारह आना' (Paanch Rupaiya Baara Aana) हे गाणे आपण सर्वांनीच ऐकले असेल. मात्र, हे गाणे कसे बनवले गेले, हे तुम्हाला माहित आहे का?

खिशात पैसे नसलेल्या किशोर कुमारांवर कँटीनची उधारी जमली अन् तयार झालं ‘चलती का नाम गाडी’चं गाणं!
Paanch Rupaiya Baara Aana
Follow us
| Updated on: Aug 11, 2021 | 9:15 AM

मुंबई : जेव्हाही ते बाथरूममध्ये असत, तेव्हा मोठ्या आवाजात गाणी गात. 4-5 गाण्यांशिवाय त्यांचे स्नान पूर्णच होतच नसे. एके दिवशी, आंघोळ करत असताना त्यांनी गायलेले गाणे एका व्यक्तीला आवडले आणि त्यांचा बॉलिवूडचा प्रवास सुरु झाला. हो, आपण किशोर कुमार (Kishore Kumar) यांच्या बद्दल बोलत आहोत. ज्यांना सगळे चाहते ‘किशोर दा’ म्हणूनही ओळखतात.

सदाबहार गाण्यांचे ‘एव्हरग्रीन राजा’ अर्थात किशोर कुमार आजही लोकांच्या हृदयात जिवंत आहे. ते केवळ गायक नव्हते, तर संगीतकार आणि लेखकही होते. हिंदी व्यतिरिक्त, त्यांनी बंगाली, मराठी, गुजराती, कन्नड, मल्याळम, भोजपुरी आणि उर्दू भाषेतही आपल्या आवाजाने लोकांची मने जिंकली.

किशोर कुमार कसे आले गायन क्षेत्रात?

किशोर कुमार त्यांच्या छोट्याशा जगातून बाहेर पडून, बॉलिवूडमध्ये आल्याची कथा खूपच रंजक आहे. किशोर कुमार, मुंबईत भाऊ अशोक कुमार यांच्या घरी सुट्टीसाठी आले होते. नेहमीप्रमाणे आंघोळ करताना ते एक गाणे म्हणत होते. आता याला प्रक्तानच म्हणावे की नेमके त्याच वेळी संगीतकार सचिन देव बर्मन अशोक कुमार यांना भेटायला पोहचले होते. बाथरूममधून येणारा किशोर यांचा आवाज ऐकून त्यांनी विचारले ‘हे ​​कोण गात आहे?’ आणि त्यानंतरच त्यांची बॉलिवूडमध्ये एन्ट्री झाली.

यानंतर किशोर कुमार यांची गाणी ऐकल्यानंतर क्वचितच कोणी त्याचे नाव विचारले असेल. त्यांनी अनेक उडत्या चालीची गाणी गायलीली. ‘चलती का नाम गाडी’  (Chalti Ka Naam Gaadi) या चित्रपटातील ‘पाँच रुपय्या बारह आना’ (Paanch Rupaiya Baara Aana) हे गाणे आपण सर्वांनीच ऐकले असेल. मात्र, हे गाणे कसे बनवले गेले, हे तुम्हाला माहित आहे का?

असे बनले ‘पाँच रुपय्या बारह आना’ हे प्रसिद्ध गाणे!

महाविद्यालयीन काळात किशोर कुमार कँटीन टेबलला तबला बनवून त्यावर वाजवून त्यांच्या चालीवर मित्रांसोबत गाणी गात असत. यावेळी ते आणि त्यांचे मित्र मिळून जिलेबी आणि समोसे खायचे. हा तो काळ होता, जेव्हा किशोर कुमार यांच्या खिश्यात जास्त पैसे नसायचे. याच दरम्यान त्यांच्यावर कॉलेजच्या कँटीनचे पाच रुपये बारा आण्यांची उधार जमा झाली होती.

यामुळे ते जेव्हा जेव्हा कँटीनमध्ये यायचे तेव्हा, कँटीनमध्ये काम करणारे काका किशोर कुमार यांना पाहून अतिशय लयीत ‘ओय, पाच रुपय्या बारा आना’ म्हणायचे. यावर किशोर दा त्यांना ‘मारेगा भैया, ना..ना’, असे गमतीशीर उत्तर द्यायचे. अशाप्रकारे त्यांना ‘चलती का नाम गाडी’ चित्रपटातील ‘पाच रुपय्या बारा आना’ या गाण्याची रंजक कल्पना सुचली आणि कँटीनमध्ये काम करणाऱ्या काकांचे बोल किशोर दा यांनी गाण्यात रुपांतरीत करून घेतले.

हेही वाचा :

भुताटकीच्या अफवेतून चित्रपटाची कथा गवसली, ‘आयेगा आनेवाला’ने लता मंगेशकरांना ओळख मिळवून दिली!

गुरूशीच सामना रंगला, गझलेच्या प्रांतातही मुशाफिरी; गौतम संकपाळ यांचा हा सफरनामा वाचाच!

Non Stop LIVE Update
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.